बांधावर लावलेल्या शेवग्याच्या झाडांपासून वर्षाला साडेपाच लाख रुपये उत्पन्न!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


महाराष्ट्र राज्य हे वातावरण बदलाला अनुकूल आशा सेंद्रिय पीकपद्धतीचा वापर करण्यासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. सुपर फूड म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेवगाच्या शेंगेचं उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. महाराष्ट्रात दुष्काळी पट्टा मोठा असल्याने या पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं कारण अत्यल्प पाण्याची गरज ह्या पिकाला असते.

सांगली, सोलापूर, नाशिक, पुणे आणि यवतमाळ येथील काही शेतकऱ्यांनी एकत्रितपणे शेवग्याच्या शेंगाचं उत्पादन सुरू केलं असून एका मेसेंजिंग ऍपच्या माध्यमातून शहरी भागात एक खूप जास्त आरोग्यवर्धक खाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या शेवग्याच्या शेंगांना तिथल्या मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलं आहे.

शेवगाची शेंग उर्फ मोरिंगा हे एक प्रकारचे होर्टिकल्चर पद्धतीने उगवले जाणारे झाड असून फक्त सहा महिन्यात हे झाड संपूर्णपणे वाढून शेंगा उत्पादित करायला लागते. ह्या झाडाला सरासरी नऊ वर्षाचे आयुर्मान असते. त्यात कॅल्शियमचा मोठा साठा असतो. तसेच इतर अनेक जीवनावश्यक तत्व ह्या शेवगाच्या शेंगांमध्ये असतात. दक्षिणेकडील सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ असलेल्या सांभरमध्ये शेवगाच्या शेंगांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

 

मोरिंगा ओलिफेरा असे या झाडाचे शास्त्रीय नाव असून मुरुंगाई ह्या तमिळ शब्दावरून त्याचा इंग्रजी अपभ्रंश मोरिंगा असा झाला आहे. तर ओलिफेरा हे लॅटिन भाषेतील नाव आहे. ज्याचा अर्थ तेलयुक्त असा होतो. या बियांमधून आलेल्या रोपांच्या फक्त फांद्यांची काळजी घ्यावी लागते.

या रोपांसाठी आपल्याला विशेष काही पाण्याचे व्यवस्थापन करावे लागत नाही. ह्यामुळे हे पीक महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं.

या झाडाच्या प्रत्येक अंगाचा उपयोग आहे. बिया, खोड, फांद्या, पाला, शेंगा आणि फुलं हे प्रत्येक अंग उपयोगी येण्यासारखं असून ह्याचा वापर युनानी आणि आयुर्वेदिक औषध निर्मितीसाठी केला जातो.

भारताच्या हवामान खात्यानुसार महाराष्ट्राच्या अनेक भागात वर्षाकाठी ५५% इतके कमी पावसाचे प्रमाण आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्यात मोठ्या दुष्काळाचा सामना लोकांना करावा लागतो. बाकी भाग हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो म्हणून तिथे पर्जन्यमान कमी असते.  यामुळे महाराष्ट्रात वातावरणाला लक्षात घेऊन वेगवेगळ्या पीकपद्धतीचा अवलंब केला जातो.

यामुळे शुष्क व ओसाड जमिनी असणाऱ्या प्रदेशात ज्याठिकाणी पर्जन्यमान अत्यल्प असते त्याठिकाणी शेतकरी शेवग्याच्या शेंगांचे उत्पादन घेतात, कारण त्यांच्या अशा वातावरणात तग धरून राहण्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती अस्तित्वात असते. एका अभ्यासानुसार याला येणारा खर्च देखील अत्यल्प असतो.

सांगलीपासून ८० किमी अंतरावर असलेल्या आटपाडी गावचे रहिवासी असलेल्या प्रशांत जाधव यांनी आपल्या २५ एकर शेतीत गहू, ज्वारी इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले आहे.

आता त्यांनी आपल्या तीन एकर शेतीवर शेवगाच्या शेंगांचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. यासाठी त्यांना प्रति एकर साडे तीन लाख रुपये खर्च आला आहे. त्यांच्या एका झाडाला पंचवीस ते तीस शेंगा आणि पंधरा टन फळ देतात. ज्याची विक्री ते २५-५५ रुपये प्रति किलो या दराने शहरी भाग जसे पुणे, मुंबई आणि कोल्हापूर याठिकाणी करतात.

शाश्वत कृषीपद्धतीचे पालन करणारे जाधव प्रत्येक वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात ह्या पिकांच्या नवीन व्हॅरायटीजचे उत्पन्न घेत असतात. प्रशांत जाधव सध्या वकिलीचे शिक्षण घेत असून एका युट्युब व्हिडीओच्या माध्यमातून त्यांची शेंवग्याशी ओळख झाली. तेव्हा त्यांनी या पीकाचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला.

