The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

आपल्याला वर्ल्डकप फायनलमधून घरी पाठवणाऱ्या रिकी पॉन्टिंगवरचा राग अजूनही गेला नाही…!

by द पोस्टमन टीम
19 December 2021
in क्रीडा
Reading Time: 1 min read
A A
0
आपल्याला वर्ल्डकप फायनलमधून घरी पाठवणाऱ्या रिकी पॉन्टिंगवरचा राग अजूनही गेला नाही…!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


गावामध्ये किंवा शहरातील एखाद्या चौकात दहा-बारा टारगट पोरांचं एक टोळकं असतं. काहींना काही कुरापती करून आसपासच्या लोकांना त्रास देणं, हेच या टोळक्याचं काम असतं. एखादा पैशावाला पंटर या पोरांचा म्होरक्या असतो. त्याच्याच जीवावर ही टारगट पोरं उड्या मारत असतात. २००० च्या दशकात क्रिकेटमध्ये सुद्धा एक असचं टोळकं होतं आणि एक पंटर त्यांचा म्होरक्या होता. या पंटरनं ऑस्ट्रेलियन क्रिकेटला सर्वाथानं एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं.

खेळ असो किंवा मैदानावरील कुरापती अशा सगळ्याच गोष्टी या पंटरनं आपल्या टीमला मनमोकळेपणानं करू दिल्या. एव्हाना तुमच्या लक्षात आलचं असेल मी कुणाबद्दल बोलत आहे. हा पंटर दुसरा-तिसरा कुणी नसून दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पाँटिंगच आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेटमधील तीव्र शत्रुत्व जगजाहीर आहे.

मैदानावरील या शत्रुत्वाच्या ठिणगीला वेळोवळी हवा देण्याचं काम करणारा इमानदार शिलेदार म्हणून रिकी पाँटिंगला भारतीय ओळखतात. मात्र, सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन रिकीला पाहिल्यास तो एक धूर्त कॅप्टन आणि दिग्गज बॅट्समन होता, ही गोष्ट नाकारता येत नाही. कुणाचीही पर्वा न करता फक्त आपल्या टीमचा विचार करणाऱ्या ऑस्ट्रेलियन पंटरचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख..

रिकी पाँटिंग हा त्याच्या पिढीतील सर्वात बिनधास्त खेळाडू होता. त्याच्यामध्ये एक ऑस्ट्रेलियन असल्याचे सर्व घटक जरा जास्तच होते. पाषाणासारखा कठोर, ॲग्रेसिव्ह, फटकळ आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे दबावाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी असलेली शक्तिशाली मानसिकता यांचा धोकादायक संगम त्याच्या व्यक्तीमत्वामध्ये झालेला होता. प्रत्येक सिरीजमध्ये नवीन विक्रम जमवण्याची कामगिरी करण्यासाठी कमालीचे कौशल्यं लागतात.

ऑस्ट्रेलियाचा ४२वा टेस्ट कॅप्टन म्हणून त्यानं केलेली कामगिरी त्याच्या क्षमतेचं द्योतक आहे. माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार ॲलन बॉर्डरच्या यांच्या शब्दात सांगायच झाल्यास, “Ponting wears his heart on his sleeve”. १९ डिसेंबर १९७४ रोजी जन्मलेल्या पाँटिंगनं ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा आणि शतकं केलेली आहेत. तो कसोटी क्रिकेटमधला ऑस्ट्रेलियाचा सर्वांत यशस्वी आणि तीन वेळा विश्वचषक जिंकणारा कर्णधार आहे. टास्मानियामधील एका छोट्याशा गावातून आलेल्या पाँटिंगनं जगावर राज्य केलं आणि क्रिकेट इतिहासावर आपली अमिट छाप सोडली आहे.

एक जागतिक दर्जाचा फलंदाज आणि चॅम्पियन संघाचा दृढनिश्चयी नेता म्हणून रिकी पाँटिंग, क्रिकेट चाहत्यांच्या कायम लक्षात राहील.

