The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाचा निवेथन राधाकृष्णन दोन्ही हातांनी बॉलिंग करून बॅटर्सला कन्फ्युज करतोय

by द पोस्टमन टीम
19 January 2022
in क्रीडा
Reading Time: 1 min read
A A
0
ऑस्ट्रेलियाचा निवेथन राधाकृष्णन दोन्ही हातांनी बॉलिंग करून बॅटर्सला कन्फ्युज करतोय

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


थ्री इडियट्स चित्रपटामध्ये कॅरेक्टरर्सची ओळख परेड सुरू असताना कॉलेजच्या डिरेक्टरची म्हणजे विरू सहस्त्रबुद्धेची ओळख खूप अतरंगीपणे करून देण्यात आलेली आहे. विरू सहस्त्रबुद्धे (व्हायरस) एकाच वेळी दोन्ही हातानं लिहू शकत होता. व्हायरसचा हा गुण पाहून मला कायम आश्चर्य वाटलं होतं. एखादी व्यक्ती एकच काम दोन्ही हातांनी कशी करू शकते? हा प्रश्न मला पडला होता. त्यानंतर मी अशा एका व्यक्तीच्या शोधात होते, जो प्रत्यक्षपणे एक काम दोन्ही हातांनी करू शकतो.

गेल्या (डिसेंबर) महिन्यात जेव्हा अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन टीमची घोषणा झाली तेव्हा माझा हा शोध थांबला! आता तुम्ही म्हणाल ऑस्ट्रेलियन अंडर १९ क्रिकेट टीम आणि रियल लाईफ व्हायरच्या शोधाचा काय संबंध? या प्रश्नाचं उत्तर निवेथन राधाकृष्णन या भारतीय वंशाच्या बॉलरकडे पाहून मिळेल.

सध्या वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपचा थरार सुरू आहे. १४ जानेवारीपासून सुरू झालेली ही स्पर्धा ५ फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे. एकूण १६ टीम विश्वविजेते पदासाठी एकमेकांसोबत भिडणार आहेत. स्पर्धेतील पहिला सामना यजमान वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान रंगला. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियानं आपल्या मोहिमेला विजयी सलामी दिली. 

अंडर १९ वर्ल्डकपमधील पहिला सामना ऑस्ट्रेलियानं जिंकूनही चर्चा मात्र, एका भारतीयाची सुरू होती. हा भारतीय म्हणजेच निवेथन राधाकृष्णन होता. सध्या ऑस्ट्रेलियन टीमचा भाग असलेला निवेथन सामान्य बॉलर नाही. तो आयसीसी वर्ल्डकप खेळणारा पहिला ‘ऍम्बिडेक्टरस’ बॉलर आहे. म्हणजे तो दोन्ही हातांनी सारख्याच गुणवत्तेची बोलिंग करू शकतो.

‘ऍम्बिडेक्टरस’ ही टर्म काय आहे? हे आपण अगोदर समजून घेऊया. तुम्ही अनेकदा उजव्या हातानं जेवणारी व डाव्या हातानं लिहिणारी किंवा डाव्या हातानं जेवणारी व उजव्या हातानं लिहिणारी व्यक्ती पाहिली असेल. ऍम्बिडेक्टरेसिटी यापेक्षा थोडी वेगळी आहे. ऍम्बिडेक्टरेसिटीला मराठीमध्ये आपण उभयनिष्ठता म्हणू शकतो. या स्थितीमध्ये उजवा आणि डावा दोन्ही हात समान रीतीने वापरण्याची क्षमता असते. जगभरातील केवळ एक टक्का लोक नैसर्गिकरित्या ऍम्बिडेक्टरस आहेत. यामुळं आपल्या जवळपास अशी व्यक्ती आढळणं कठीणच आहे अन् त्यातली त्यात असा एखादा बॉलर सापडणं त्याहून कठीण. त्यामुळं आतापर्यंत इंटरनॅशनल लेव्हलवर हाताच्या बोटावर मोजण्याइतके ऍम्बिडेक्टरस बॉलर खेळताना दिसले आहेत. मात्र, त्यांनाही म्हणावं असं यश मिळालेलं नाही. आतापर्यंत रॉबिन पीटरसन (दक्षिण आफ्रिका), जॉर्ज बेली (ऑस्ट्रेलिया), औशिक श्रीनिवास(तामीळनाडू) आणि अक्षय कर्णेवार (महाराष्ट्र) या बॉलर्सनं दोन्ही हातांनी बॉलिंग केलेली आहे. या ऍम्बिडेक्टरस क्लबमध्ये आता भारतीय वंशांचा ऑस्ट्रेलियन बॉलर निवेथन राधाकृष्णनचा समावेश झाला आहे.

