The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

साठी पार केलेले शशी थरूर आजही कित्येक मुलींच्या गळ्यातील ताईत आहेत

by द पोस्टमन टीम
15 July 2020
in मनोरंजन, राजकीय
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब 


केरळच्या तिरुअनंतपुरम मतदार संघातील कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतात. एकेकाळी संयुक्त राष्ट्राचे उपसरचिटणीस असलेले थरूर यांचे वैयक्तिक जीवन देखील तितकेच वादग्रस्त राहिले आहे. शशी थरूर एक प्रसिद्ध लेखक, स्तंभलेखक, पत्रकार आणि मानवी हक्काचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात.

२००६मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत ते भारताचे उमेदवार होते. या निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. ६४ वर्षाच्या थरूर यांचे व्यक्तिमत्व आजही फार आकर्षक आहे. शशी थरूर यांची विद्वत्तापूर्ण भाषणे ऐकणे ही अनेकांसाठी एक पर्वणीच असते.

अर्थात, थरूर राजकरणापेक्षा त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील घडमोडींमुळेच जास्त चर्चेत असतात. त्याच्या व्यक्तिगत जीवनावरून ते सतत वर्तमानपत्रांच्या आणि प्रसारमाध्यमांच्या मथळ्यांचा विषय असतात. त्यांनी आजपर्यंत तीनदा लग्न केले. दुर्दैवाने त्यांची तीनही विवाह अपयशी ठरली. परंतु, प्रत्येकवेळी शशी थरूर यांच्या या व्यक्तिगत आयुष्यातील घडामोडींवर पत्रकारांनी रान माजवले.

अर्थात, राजकारणासारख्या क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिगत जीवन ही खाजगी बाब उरतच नाही, ही गोष्ट वेगळी. आयुष्यात इतके चढउतार येऊनही थरूर आजही एक यशस्वी राजकारणी आणि लेखक आहेत.

शशी थरूर यांचा जन्म ९ मार्च १९५६ रोजी लंडनमध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांनी एक संपन्न आयुष्य अनुभवले आहे. त्यांचे पालक कधी देशात तर कधी विदेशात वास्तव्याला असत. त्यांचे मूळ गाव केरळच्या पलक्कड तालुक्यात येते.

शशी यांचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेजमधून पूर्ण झाले. थरूर अभ्यासात अव्वल होते. त्यात व्यक्तिमत्व इतके लोभस आणि राजबिंड की, कुणालाही भुरळ पडावी. ५ फुट ९ इंच अशी सडपातळ थरूर यांचा कॉलेजच्या दिवसातील जलवा काही औरच होता. हुशार, स्मार्ट आणि सभ्य असे थरूर कॉलेजमध्येही प्रसिद्ध होते. कॉलेजच्या विविध स्पर्धा, कार्यक्रम, संमेलन यात त्यांचा सहभाग असायचा. मुलींमध्ये तर त्यांची वेगळीच क्रेझ होती.

हे देखील वाचा

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

त्याचं पाहिलं प्रेम होतं तिलोत्तमा मुखर्जी. तिलोत्तमा दिसायला खूपच सुंदर होत्या. जितक्या सुंदर तितक्याच बुद्धिमानही. थरूर यांच्यापेक्षा वयाने थोड्या मोठ्या होत्या. कॉलेजच्या दिवसांत दोघांची ओळख झाली.

तिलोत्तमाचे आजोबा कैलाशनाथ काटजू हे नेहरूंच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. तिलोत्तमा अभ्यासात हुशार होती. कॉलेजच्या वक्तृत्व आणि वाद-विवाद स्पर्धेत सहभागी होत असे. कलकत्त्याच्या प्रसिद्ध लॉरेट हाउस आणि कॉलेजमधून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.

त्या दोघांची जोडी अगदी शोभून दिसायची. दोघांकडे पाहून परफेक्ट कपल असल्याचे म्हंटले जायचे.

लग्नानंतर तिलोत्तमा सिंगापूरच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर म्हणून रूजू झाल्या. त्याचवेळी शशी संयुक्त राष्ट्राशी जोडले गेले. दोघांनाही करिअरमध्ये यश मिळत होते, उत्तरोत्तर प्रगती होत होती. शिवाय जगभरात थरूर यांचे नावही होत होते. दोघांना जुळे अपत्य झाले. कनिश्क आणि ईशान.

परंतु, दोघांच्यात काही कारणावरून दरी वाढत गेली आणि २००७ मध्ये शशी आणि तिलोत्तमा यांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. तिलोत्तमा सध्या न्युयॉर्क युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आहेत.

थरूर आणि तिलोत्तमा यांच्यात दुरावा निर्माण होण्याचे कारण म्हणजे कॅनडाची चेरीस्टा गिल्स आहे असे म्हणतात. चेरीस्टा संयुक्त राष्ट्राच्या एका विभागात काम करणारी सेक्रेटरी होती. चेरीस्टा आणि थरूर यांच्यातील जवळीकता वाढत चालली. संयुक्त राष्ट्राच्या परिसरातही दोघांबद्दल बऱ्याच चर्चा सुरु होत्या.

गिल्स आणि थरूर यांच्यातील वाढत्या जवळीकीमुळे त्यांचे पहिले लग्न तुटले असल्याचे म्हटले जाते. २००७ मध्ये त्यांनी चेरीस्टाशी दुसरे लग्न केले.

