The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

by द पोस्टमन टीम
21 April 2020
in मनोरंजन
Reading Time:2min read
0
Home मनोरंजन

हे देखील वाचा

नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

अशा चित्रविचित्र कामगिऱ्या करून या भारतीयांनी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलंय

या अशिक्षित साहित्यिकामुळे भोजपुरी भाषेला नवसंजीवनी मिळाली होती.

ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब

अनेकांना हे वाटून आश्चर्य वाटेल की सध्याच्या बाजारात एथलेटिक वेअर बनवणाऱ्या प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या पुमा आणि आदीदास या दोन्ही कंपन्यांचा जन्म दोन भावांच्या टोकाच्या वादातून झाला आहे. होय! या कंपन्यांच्या जन्माच्या कहाणीला दुसऱ्या विश्व युद्धाची, उद्योजकतेची, कल्पकतेची आणि दोन भावंडांच्या असंतोषाची झालर आहे.

एडॉल्फ डॅसलर आणि रुडॉल्फ डॅसलर.

सन १९१९ साली जर्मनीच्या Herzogenaurach या छोट्या गावातील दोन भावांनी आपल्या घरातच स्निकर्स (मऊ तळव्याचे बूट) बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. कंपनीचे नाव होते “स्पोर्ट्स फॅब्रिक गेब्रूडर डॅसलर”.

adidas brothers
एडॉल्फ डॅसलर आणि रुडॉल्फ डॅसलर.

१९२७ पर्यंत कंपनीने समाधानकारक प्रगती केली आणि कंपनीत आता १२ कर्मचारी काम करू लागले. आजूबाजूच्या छोट्या प्रांतातही कंपनीचे उत्पादन विकले जाऊ लागले. नवनवीन उत्पादनांचे डिझाईन्स बनवण्याचे काम एडॉल्फ करत असे तर मार्केटिंगची जबाबदारी बडबड्या रुडॉल्फकडे होती.

आपण आज ज्याला क्लिएट्स म्हणून ओळखतो त्या खिळे असलेल्या बुटांची जगाला ओळख याच कंपनीने सर्वप्रथम करून दिली. मात्र कंपनीचा खरा भाग्योदय झाला १९३६ साली.

तत्कालीन ऑलिम्पिकचे आयोजन जर्मनीच्या बर्लिनमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत स्प्रिंट रनिंग, लांब उडी या प्रकारात तब्बल ४ सुवर्णपदके मिळवून जगाचे लक्ष वेधणारा खेळाडू होता अमेरिकेचा जेसी ओवेन्स. त्याच्या अतुलनीय कामगिरीसोबत जगभर चर्चा झाली त्याने घातलेल्या शूजची. जे बनवले होते अर्थातच रुडॉल्फ आणि एडॉल्फच्या गेब्रूडर डॅसलरने.

प्रत्येक ऑलिम्पिकप्रमाणेच ते ऑलिम्पिकही जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा शोध घेण्याचा दृष्टीने भरवण्यात आले होते. मात्र दुसऱ्या महायुद्धापूर्वीच इतर देशातील सर्वोत्तम खेळाडूंच्या वर्चस्वामुळे जर्मनीतील नाझीवादाला मोठा धोका निर्माण झाला.

त्याकाळी संपूर्ण जगात वर्णद्वेषाने परिसीमा गाठली होती. काळ्या वर्णाच्या लोकांना गोऱ्यांकडून कायम तुच्छतेची वागणूक मिळत असे. अशा परिस्थितीतही अनेक काळ्या वर्णाच्या खेळाडूंनी स्पर्धेत तगडे आव्हान उभे केले होते.

जेसीने तर गोऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढून सिद्धच केले की गोरी कातडी गोऱ्या रंगाशिवाय बाकी काहीच सूचित करत नाही.

Jesse Owens
Jesse Owens | Time

डॅसलर बंधू कट्टर नाझीवादाचे पुरस्कर्ते होते शिवाय दोघेही नाझी पक्षाचे अधिकृत सदस्य होते. तरीही त्यांनी काळ्या वर्णाच्या असणाऱ्या जेसी ओवेन्सला हाताने विणलेले शूजचे जोड का दिले असावेत?

याचे उत्तर होते,”मार्केटिंग”. त्या स्पर्धेत डॅसलर बंधूंकडून शूज घेणाऱ्या खेळाडूंनी तब्बल ७ सुवर्ण तर ५ रजत आणि कांस्यपदकांची कमाई केली होती. त्यापैकी ४ सुवर्णपदके तर एकट्या जेसीने कमावले होते.

डॅसलर बंधूंनी दिलेले शूज म्हणजे तर जेसी ओवेन्सचे जणू पंखच ठरले होते. गेब्रूडर डॅसलरची रातोरात जगभरात चर्चा झाली. प्रसिद्ध इतिहासकार मँफ्रेड वेलकर एक मुलाखतीत म्हणतात, “या कंपनीने यशाची सर्वोच्च शिखरे गाठली असती.”