एकोणीस वर्षीय निवेथन दोन्ही हाताने स्पिन बॉलिंग करू शकतो. याशिवाय तो उत्कृष्ट बॅटरदेखील आहे. त्याच्या या कौशल्यामुळं अंडर १९ वर्ल्डकपमधील पहिल्याच सामन्यानंतर तो ‘वंडर बॉय’ बनला आहे. इंटरनॅशनल लेव्हलवर ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या निवेथनचा जन्म भारतात झालेला आहे. २५ नोव्हेंबर २००२ रोजी तामिळनाडूतील डिंडीगुल जिल्ह्यात निवेथन राधाकृष्णननचा जन्म झाला. राधाकृष्णनचे वडील अंबू सेल्वन हे सुद्धा क्रिकेटर होते. त्यांनी तामिळनाडूकडून ज्युनिअर स्तरावर क्रिकेट खेळलं होतं. २०१३मध्ये निवेथन १० वर्षांचा असताना त्याचं कुटुंब ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये स्थायिक झालं.

सिडनीमध्ये गेल्यानंतर निवेथननं न्यू साऊथ वेल्स टीममध्ये जागा मिळवली. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतरही त्यानं भारताशी आपली नाळ तोडली नाही. त्यानं २०१७ आणि २०१८ मध्ये तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये (TNPL) सहभाग घेतला होता. टीएनपीएलमधील कराईकुडी कालाई आणि डिंडीगुल ड्रॅगन्स या संघांमध्ये त्याचा होता. मात्र, त्याला प्रत्यक्षात सामने खेळता आले नाही. असं असलं तरी तो तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या अनेक स्पर्धांमध्ये खेळलेला आहे.

हे देखील वाचा

पाकिस्तानमध्ये त्यांच्याच विरोधात वीरू पाजीनं भारताचं कसोटीतील पहिलं त्रिशतक ठोकलं होतं!

टेस्ट क्रिकेटची बादशहा असलेली न्यूझीलंडची टीम २६ धावांवर ऑल आऊट झाली होती

ICC नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम आजही इंग्लंडचा हा क्लब बनवतो..!

२०१९ मध्ये पाकिस्तान विरुद्ध दुबई येथे झालेल्या सामन्यांमध्ये अंडर-१६ ऑस्ट्रेलियन संघाकडून निवेथन खेळला होता. चार एक दिवसीय सामन्यांमध्ये त्यानं सातच्या स्ट्राइक रेटसह सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. २०२० मध्ये त्याला बिल ओ’रेली मेडलनं गौरवण्यात आलं होतं आणि बेसिल सेलर्स स्कॉलरशिप देखील मिळाली होती.

गेल्यावर्षी निवेथन इंडियन प्रीमियर लीगमधील दिल्ली कॅपिटल्ससाठी नेट बॉलर होता. त्याच वर्षी, त्यानं टास्मानियन टायगर्स या संघासोबत आपला व्यावसायिक करार केला. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर निवेथन राधाकृष्णननं ऑस्ट्रेलियाच्या अंडर १९ टीममध्ये जागा मिळवली. 

वर्ल्डकपपूर्वी भारताविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात राधाकृष्णनला फारसा प्रभाव टाकता आला नव्हता. त्यानं भारताविरुद्ध एकही विकेट न घेता ८ ओव्हर्समध्ये ४० रन्स दिले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मुख्य सामन्यात मात्र, त्यानं चमकदार कामगिरी करून आपल्या टीमला विजय मिळवून दिला.

निवेथन वेस्ट इंडिजचे माजी ऑलराऊंडर सर गारफिल्ड सोबर्स यांना आपला आदर्श मानतो. याशिवाय त्याला रिकी पाँटिंगची बॅटिंगदेखील आवडते. दिल्ली कॅपिटल्ससाठी नेट बॉलिंग करताना त्यानं कोच असलेल्या रिकीकडून अनेक टीप्स मिळवल्या होत्या. त्याचा आपल्याला फायदा झाल्यानं निवेथन म्हणतो. याशिवाय मैदानावर असताना आपल्याला शिस्त पाळायला आवडतं असंही त्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

सामना खेळत असताना जेव्हा त्याला ऑल्टरनेटिव्ह बॉलिंग करायची असते, तेव्हा अंपाला पूर्व कल्पना देऊनच तो बदल करतो. मात्र, या नियमाबाबत त्याला आक्षेपदेखील आहे. बॅटिंग करताना प्लेयर कधीही स्टान्स साईड बदलू शकतो. त्याला पूर्व कल्पना द्यावी लागत नाही. बॉलर्सला मात्र, तशी परवानगी नाही. आम्हाला बॉलिंग हँड बदलताना परवानगी घ्यावी लागते, असं निवेथन म्हणाला होता.

