The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भटकंती – गुप्त काळातील सोन्याचा साठा असलेल्या रहस्यमयी सोनभांडार गुहा

by Heramb
19 October 2021
in भटकंती
Reading Time: 1 min read
A A
0
भटकंती – गुप्त काळातील सोन्याचा साठा असलेल्या रहस्यमयी सोनभांडार गुहा

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारताचा ज्ञात इतिहास सुमारे ५ ते ६ हजार वर्षे जुना असून, या इतिहासामध्ये साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान-तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान इत्यादींचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. ऐतिहासिक भारतात सर्वच बाबतीत भरभराटी होती. ज्ञान, संपत्ती, वास्तुकला या क्षेत्रांमध्ये तर जगभरात भारतीयांचा मोठा वाटा राहिला आहे. भरभराटीच्या याच काळात अनेक वास्तू, विद्यापीठे आणि तपश्चर्या करण्याच्या जागांची निर्मिती करण्यात आली. यांच्यामध्येच एक महत्वाचा प्रकार येतो, तो म्हणजे लेणी.

पर्यटक, इतिहासतज्ज्ञ, विविध विषयांचे अभ्यासक यांचा नेहमीच बोलण्याचा आणि साहित्यातून लिखाण करण्याचा आवडीचा विषय म्हणजे ‘लेण्या’. काही वेळा लेण्यांच्या गुप्त कथांमुळे, त्यांनी अपरिहार्यपणे प्रवासी, संशोधक आणि इतिहासकारांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतातही अशा अनेक लेण्या आहेत. काही लेण्या तर अजूनही न सापडलेल्या आणि डोंगरांच्या पोटात कुठेतरी लपलेल्या आहेत. अशा अनेक रहस्यमयी लेण्यांपैकी एक म्हणजे बिहार राज्यातील राजगीर मधील ‘सोन भंडार’ लेणी. सोन भंडार लेणी ‘वैबर’ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दोन कृत्रिम गुहा आहेत. ही लेणी इसवी सन पूर्व तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील आहे.

प्रवेशद्वारावरील एका खडकावर गुप्त साम्राज्यातील भाषेत/अक्षरांमध्ये लिहिलेल्या शिलालेखानुसार, या लेण्या जैन मुनींनी बांधल्या होत्या. म्हणजेच या लेण्या सुमारे इसवी सन पूर्व चौथ्या शतकात बांधल्या गेल्या आहेत. शिवाय, येथे सापडलेल्या भगवान विष्णूच्या एका शिल्पाने जैन धर्माशी त्याचा संबंध निश्चित केला आहे.

प्रवेशद्वारावरील शिलालेखात, “मुनी वैरदेव, आचार्यांमधील रत्न आणि महान तेजाने दोन शुभ लेण्या बनविल्या गेल्या, ज्या संन्यासींना पात्र आहेत आणि ज्यात अर्हतांची प्रतिमा (म्हणजे तीर्थंकर) ठेवण्यात आली आहे.”असा उल्लेख येतो. तथापि ब्रिटीश राजवटीतील, कनिंघम या भारताच्या ब्रिटिश पुरातत्व सर्वेक्षणकर्त्याने या लेण्यांची काही गंभीर तपासणी केली आणि सविस्तर ऐतिहासिक संशोधनानंतर त्यांनी या लेण्या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत असे एका अहवालात नमूद केले.

मग या लेणीबद्दल इतके रहस्यमय आहे तरी काय? याचं उत्तर लेण्यांच्या नावातच आहे. सोन भंडार अर्थात, ‘सोन्याचा साठा!’ या लेणी म्हणजे सोन्याच्या मोठ्या खजिन्याचे गुप्त घर आहे असेही मानले जाते. लेण्यांच्या भिंतीमध्ये विलक्षण प्रमाणात सोने दडलेले असल्याचीही आख्यायिका आहे. गुहेच्या आत खजिन्याकडे घेऊन जाणारा एक रस्ता आहे, परंतु आजवर तो कोणालाही ते सापडला नाही.

तसेच, गुहेच्या एका भिंतीवर तुम्हाला दरवाजासारखी रचना दिसेल आणि त्याच्या पुढे काहीही न वाचता येणारा शिलालेख आहे. हा एक प्रकारचा ‘गुप्त शब्द’ आहे आणि ज्याला तो शब्द वाचता येईल, तो उताऱ्याचा दरवाजा उघडेल. परंतु आजपर्यंत, कोणीही या शिलालेखाचा उलगडा करू शकला नाही.

