The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

या सेनापतीमुळे चंगेज खान सिकंदरहून मोठं साम्राज्य उभारू शकला

by द पोस्टमन टीम
28 March 2022
in इतिहास
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कोणतेही युद्ध जिंकल्यानंतर राजाचे खूप कौतुक होते. पण, युद्धात खरी कसोटी लागते ती सैनिकांची आणि त्याहून जास्त त्यांच्या सेनापतीची. सेनापतीला प्रत्यक्ष युद्धात उतरून लढावे लागते, शौर्य गाजवावे लागते आणि आपल्या प्रत्यक्ष उदाहरणातून त्याला आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवावे लागते.

बाहुबली सिनेमात आपण बघितलं असेलच समोर पराजय दिसत असताना, सगळे सैनिक हत्यार टाकून पळून चाललेले असताना तो स्वतः लढत लढत इतरांना कशी प्रेरणा देतो. एका खरा योद्धा मनाशी कधीच स्वतःची हर स्वीकारत नाही. अशा योद्ध्यांमुळेच युद्धांच्या रोमांचक कथा वर्षानुवर्षे अमर होऊन राहतात.

आज आपण अशाच एका सेनापतीविषयी जाणून घेणार आहोत ज्याच्या नावानेच शत्रूच्या उरत धडकी भरत असे. मंगोल वंशाचा शासक चंगेज खान याच्याविषयी तर सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, पण चंगेज खानचा सेनापती सुबुटाईबद्दल फारशी कुणाला माहिती नाही.

कोण होता हा सुबुटाई आणि त्याने चंगेज खानच्या सैन्यात राहून कसा पराक्रम गाजवला जाणून घेऊया या लेखातून…

सुबुटाई एक पराक्रमी सरदार होता पण त्याला कुठल्याही पराक्रमी आणि योद्ध्या घराण्याचा वारसा मिळाला नव्हता. सुबुटाई एका सर्वसामान्य लोहाराच्या कुटुंबात जन्माला आला होता. लोहाराचे काम असते फक्त सैन्यासाठी हत्यारे बनवून देणे! या जमातीच्या लोकांना सैन्यात भरती करून घेतले जात नसे. सुबुटाई लहानपणापासून वडिलांच्या हाताखाली मदत करत होता. अंग मेहनतीच्या कामामुळे शरीरात ताकद आली होती. लहानपणापासून त्याचा जास्तीत जास्त वेळ हत्यारांसोबतच गेला होता. हत्यारे वापरण्यातही त्याला रस निर्माण झाला.

लोहाराला कुणी युद्धावर पाठवत नाही मग हत्यारे चालवायला शिकला तरी त्याला त्याचा काय उपयोग होणार होता. तरीही सुबुटाईचे हत्यारांवर विलक्षण प्रेम होते.

एका लोहाराच्या मुलाला मंगोल कधीही स्वीकारणार नाहीत हे वास्तव माहिती असतानाही सुबुटाईने सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पहिले. फक्त १४ वर्षांचा असताना सैन्यात भरती होण्यासाठी तो घरातून बाहेर पडला. चंगेज खानच्या सैन्यात कितीतरी कुशल, पराक्रमी सैनिक आणि महान योद्धे होते. त्याच्या सैन्यातील प्रत्येक सैनिकाकडे एक खास असे कौशल्य होते. सुबुटाईचे वयही त्यामानाने खूपच लहान होते. त्याला युद्धाचा अनुभवही नव्हता. मग त्याला कोणी सैन्यात का प्रवेश देईल? त्यालाही कदाचित या गोष्टीचा अंदाज असावा.

हे देखील वाचा

या दोन देशांमधील युद्ध तब्बल सहाशे वर्षांहून अधिक काळ चालू होतं!

या नकाशाने अब्राहम लिंकन यांना गुलामगिरी संपवण्यास भाग पाडले!