शशी थरूर आता संयुक्त राष्ट्राच्या अंडर सेक्रेटरी पदापर्यंत पोचले होते. २००६मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासचिव पदासाठी निवडणूक देखील लढवली होती. परंतु त्यांना या निवडणुकीत हार पत्करावी लागली. त्यानंतर त्यांनी भारतीय राजकरणात प्रवेश केला. त्यांनी कॉंग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. २००९ साली त्यांनी तिरुअनंतपुरम मधील लोकसभेसाठी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

२०१०मध्ये त्यांना मनमोहनसिंग सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आले. त्यानंतर मानवविकास राज्यमंत्रीपद देण्यात आले. मंत्रीपदी असताना कोणत्या न कोणत्या कारणाने ते सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असत.

एकीकडे भारतीय राजकारणात त्यांचा प्रभाव वाढत असतानाच त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र चढ-उतार सुरु होते. चेरीस्टाला भारतातील जीवनशैलीशी जुळवून घेणे कठीण जात होते. शिवाय आता, सुनंदा पुष्करसोबत शशी थरूर यांचे नाव जोडले जात होते याकारणानेही दोघांच्या नात्यात दरी निर्माण झाली.

२०१०मध्ये थरूर आणि चेरीस्टा यांनी घटस्फोट घेतला.

या घटस्फोटानंतर काही महिन्यातच थरूर तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकले. सुनंदा पुष्कर आणि शशी थरूर यांच्या या लग्नाची प्रसारमाध्यमातून खूप चर्चा झाली. सुनंदा बिझनेसवूमन होत्या. शशी थरूर यांच्यासोबत अनेक कार्यक्रमात त्यांना एकत्र पहिले जात होते, त्यामुळे त्याच्या संबंधाबद्दल आधीपासूनच बातम्या पसरत होत्या.

सुनंदा यांचा देखील हा तिसरा विवाह होता. यापूर्वी त्यांचाही दोनवेळा घटस्फोट झाला होता. या लग्नाची जोरात चर्चा झाली असली तरी हे लग्न फक्त चार वर्षेच टिकू शकले. सुनंदाच्या रहस्यमय मृत्यूमुळे शशी थरूर यांच्या वाट्याला पुन्हा एकटेपणा आला.

या दरम्यान पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्यासोबत शशी यांचे सुत जुळल्याच्या चर्चा सुरु होत्या. मेहेर यांनी आपल्या ट्विटर वरून शशी थरूर यांना उद्देशून अनेक व्यक्तिगत ट्वीट केले होते. त्यांच्या या ट्विट प्रकरणाची चर्चा सुरु झाली तेंव्हा त्यांनी आपले ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले.

सुनंदाने देखील ट्विटर वरून यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. सुनंदाने असा आरोप लावला की, मेहर माझ्या पतीसोबत फ्लर्ट करत आहे. सुनंदा आणि मेहेर यांच्यात हे ट्विट युद्ध बराच काळ सुरु राहिले.

शेवटी सुनंदा आणि थरूर यांनी आपसात समझोता केला आणि हे प्रकरण काहीशा वेगळ्या स्वरुपात चर्चिले गेल्याचा खुलासा करणारी फेसबुक पोस्ट दोघांनीही आपापल्या वॉलवरून शेअर केली. प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाला जास्त हवा देऊ नये, असेही त्यांनी म्हटले.

या प्रकरणानंतर सुनंदा यांची तब्येत अचानक खालावली. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. दिल्लीच्या लीला हॉटेलमध्ये त्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या हा मृत्यू संशयास्पद असल्याच्या चर्चाही बराच काळ सुरु राहिली.

यात थरूर यांचा हात असल्याचेही आरोप झाले. परंतु, सुनंदा यांनी औषधाचे ज्यादा डोस घेतल्याच्या कारणावरून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

ADVERTISEMENT

व्यक्तिगत आयुष्यात इतकी वादळे आली तरी आजही शशी थरूर हे कॉंग्रेस नेते म्हणून सक्रीय आहेत. राजकारणातील त्यांचे प्रस्थ वाढते आहे. देशातील अनेक घडामोडींवर स्वतःच्या शैलीने ते टीकाटिप्पणी करत असतात. विशेषत: ट्विटरवरून त्यांची मतमतांतरे ते सातत्याने व्यक्त करत असतात.

विशेष म्हणजे, साठी पार केलेल्या शशी यांच्या व्यक्तिमत्वाची चमक आणि आकर्षकता आजही कायम आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweetShare
Previous Post

वेगळ्या वाटेने जाऊन सैन्यात भरती झालेली प्रिया आज कित्येक मुलींसमोर आदर्श आहे

Next Post

फर्जंद आणि फत्तेशिकस्तमधल्या चुका जंगजौहरमध्ये तरी सुधरतील का…?

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

मनोरंजन

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

31 January 2023
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

7 September 2022
मनोरंजन

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

4 June 2022
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
विश्लेषण

रशिया दुसऱ्या महायुद्धापासून जपानच्या या बेटांवर ठाण मांडून बसलाय!

18 May 2022
राजकीय

पंतप्रधान असताना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करून इम्रान खानने पाकिस्तानची लाज काढलीये!

18 May 2022
Next Post

फर्जंद आणि फत्तेशिकस्तमधल्या चुका जंगजौहरमध्ये तरी सुधरतील का...?

आकाशवाणीच्या ऑडिशनमध्ये रिजेक्ट झालेले अमीन सयानी आकाशवाणीची ओळख बनले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)