‘कथितपणे’ लपवलेला खजिना शोधण्याचे अनेक प्रयत्न केले गेले परंतु व्यर्थ. खरं तर, एकदा ब्रिटीश सरकारच्या अधिकाऱ्यांनी गुहेच्या भिंतींना स्फोटके लावून उडवण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. या स्फोटांमुळे लेण्याच्या काही रचनेचे मात्र नुकसान झाले. या सर्व घडामोडींमुळे या लेण्यांभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे.

हे देखील वाचा

जयपूरमधील टेकड्यांमध्ये वसलेला हा ‘गलता’ कुंड कधीही आटत नाही!

यूकेमधील हे ‘पॉयझन गार्डन’ अशा वनस्पतींचे घर आहे ज्या कोणाचाही काटा काढू शकतात

प्रियांका गांधी ज्या कबीर मठात तीन दिवस राहिल्या होत्या तो मठ काशीचं सांस्कृतिक केंद्र आहे!

या लेण्यांचे चेंबर्स अतिशय सुंदर रीतीने पॉलिश केलेले आहेत. हे चेम्बर्स या लेण्यांच्या सौंदर्यात आणि वेगळेपणात भर घालतात. लेण्यांमध्ये आणि आजूबाजूला अनेक शिलालेख आहेत. हे शिलालेख या ठिकाणी यात्रेकरूंनी सोडले असावेत असाही एक समज आहे. शिवाय, गुहेचे संपूर्ण बांधकाम मौर्यन रॉक कट स्ट्रक्चर्ससारखे आहे. तसेच भारतातील शेवटच्या काही उपलब्ध रॉक कट लेण्यांमध्ये, सोन भंडार हे एक आहे. तसेच बिहार राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी हे एक महत्वाचे ठिकाण आहे. या लेण्यांशी संबंधित रहस्य उलगडण्यासाठी जगभरातील प्रवासी त्याला भेट देतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

स्कॉटलंडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाची जर्सी या १२ वर्षाच्या मुलीने डिझाईन केलीये

Next Post

ब्रिटिश आणि नाझींची बोलणी घडवून आणणारी ‘नाझी स्पाय प्रिन्सेस’ स्टेफनी

Heramb

Heramb

Related Posts

जयपूरमधील टेकड्यांमध्ये वसलेला हा ‘गलता’ कुंड कधीही आटत नाही!
भटकंती

जयपूरमधील टेकड्यांमध्ये वसलेला हा ‘गलता’ कुंड कधीही आटत नाही!

15 March 2022
यूकेमधील हे ‘पॉयझन गार्डन’ अशा वनस्पतींचे घर आहे ज्या कोणाचाही काटा काढू शकतात
भटकंती

यूकेमधील हे ‘पॉयझन गार्डन’ अशा वनस्पतींचे घर आहे ज्या कोणाचाही काटा काढू शकतात

11 March 2022
प्रियांका गांधी ज्या कबीर मठात तीन दिवस राहिल्या होत्या तो मठ काशीचं सांस्कृतिक केंद्र आहे!
भटकंती

प्रियांका गांधी ज्या कबीर मठात तीन दिवस राहिल्या होत्या तो मठ काशीचं सांस्कृतिक केंद्र आहे!

8 March 2022
इथले लोक बर्फाची शेती करून करोडोंची उलाढाल करतायत..!
भटकंती

इथले लोक बर्फाची शेती करून करोडोंची उलाढाल करतायत..!

25 February 2022
जाणून घ्या मातृसत्ताक कुटुंबपद्धती जपणाऱ्या ‘किहनू’ बेटाबद्दल…!
ब्लॉग

जाणून घ्या मातृसत्ताक कुटुंबपद्धती जपणाऱ्या ‘किहनू’ बेटाबद्दल…!

20 February 2022
वाचा दर सहा महिन्यांनी आपला देश बदलणाऱ्या फिझंट आयलंडबद्दल..!
भटकंती

वाचा दर सहा महिन्यांनी आपला देश बदलणाऱ्या फिझंट आयलंडबद्दल..!

12 February 2022
Next Post
ब्रिटिश आणि नाझींची बोलणी घडवून आणणारी ‘नाझी स्पाय प्रिन्सेस’ स्टेफनी

ब्रिटिश आणि नाझींची बोलणी घडवून आणणारी 'नाझी स्पाय प्रिन्सेस' स्टेफनी

अल्बर्ट आईन्स्टाईनने इस्राईलच्या राष्ट्राध्यक्षपदाची चालून आलेली संधी नाकारली होती

अल्बर्ट आईन्स्टाईनने इस्राईलच्या राष्ट्राध्यक्षपदाची चालून आलेली संधी नाकारली होती

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!