ADVERTISEMENT

रिकी पाँटिंग हा मध्यमवर्गीय कुटुंबातून आला होता. त्याला विविध क्रीडा प्रकारांचा समृद्ध वारसा लाभला. त्याचे वडील ग्रॅमी यांनी लहानपणी गोल्फपटू होण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय ते क्रिकेट आणि ऑसी रुल्स फुटबॉलही खेळत होते. तर पाँटिंगची आई लॉरेन टास्मानियासाठी विगोरो खेळत होत्या. हा खेळ क्रिकेट आणि टेनिस यांचे मिश्रण असल्याचे म्हटले जाते. याशिवाय लॉरेन स्थानिक पातळीवर नेटबॉल आणि बॅडमिंटन खेळण्यासाठीही प्रसिद्ध होत्या.

हे देखील वाचा

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

पाकिस्तानमध्ये त्यांच्याच विरोधात वीरू पाजीनं भारताचं कसोटीतील पहिलं त्रिशतक ठोकलं होतं!

टेस्ट क्रिकेटची बादशहा असलेली न्यूझीलंडची टीम २६ धावांवर ऑल आऊट झाली होती

तीन भावंडांमध्ये सर्वात थोरला असलेला रिकी आपल्या पाठच्या भावाला हाताशी धरून घराच्या बॅकयार्डमध्ये तासन्-तास क्रिकेट खेळायचा. त्याला क्रिकेटचं प्रचंड वेड होतं. पाँटिंगनं आपल्या वडिलांसोबत टास्मानियातील लॉन्सेस्टन येथील मॉब्रे क्रिकेट क्लबसाठी क्रिकेट खेळलं. ही त्याची खरी सुरुवात होती. एका सामन्यात तर त्यानं आणि त्याच्या वडिलांनी एकत्र फलंदाजीही केली होती. त्यानंतर त्याला इयान यंग यांच्या छत्रछायेखाली पाठवण्यात आलं.

इयानं यांचा मुलगा शॉन देखील क्रिकेट खेळायचा. इयाननं शॉन आणि रिकी दोघांनाही प्रशिक्षण दिलं. पुढे इयानच्या या दोन्ही शिष्यांनी १९९७ साली ऑस्ट्रेलियासाठी एकत्र ॲशेस टेस्ट खेळली. आपल्या मुलापेक्षाही रिकीवर इयानचा जास्त जीव होता. पाँटिंगनंदेखील आपल्या गुरूला शेवटपर्यंत अंतर दिलं नाही.

क्रिकेटसोबत पाँटिंगला फुटबॉल देखील प्रचंड आवडायचं. मात्र, वयाच्या १५ व्या वर्षी कोपराला दुखापत झाल्यानंतर त्यानं फुटबॉल सोडला. त्यानंतर क्रिकेट खेळता यावं म्हणून इयत्ता १०वीनंतर शाळाही सोडून दिली. क्रिकेट पहायला आणि खेळायला मिळावं म्हणून तो काहीही करण्यास तयार होता. लहान असताना त्यानं शेफिल्ड शिल्ड गेम्समध्ये स्कोअरबोर्ड क्रू सोबत काम केलं होतं. या कामासाठी त्याला दिवसाकाठी २० ऑस्ट्रेलियन डॉलर्स मिळायचे.

पालकांचा विरोध पत्करून शाळा सोडल्यामुळं त्याला नोकरीची गरज भासू लागली होती. यावेळी त्याला इयान यंग यांनी मदत केली. त्यांनी त्याला स्कॉच ओकबर्न कॉलेज नावाच्या शाळेत ग्राउंड स्टाफची नोकरी मिळवून दिली. या नोकरीमुळं त्याला सतत क्रिकेटजवळ राहता आलं.

१९९२ हे वर्ष रिकीच्या आयुष्यातील महत्त्वाचं वर्ष ठरलं. यावर्षी तो ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकॅडमीमध्ये होता. याच ठिकाणी त्याची आणि सचिन तेंडुलकरची पहिली भेट झाली होती. १९९२ सालीच त्याला त्याचे भविष्यातील भरोशाचे साथीदार भेटले होते. ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकॅडमीच्या संघासोबत रिकी पाँटिंग, ॲडम गिलख्रिस्ट आणि ग्लेन मॅकग्रा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेले होते.