सध्या ऑस्ट्रेलियाच्या अंडर-१९ वर्ल्डकप टीममध्ये निवेथन शिवाय आणखी एक भारतीय वंशाचा खेळाडू आहे. निवेथन राधाकृष्णनप्रमाणंच हरकीरत बाजवा हा १७ वर्षीय भारतीय खेळाडूही ऑस्ट्रेलियासाठी ऑफ-स्पिन बॉलिंग करतो. तोदेखील ऑस्ट्रेलिया अंडर-१६ संघाकडून खेळला आहे. २०१२मध्ये त्याचे कुटुंब मोहालीहून ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेलं आहे. हरकिरतचे वडील बलजीत मोहालीमध्ये इंजिनियर होते आणि पीसीए स्टेडियम बांधणाऱ्या टीमचा ते भाग होते.

प्रत्यक्ष सामन्यांमध्ये ज्या प्रमाणं निवेथननं चांगली कामगिरी केली आहे, ती पाहता हरकिरतला संधी मिळेल की नाही याबाबत शंका आहे. मात्र, सध्या निवेथनची गाडी सुसाट सुटलेली आहे. त्यानं अशाच पद्धतीनं कामगिरी केली तर ऑस्ट्रेलियाच्या मुख्य संघात जागा मिळवण्यापासून त्याला कुणीही रोखू शकणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

ना कुठे नोंदणी ना कुठे मुख्यालय, तरीही बायनान्स जगातील सर्वात मोठं क्रिप्टो करन्सी एक्स्चेंज बनलंय

Next Post

ॲन फ्रँकला दगा कोणी दिला याचा एवढ्या वर्षांनी का होईना पण उलगडा झालाच!

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

पाकिस्तानमध्ये त्यांच्याच विरोधात वीरू पाजीनं भारताचं कसोटीतील पहिलं त्रिशतक ठोकलं होतं!
क्रीडा

पाकिस्तानमध्ये त्यांच्याच विरोधात वीरू पाजीनं भारताचं कसोटीतील पहिलं त्रिशतक ठोकलं होतं!

16 April 2022
टेस्ट क्रिकेटची बादशहा असलेली न्यूझीलंडची टीम २६ धावांवर ऑल आऊट झाली होती
क्रीडा

टेस्ट क्रिकेटची बादशहा असलेली न्यूझीलंडची टीम २६ धावांवर ऑल आऊट झाली होती

15 April 2022
ICC नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम आजही इंग्लंडचा हा क्लब बनवतो..!
क्रीडा

ICC नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम आजही इंग्लंडचा हा क्लब बनवतो..!

15 April 2022
रस्त्यावर भाजी विकणारा १८ वर्षांचा तिरंदाज भारतासाठी विश्वचषकाचं ‘लक्ष्य’ गाठणार आहे!
क्रीडा

रस्त्यावर भाजी विकणारा १८ वर्षांचा तिरंदाज भारतासाठी विश्वचषकाचं ‘लक्ष्य’ गाठणार आहे!

14 April 2022
तब्बल १६ तास ६७३ चेंडूंचा सामना करत या पठ्ठ्यानं ब्रायन लाराचा विक्रम मोडून काढलाय!
क्रीडा

तब्बल १६ तास ६७३ चेंडूंचा सामना करत या पठ्ठ्यानं ब्रायन लाराचा विक्रम मोडून काढलाय!

13 April 2022
आपल्या मित्राच्या अस्थि विसर्जित करायला स्टीव्ह वॉ चक्क वाराणसीत आला होता!
क्रीडा

आपल्या मित्राच्या अस्थि विसर्जित करायला स्टीव्ह वॉ चक्क वाराणसीत आला होता!

13 April 2022
Next Post
ॲन फ्रँकला दगा कोणी दिला याचा एवढ्या वर्षांनी का होईना पण उलगडा झालाच!

ॲन फ्रँकला दगा कोणी दिला याचा एवढ्या वर्षांनी का होईना पण उलगडा झालाच!

या परदेश मंत्र्यांनी युएनमध्ये चुकून चक्क पोर्तुगीज मंत्र्याचं भाषण वाचलं होतं!

या परदेश मंत्र्यांनी युएनमध्ये चुकून चक्क पोर्तुगीज मंत्र्याचं भाषण वाचलं होतं!

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!