आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
सिरीयल किलिंग्स आणि किडनॅपिंग्सच्या असंख्य केसेस तुम्ही गुन्हेगारी विश्वावर आधारित मालिकांमध्ये पहिल्या असतील. आज आपण जी कथा पाहणार आहोत त्याच्या मात्र अनेक आवृत्त्या आहेत, ही कथा एखादी दंतकथा असल्याप्रमाणे ब्रिटनमध्ये जवळ जवळ सर्वांनाच माहिती असते. मफिन मॅन, यालाच ड्र्युरी लेन डायसर म्हणूनही ओळखले जाते. त्यानेच इंग्लंडमध्ये सीरियल कि*लिंगची संकल्पना मांडली होती.
हा मफिन मॅन इंगलंडमधील पहिला सिरीयल कि*लर होता. त्याचे मूळ नाव होते फ्रेडरिक थॉमस लिनवुड. लिनवुडच्या गुन्ह्यांच्या अनेक कथा आहेत, पण त्याच्या एकाही गुन्ह्याचा तपशीलवार रेकॉर्ड कुठेही नाही. त्यामुळे लिनवुडचे ही कथा एकतर एक “लोककथा” आहे किंवा इतिहासातील सर्वात भयानक रहस्यांपैकी एक आहे.
राणी व्हिक्टोरियाच्या अधिपत्याखालील ब्रिटनमध्ये बेकरीमधून ताजे प्रॉडक्ट्स पोहोचवणे अतिशय सामान्य होते. कारण व्हिक्टोरियन काळात अन्न महाग होते. मध्यमवर्गीय कुटुंबाला त्यांच्या खाण्यापिण्यावर भरपूर पैसा खर्च करणे अशक्य होते. त्यांच्या आहारात अर्धा पौंड ब्रेड आणि इतर तत्सम बेकरीमध्ये तयार होणाऱ्या गोष्टींचा समावेश होता. त्या काळात बरेच लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी ब्रेडवर अवलंबून असत. दररोज सकाळी प्रत्येक इंग्लिश कुटुंब त्या दिवसाच्या जेवणासाठी ब्रेडच्या पार्सलची वाट पाहत असत. त्यावेळच्या इंग्लंडकरांसाठी सकाळच्या जेवणामध्ये मफिन्स म्हणजे स्वर्गच.
ऑर्डर्स वाढतच होत्या. बेकर्सकडे मोठे इलेक्ट्रिक मिक्सर नव्हते आणि बहुतेक बेकर्सना आपल्या बेकरीमध्ये कर्मचारी नियुक्त करणे परवडणारे नव्हते. त्यामुळे, बेकर्सने सर्व कामे स्वतःच केली. या बेकर्सची दैनंदिन शिफ्ट रात्री दहा किंवा अकरा वाजता सुरू होत असे, आणि ते जेव्हा पीठ फुगायला ठेवत असत, त्याच वेळेत त्यांना झोपायलाही वेळ मिळत असे. त्यांच्यावर कामाचा भार वाढू लागला. अशा कठीण परिस्थितीत काम केल्याने ब्रेडचा दर्जा खालावला होता. काही बेकर्सना त्यांच्या ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी पायाने पीठ मळून घ्यावे लागत असत.
मफिन मॅनला आजूबाजूच्या परिसरातील बेकर्सने निर्माण केलेल्या स्पर्धा आवडत नसत. किंबहुना तो त्या स्पर्धांमध्ये टिकत नसे आणि म्हणूनच त्याने सुमारे सात बेकर्सची ह*त्या केली. मफिन मॅनची कथा तरी हेच सांगते. राणी व्हिक्टोरियाच्या अधिपत्याखालील इंग्लंडमधील बेकर्सचे जीवन काही आनंददायी नव्हते. मध्यमवर्गीयांना त्यांच्या घरी ताज्या खाद्यपदार्थांची डिलिव्हरी होणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे होते आणि वर्षातून अनेकदा ब्रेड डिलिव्हरीच्या ऑर्डर्स खूप मोठ्या प्रमाणात मिळत असत.
मफिन मॅनसुद्धा याच काळातील होता. कामाच्या अशा व्यापामध्ये मफिन मॅनवर मानसिक तणाव वाढू लागला. यामुळेच मफिन मॅनने मुलांना जीवे मारण्यापूर्वी त्यांना टोमणे मारण्यात आणि त्यांचा छळ करण्यात आनंद घेतला असे दिसते. त्याची कथा मानवी इतिहासातील सर्वांत भयानक आहे आणि या कथेच्या अनेक आवृत्त्या आहेत. ही कथा वस्तुस्थितीवर आधारित नाही असे काही लोक म्हणतात, तर काहीजण याला खरे मानतात.
मफिन मॅन अपहरण केलेल्या लोकांना, विशेषत: लहान मुलांना मारायचा आणि बेकरीमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये तो त्यांचा वापर करत असे. त्या काळातील इतर बेकर्सप्रमाणेच तोसुद्धा आपल्या ग्राहकांच्या घरी खाद्यपदार्थ पोहोचवत असे. तो खेळ खेळत असल्याचे नाटक करत असे, म्हणूनच लहान मुले त्याच्याकडे सहजपणे आकर्षित व्हायची.
पण हे खेळ त्या लहान मुलांच्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रांसाठी भयानक ठरले. ‘मफिन मॅन’ त्या मुलांना बेकरीमध्ये आणल्यानंतर जीवे मारायचा आणि त्यांच्या मृतदेहांचे तुकडे करायचा. हे तुकडे तो बेकरी प्रॉडक्ट्स तयार करण्यासाठी वापरत असे. हे सगळं तो का करत होता याचे नेमके उत्तर कोणाकडेच नाही. कदाचित त्याला त्याच्या आजूबाजूच्या परिसरात दुसरी बेकरी नको होती म्हणून त्याने हे सगळं केलं असावं.
गुप्तता राखत मुलांना मारल्याने लोकांना भीती वाटेल आणि ते इतर बेकरीच्या वस्तू खरेदी करणे बंद करतील. काहींच्या मते, मफिन मॅन सामान्य व्यक्ती नव्हता. त्याला काही मानसिक समस्या असल्याने त्याने अनेक निष्पाप मुलांची ह*त्या केली. आपल्याला या गोष्टीची सत्यासत्यता माहिती नाही.
पण ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झालेली ही कथा लोकांना घाबरवण्यासाठी आणि बेकरी प्रॉडक्ट्स खरेदी करण्यापासून रोखण्यासाठी पुरेशी आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.