आदिदास
Adolf “Adi” Dassler

पण अचानक जगात चित्र पालटले आणि दुसऱ्या महायुद्धाची नांदी झाली.

दुर्दैवाने त्याच काळात दोन्ही भावांत वादाची ठिणगी पडली आणि आजच्या आदीदासची आणि पुमाची पहिली वीट तेव्हाच रचली गेली. या वादाबद्दल अनेक कहाण्या, दंतकथा सांगितल्या जातात. पण एकाही अफवेची पुष्टी आजतागायत होऊ शकलेली नाही.

एका अफवेनुसार १९४३ साली एडॉल्फने रुडॉल्फला व्यवसायातून काढून टाकायच्या दृष्टीने त्याला जर्मन सैन्याकडून बोलवून घेण्याची व्यवस्था केली होती. तर काही नोंदींप्रमाणे रुडॉल्फने स्वतःहून सैन्यात आपले नाव नोंदवले होते. १९४५ साली रुडॉल्फ निर्जनस्थळी असताना एडॉल्फनेच सर्वांना तो कुठे आहे हे सांगितले होते आणि त्यामुळे त्याला कारावासही भोगावा लागला होता.

युद्धाच्या वेळी बॉम्बस्फोटादरम्यान दोन्ही भावांच्या कुटुंबियांना एकत्र एकाच घरात ठेवण्यात आले होते. रुडॉल्फच्या कुटुंबियांना बघून एडॉल्फने, “ही घाण पुन्हा आली” असे उद्गार काढले. वास्तविक त्याने हे उद्गार बॉम्बस्फोट करणाऱ्या विमानांसाठी काढले होते मात्र रुडॉल्फने ते व्यक्तीशः घेतले.

शेवटी एक दिवस, १९४८ ला दोन्ही भावांचे कडाक्याचे भांडण झाले आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोन भावांच्या वादामुळे एक छोटेसे गाव दोन भागात विभागले गेले. गावातील जवळपास प्रत्येक घराचा उदरनिर्वाह त्यांच्या कंपनीवर अवलंबून होता.

the postman
गेब्रूडर डॅसलर कंपनी

गेब्रूडर डॅसलर कंपनी दोन भागात विभागली गेली. रुडॉल्फची पुमा जी ऑरा नदीच्या दक्षिणेला स्थापित झाली तर एडॉल्फची आदिदास जी ऑरा नदीच्या उत्तरेला. गावातील प्रत्येक व्यक्ती दोनपैकी एक कंपनीशी जोडला गेलेला होता.

दोन्ही कंपनीच्या कर्मचाऱ्यांतील द्वंद्वामुळे Herzogenaurach गावाचे नावच “झुकलेल्या मानांचे गाव” असे पडले आणि प्रसिद्ध झाले.

आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत दोन्ही भावांचे भांडण कायम राहिले. अगदी इतके की दोघांच्या मृत्यूनंतर दोघांचे मृतदेहही एकमेकांच्या विरुद्ध दिशेला पुरले गेले. गावातील अनेक कुटुंबाच्या कुटुंब, पिढ्यानपिढ्या दोनपैकी एका कंपनीचे निष्ठावान राहिले.

Herzogenaurach चे नगराध्यक्ष सांगतात, “माझ्या काकुमुळे मी पूर्णतः पुमा परिवाराचा सदस्य होतो. माझ्या अंगावर नखशिखांत पुमाचे उत्पादन असायचे. पुमा आणि आदिदासवरून तरुणांमध्ये अनेक विनोद चालायचे.”

पुमाचे माजी सीइओ Jochen Zeist म्हणतात, “तुम्ही पुमाचे ग्राहक असाल आणि जर आदीदासचा ग्राहक असणाऱ्या मालकाच्या हॉटेलात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला हॉटेलमध्ये जेवणही मिळत नसे.”

दोन भावांत आजन्म वाद टिकून राहिला असला तरी २००९ साली दोन्ही कंपन्यादरम्यान मैत्रीपूर्ण सॉकर सामन्यांचे आयोजन करण्यात आले. एथलेटिक वेअर क्षेत्रात दोन्ही कंपन्या दिग्गज असल्या तरी आदिदासने मात्र सॉकरचा जणू कायापालटच केला.

the postman
scorum

स्क्रू-इन-क्लीएट्स (खिळे असलेले शूज) सर्वात पहिले या कंपनीने जगासमोर सादर केले. जे 1954च्या विश्वचषकात पहिल्यांदा वापरले गेले. १९९०च्या दशकात आदीदासने प्रिडेटर क्लिएट्सची निर्मिती केली आणि सरतेशेवटी कंपनीने रोजच्या वापरात लागणाऱ्या शूजची निर्मिती करण्यास सुरुवात केली. याच शूजची सध्याच्या बाजारात प्रचंड मागणी आहे.

रुडॉल्फच्या पुमानेही प्रचंड घोडदौड केली. जगविख्यात फुटबॉलपटू आणि ३ वेळचा विश्वचषक विजेता राहिलेल्या ‘पेले’ने कायम पुमाचेच शूज वापरले.

