सिगरेट माणसांसाठीच नाही तर झाडांसाठीसुद्धा हानीकारक आहे..

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


“येथे धूम्रपानास सख्त मनाई आहे”, “ध्रुमापन आयुष्यासाठी घातक आहे, याने कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात”, “टार आपको बिमार.. बोहोत बिमार बना सकता है” अशा कित्येक जाहिराती, पाट्या तुम्ही पहिल्या असतीलच. सिगारेट काय, सिगारेटच्या नुसत्या धुराने सुद्धा, ती ओढणाऱ्या माणसाच्या आजूबाजूची माणसेही आजारी पडू शकतात.

सिगारेट, तंबाखू, हे सगळे आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. कॅन्सर, ट्युमर, दमा, असे कित्येक आजार धूम्रपानामुळे होतात. पण ते म्हणतात ना “कळतं पण वळत नाही” तशी आपली गत झाली आहे. आपण आपल्याच हाताने आपलाच विनाश ओढवून घेत आहोत.

सिगारेटमुळे नुसतेच तुमच्या किंवा तुमच्या जवळपासच्या लोकांनाच त्रास होतो असे नाही. पण, आपण ज्या पर्यावरणावर अवलंबून आहात त्यालासुद्धा फुकट भुर्दंड बसतो. हे यूकेस्थित अँग्लिया रस्किन यूनिवर्सिटीच्या “ईकोटॉक्सिकोलॉजी अँड एनवायरनमेंटल सेफ्टी” या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सिगारेटच्या टोकाचा निसर्गावर होणारा परिणाम दर्शविणारी जगातील हा पहिलाच रिपोर्ट आहे.

अँग्लिया रस्किन यूनिवर्सिटी (ARU) येथील बायोलॉजीचे सिनियर लेक्चरर डॉक्टर डेनियल ग्रीन म्हणतात,

“हा आमचा पहिलाच रिपोर्ट आहे जो या छोटाशा सिगारेटच्या टोकाचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम समोर आणते. झाडाचे बीज जमिनीत रुजल्यापासून झाड वाढेपर्यंत सगळी प्रक्रियाच या बटमुळे (सिगरेट संपल्यावर जे टोक फेकून देतात त्याला बट म्हणतात) बाधित होते. यावर त्वरित नियंत्रण मिळवले नाही तर आपली भरपूर हानी होईल.”

पृथ्वीवर सगळ्यांना पोषण देणारा, जागवणारा, वाढवणारा एकमेव स्त्रोत आहे, माती. झाडांपासून, माणसापर्यंत सगळे एकमेकांशी पर्यायाने या मातीशी जोडले गेले आहेत. जीवसृष्टीचे अस्तित्वच या मातीमुळे आहे.

आपल्यापैकी कोण सिगारेट ओढल्यानंतर सिगारेटचे हे बट काळजीपूर्वक फेकतो? त्या छोट्याश्या तुकड्यामुळे झाडांवर एवढे काय दुष्परिणाम होणार आहेत? हा प्रश्न बहुतेकांच्या मनात आलाच असेल. आज “फूड चेन”मध्ये प्रथम स्थानावर असलेल्या झाडांवर सिगारेटचा काय परिणाम होतो यावर थोडा प्रकाश टाकूया.

सिगारेट बट म्हणजे सिगारेटच्या शेवटी छोटंसं पिवळ्या रंगाच्या भागात बसवलेले फिल्टर. सिगारेट बटमध्ये सेल्यूलोज़ ऐसिटेट फाइबरद्वारा बनलेले फिल्टर असतात.  सिगारेट संपली की याचा काहीच उपयोग उरात नाही, ज्यामुळे ते फेकून द्यावे लागते.

हे सिगारेट बट बायोप्लास्टिकचेच एक स्वरूप आहे. इतर प्लॅस्टिकप्रमाणे याला रीसायकल व्हायला काही वर्षे तर लागतातच. सध्या मोठ्या प्रमाणावर सिगारेट ओढण्याचे फॅड आले आहे. भरपूर लोक सिगारेट तर ओढतात आणि ते निरुपयोगी सिगारेट बट फेकून देतात. त्यांना वाटते की ते मातीत आपोआप रिसायकल होईल. पण तसे होत नाही.

त्याचा झाडांवर खालील परिणाम होतो-

  1. झाडांची मुळे पातळ व नाजूक होणे सिगारेट बट मातीत फेकल्यामुळे त्यातील विषारी घटकांच्या संपर्कात येऊन जमिनीला भुसभुशीत, सुपीक करणारे बॅक्टरिया व इतर जीव नष्ट होतात. ज्यामुळे मुळांना पोषण मिळत नाही आणि मुळे नाजूक होतात. त्यांचे वजन ५८% नी कमी भरते. ज्यामुळे झाड जमिनीशी घट्ट जोडलेले राहुशकत नाही व त्याची एकूणच वाढ खुंटते.
  2. उंची खुंटणे – अपुरे पोषण मिळाल्यामुळे झाडाची नीट वाढ होत नाही. झाडांची उंची साधारण उंचीपेक्षा २७-२८% खुंटते.
  3. जैव विविधतेचा नाश – जगात दर वर्षी ४.५ ट्रिलियन सिगारेट बट जमिनीवर टाकल्या जाते. ज्यामुळे मुख्यतः चाऱ्यासाठी वापरल्या जणाऱ्या व्हाइट क्लोवर आणि रेग्रास या दोन गवताच्या प्रजातींना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचते आहे. या प्रजाती जैवविविधता, परागण आणि नाइट्रोजन स्थिरीकरणासाठी अत्यंत आवश्यक असतात.
  4. फुलं-फळं यांच्या उत्पादनात कपात – काही संशोधकांनी २ बगिच्यांचे निरीक्षण केले. दिवसाला तिथे येणाऱ्या लोकांद्वारे ५००-६०० सिगारेट बट टाकण्यात येत असत. यामुळे फुल झाडांना बहार येणे भरपूर प्रमाणात कमी झाले. त्याच प्रकारची झाडं इतर ठिकाणी, भरभरून बहरायची. हाच परिणाम फळझाडांवरसुद्धा होतो.
  5. अंकुरीकरणात घट होणे – मातीतून, पोषक तत्व मिळण्याऐवजी, सिगारेटीमुळे हानिकारक पदार्थ झाडांपर्यंत पोहोचतात. झाडांच्या नैसर्गिक अंकुरीकरणाच्या प्रक्रीयेवर या घटकांचा विपरीत परिणाम होतो ज्यामुळे झाडांची अंकुरीकरणाची महत्त्वाची प्रक्रिया विस्कळीत होते.

आपल्या शरीरासाठीसुद्धा अतिशय हानिकारक असलेल्या सिगारेटचे पर्यावरणावर सुद्धा दुष्परिणाम दिसून येतात. प्रकृतीचे तारतम्य अजून बिघडण्याआधीच सावरणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच सिगारेटचा वापर करणे शक्यतो टाळायला हवे. वाढते प्रदूषण आपल्याकडून जितके कमी करता येईल तितक्या प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा. पुढच्या पिढ्यांकरीता, इतर जीव जंतुंकरीतासुद्धा ही पृथ्वी सुजलाम् सुफलाम् ठेवूयात!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!