त्यानंतर ॲडिलेड अकॅडमीमध्ये त्याची आणि शेन वॉर्नची पहिली भेट झाली. तोपर्यंत शेन वॉर्ननं टेस्ट क्रिकेटमध्ये जागा मिळवलेली होती. डॉग रेसिंगच्या आवडीमुळं दोघांची खूप पटकन मैत्री झाली. जेव्हा केव्हा वॉर्नला सराव करायचा असेल तेव्हा तो पाँटिंगला बॅटिंगसाठी बोलवून घ्यायचा. रिकी पाँटिंगला ‘पंटर’ हे नाव देण्यामागे शेन वॉर्नच होता.

रिकी पाँटिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची आकडेवारी एव्हाना आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यानं मैदानात किती कांड केलेले आहेत हेही सर्वांना माहिती आहे. मात्र, या व्यतिरिक्त तो एक लेखकदेखील आहे ही गोष्ट अनेकांना माहिती नाही. त्यानं आतापर्यंत ‘ब्रायन मुर्गाट्रॉयड’ (२००३,२००४,२००५), ‘ज्योफ आर्मस्ट्राँग’ (२००६,२००७,२००८,२००९), ‘पाँटिंग: ॲट द क्लोज ऑफ प्ले’ (२०१३) ही पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत. एक जागतिक दर्जाचा फलंदाज आणि चॅम्पियन संघाचं दृढनिश्चयी नेतृत्व म्हणून रिकी पाँटिंग क्रिकेट चाहत्यांच्या कायम लक्षात राहील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

नासाचं हे अवकाशयान चक्क सूर्याला स्पर्श करून आलंय..!

Next Post

जॉनी लीव्हरने हृतिक रोशनच्या लिव्हरचं दुखणं जिझसचं नाव घेऊन दूर केलं होतं म्हणे..!

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली
क्रीडा

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
पाकिस्तानमध्ये त्यांच्याच विरोधात वीरू पाजीनं भारताचं कसोटीतील पहिलं त्रिशतक ठोकलं होतं!
क्रीडा

पाकिस्तानमध्ये त्यांच्याच विरोधात वीरू पाजीनं भारताचं कसोटीतील पहिलं त्रिशतक ठोकलं होतं!

16 April 2022
टेस्ट क्रिकेटची बादशहा असलेली न्यूझीलंडची टीम २६ धावांवर ऑल आऊट झाली होती
क्रीडा

टेस्ट क्रिकेटची बादशहा असलेली न्यूझीलंडची टीम २६ धावांवर ऑल आऊट झाली होती

15 April 2022
ICC नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम आजही इंग्लंडचा हा क्लब बनवतो..!
क्रीडा

ICC नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम आजही इंग्लंडचा हा क्लब बनवतो..!

15 April 2022
रस्त्यावर भाजी विकणारा १८ वर्षांचा तिरंदाज भारतासाठी विश्वचषकाचं ‘लक्ष्य’ गाठणार आहे!
क्रीडा

रस्त्यावर भाजी विकणारा १८ वर्षांचा तिरंदाज भारतासाठी विश्वचषकाचं ‘लक्ष्य’ गाठणार आहे!

14 April 2022
तब्बल १६ तास ६७३ चेंडूंचा सामना करत या पठ्ठ्यानं ब्रायन लाराचा विक्रम मोडून काढलाय!
क्रीडा

तब्बल १६ तास ६७३ चेंडूंचा सामना करत या पठ्ठ्यानं ब्रायन लाराचा विक्रम मोडून काढलाय!

13 April 2022
Next Post
जॉनी लीव्हरने हृतिक रोशनच्या लिव्हरचं दुखणं जिझसचं नाव घेऊन दूर केलं होतं म्हणे..!

जॉनी लीव्हरने हृतिक रोशनच्या लिव्हरचं दुखणं जिझसचं नाव घेऊन दूर केलं होतं म्हणे..!

‘रेअर अर्थ एलिमेंट्स’वरची चीनची मक्तेदारी जगासाठी डोकेदुखी ठरत आहे.

'रेअर अर्थ एलिमेंट्स'वरची चीनची मक्तेदारी जगासाठी डोकेदुखी ठरत आहे.

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!