२ भावाच्या भांडणातून जन्माला आलेले हे दोन्ही ब्रँड्स प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय आहेत. जगातील सर्वच खेळाडू आणि तरुण यांच्यात दोन्ही ब्रँड्सची प्रचंड क्रेझ आजही कायम आहे.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

Tags: adidas and puma
ShareTweetShare
Previous Post

या अनाथ भारतीय मुलाचं नाव ‘हॉलीवूड वाॅक ऑफ फेम’मध्ये कायमचं कोरलंय

Next Post

गावाकडचं जगणं पडद्यावर हुबेहूब उभे करणारे हे पाच मराठी चित्रपट सगळ्यांनीच पाहायला हवेत

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती
मनोरंजन

नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

25 February 2021
अशा चित्रविचित्र कामगिऱ्या करून या भारतीयांनी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलंय
मनोरंजन

अशा चित्रविचित्र कामगिऱ्या करून या भारतीयांनी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलंय

24 February 2021
या अशिक्षित साहित्यिकामुळे भोजपुरी भाषेला नवसंजीवनी मिळाली होती.
मनोरंजन

या अशिक्षित साहित्यिकामुळे भोजपुरी भाषेला नवसंजीवनी मिळाली होती.

23 February 2021
मार्को पोलो : युरोपियन लोकांना आशिया खंडात माणसंच राहतात, राक्षस नाही, हे सांगणारा प्रवासी
भटकंती

मार्को पोलो : युरोपियन लोकांना आशिया खंडात माणसंच राहतात, राक्षस नाही, हे सांगणारा प्रवासी

21 February 2021
समुद्राखाली आहे हे पोस्ट ऑफिस, पत्र टाकायला नऊ फूट पाण्याखाली पोहत जावे लागते..!
मनोरंजन

समुद्राखाली आहे हे पोस्ट ऑफिस, पत्र टाकायला नऊ फूट पाण्याखाली पोहत जावे लागते..!

20 February 2021
या चार प्रजतीच्या कुत्र्यांमुळे भारतीय सैन्य मजबूत झाले
मनोरंजन

या चार प्रजतीच्या कुत्र्यांमुळे भारतीय सैन्य मजबूत झाले

20 February 2021
Next Post
गावाकडचं जगणं पडद्यावर हुबेहूब उभे करणारे हे पाच मराठी चित्रपट सगळ्यांनीच पाहायला हवेत

गावाकडचं जगणं पडद्यावर हुबेहूब उभे करणारे हे पाच मराठी चित्रपट सगळ्यांनीच पाहायला हवेत

MX प्लेयर वर फुकट असलेल्या या मराठी वेब सिरीज आवर्जून पाहा

MX प्लेयर वर फुकट असलेल्या या मराठी वेब सिरीज आवर्जून पाहा

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दाऊदने बॉम्बस्फोट घडवून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती

दाऊदने बॉम्बस्फोट घडवून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती

20 February 2021
५०९७ मध्ये ब्रम्हांड नष्ट होईल असं म्हणणाऱ्या बाबा वेंगाने स्वतःच्या मृत्यूची अचूक भविष्यवाणी केली होती !

५०९७ मध्ये ब्रम्हांड नष्ट होईल असं म्हणणाऱ्या बाबा वेंगाने स्वतःच्या मृत्यूची अचूक भविष्यवाणी केली होती !

2 February 2021
गिलोटीनचं नाव ऐकून माणूस शिक्षा देण्यापूर्वीच जीव सोडून द्यायचा

गिलोटीनचं नाव ऐकून माणूस शिक्षा देण्यापूर्वीच जीव सोडून द्यायचा

12 February 2021
भूल न देता शस्त्रक्रिया करताना बघण्यासाठी लोक तिकीट काढून गर्दी करायचे!

भूल न देता शस्त्रक्रिया करताना बघण्यासाठी लोक तिकीट काढून गर्दी करायचे!

12 February 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
एटीएम मशीन तयार करण्याची कल्पना एका चॉकलेट व्हेंडिंग मशीनवरून सुचली होती

एटीएम मशीन तयार करण्याची कल्पना एका चॉकलेट व्हेंडिंग मशीनवरून सुचली होती

25 February 2021
नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

25 February 2021
..आणि रखमाबाई वैद्यकीय सेवा देणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या

..आणि रखमाबाई वैद्यकीय सेवा देणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या

25 February 2021
शेन वार्नच्या स्वप्नातही सचिन त्याची धोधो धुलाई करायचा..!

शेन वार्नच्या स्वप्नातही सचिन त्याची धोधो धुलाई करायचा..!

25 February 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

एटीएम मशीन तयार करण्याची कल्पना एका चॉकलेट व्हेंडिंग मशीनवरून सुचली होती

एटीएम मशीन तयार करण्याची कल्पना एका चॉकलेट व्हेंडिंग मशीनवरून सुचली होती

25 February 2021
नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

25 February 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!