एका शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यामुळे त्यांना शिक्षण आणि शेती यांचा ताळमेळ बसवून काम करावं लागत आहे. पण शेतीकडे त्यांचा ओढा जास्त असून प्रयोगशील शेतीचा ध्यास त्यांनी घेतला आहे.

हळदीनंतर शेवग्याच्या शेंगांनी अमेरिकन आणि युरोपियन बाजारपेठावर कब्जा केला आहे. त्याच्यातील आरोग्यदायी घटकांमुळे अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थात त्याचा वापर वाढीस लागला आहे. भारतीयांच्या आहारात गेली शतकानुशतके असलेली शेवग्याची शेंग सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुपर फूड म्हणून नावलौकिक प्राप्त करत आहे. त्याला संयुक्त राष्ट्रांचा सन्मान देखील मिळाला आहे.

नागपूर विद्यापीठातून टेलिकॉम इंजिनियरिंगचा पदवीधर असलेल्या शंतनु चंद्रशेखर महाले ह्या यवतमाळ जिल्ह्यातील लोही गावच्या मुलाने हार्डवेअर सोल्युशनचं काम सुरू केलं आहे.

हा मुलगा शेवग्याच्या शेंगांचा मोठा दिवाना आहे. त्यांच्या मते शेवगाच्या पानात संत्र्यापेक्षा जास्त क जीवनसत्त्व असतं, दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असतं, गाजरांच्या तुलनेत जास्त अ जीवनसत्व असतं, यामुळेच शेवग्याच्या शेंगांना औषधी, सौन्दर्य तसेच पोषण व्यवसायात मोठ्या प्रमाणावर उपयोगात आणलं जातं.

शेवगाच्या शेंगांचा आभ्यास करण्यासाठी १४० रिसर्च पेपर्स तयार करण्यात आले आहेत. तो गेली अनेक वर्षे शेवग्याच्या शेंगांचे महत्व जाणून आहे. याचा घरचे देखील शेतकरी असून २०१७ पर्यंत त्यांनी शेतात तूर आणि सोयाबीनचे उत्पादन घेतले पण मे २०१७ मध्ये त्यांनी आपल्या वीस एकरात शेवग्याच्या शेंगा लावल्या आणि त्याचे आयुष्य पालटले.

महाले फक्त शेवग्याच्या शेगांची भुकटी करून सर्वत्र त्याचे वितरण बाटलीबंद स्वरूपात करू लागले. आधी नाही म्हणणारे त्यांचा मालाला मोठी मागणी करू लागले. काही दिवसातच त्यांचा ह्या व्यवसायात त्यांना मोठं यश मिळालं आहे. ते शेवग्याच्या शेंगांच्या वेगवेगळ्या जातींच्या वाणाचे उत्पादन घेत असून त्यांच्या शेवग्याच्या शेंगेला सर्वत्र मागणी आहे. त्यांच्या शेतात तब्बल १०,५०० शेवग्याचे रोपं आहेत.

नाशिकच्या बाबासाहेब माराळे यांची देखील अशीच यशोगाथा आहे. त्यांनी शेवग्याचे एक वेगळे वाण शोधून काढले असून त्याला अमेरिका आणि जपानमध्ये मोठी मागणी होऊ लागली आहे.

नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांचा ह्या वाणाला फाउंडेशनच्या माध्यमातून पेटंट मिळालं असून ह्या फाउंडेशनच्या नावावर ७१ पेटंट आहेत. मराळे वर्षाकाठी २०-५० किलो इतकं उत्पादन घेतात. प्रति क्विंटल त्यांची औरंगाबाद, नाशिक, पुणे ह्या मोठ्या बाजारपेठामध्ये ३५०० ते ४५०० रुपये इतकी कमाई होते.

श्यामसुंदर जायगुडे ह्या शेतकऱ्याने पुणे केलवडे ह्या गावी २० एकराच्या शेताच्या कडेला शेवगा लावला असून वर्षाकाठी ते ५.४ लाख रुपयांचे उत्पन्न या शेवग्याच्या माध्यमातून घेतात. सोलापूरच्या माढा तालुक्यातील बाळा शिवाजी पाटील यांनी देखील या शेवग्याच्या शेतीतून मोठे उत्पन्न कमवले असून गावात लखपती शेतकरी असा सन्मान मिळवला आहे.

अश प्रकारे शेवग्याच्या शेंगांच्या या शेतीने दुष्काळ ग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एक नवीन आशा दिली असून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न कमावण्याचे एक साधन या विविध भागांतील शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!