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

परंतु त्याला काही करून सैन्यात भरती व्हायचेच होते आणि त्यासाठी त्याने प्रयत्नही सुरु केले. आपण एक दिवस यशस्वी होऊच यावर त्याला दृढ विश्वास होता. तो सैनिकांचे बारकाईने निरीक्षण करी. राजा चंगेज खानचेही तो बारकाईने निरीक्षण करी. आपला जास्तीत जास्त वेळ तो राजासोबतच घालवत असे. एका सामान्य लोहाराचा मुलगा असूनही राजाच्या निकटच्या वर्तुळात सामील होण्यात त्याने यश मिळवले. याच काळात त्याने घोडेस्वारी करणे, तलवार चालवणे अशी कौशल्ये आत्मसात केली.

मंगोलमध्ये जेंव्हा घोडेस्वारी आणि तलवार बाजी आणि निशाणेबाजीची स्पर्धा भरवण्यात आल्या तेंव्हा सुबुटाईने प्रत्येकाला आश्चर्य चकित करून सोडले. ही स्पर्धा जिंकल्याने त्याचा सैन्यात भरती होण्याचा मार्ग खुला झाला होता. एक सामान्य सैनिक म्हणून तो सैन्यात भरती झाला असला तरी त्याने झपाट्याने प्रगतीचे एकेक टप्पे सर केले, त्याला पदोन्नती मिळत गेली.

अगदी थोड्या काळातच त्याने चंगेज खानचा पूर्ण विश्वास संपादन केला आणि तो चंगेज खानचा खास विश्वासू सरदार म्हणून ओळखला जाऊ लागला. 

त्याने खूप कौशल्ये आत्मसात केली होती. युद्धात चांगलीच निपुणता मिळवली होती. युद्धाची रणनीती आखण्यात तो तरबेज झाला होता. चंगेज खान कोणत्याही युद्धात त्याला सोबत घेतल्याशिवाय जात नसे. सुबुटाई लवकरच चंगेज खानच्या सैन्याचा सेनापती झाला. युद्धाच्या बाबतीत सुबुटाई शिवाय चंगेज खानचे पानही हलत नव्हते.

सुबुटाईमुळे चंगेज खानचे सैन्य अधिक बलवान झाले. प्रत्येक युद्धात त्यांची सरशी होत होती. चंगेज खानाला आपल्या या निडर आणि पराक्रमी सेनापतीवर खूपच विश्वास होता.

सैनिकांना नेमक्या कुठल्या अडचणी येतात हे जाणून घेऊन त्याने आपल्या सैन्यातील सैनिकांच्या अडचणी दूर करण्याचे काम सुरु केले. सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा आनंद जपणे गरजेचे असल्याचे त्याने ओळखले होते. चंगेज खानला आपल्या सैनिकांच्या जीवाची पर्वा नसे पण, सुबुटाई सैनिकांची काळजी घेऊ लागला. सैनिकांचे जीव वाचवण्यासाठी तो हरेक प्रयत्न करू लागला.

सैनिकाबद्दलचे हे धोरण बदलल्याने आता चंगेज खानचे सैनिक प्रत्येक युद्धभूमीवर पराक्रमाचा झेंडा फडकवू लागले. सुबुटाईने तब्बल ३२ देशांत चंगेज खान आणि मंगोल वंशाचा सत्ताविस्तार केला. तो सैन्यात आल्यापासून राज्याच्या सीमा चारही बाजूने वाढत होत्या. सैनिकांच्या ताकदीचा पूर्ण वापर कसा करून घ्यायचा हे त्याला चांगलेच समजले होते. सुबुटाई शरीराने बलवान होता तसाच बुद्धिमानही होता. तो नवनवे प्रयोग करत होता. त्याच्याजवळ नेहमीच आधुनिक हत्यारे असत. शिवाय, त्याची स्वतःची गुप्तहेरांची एक तुकडी देखील होती. त्यामुळे शत्रूच्या गोटातील गुप्त बातमी काढणे त्याला सहज जमत असे. त्याच्यामुळेच चंगेज खान युरोपपर्यंत धडक मारू शकला.

ADVERTISEMENT

हंगेरीच्या युद्धात तर सुबुटाईने इतिहासच रचला. त्याकाळी हंगेरीचे सैन्य हे सर्वात अधिक मजबूत आणि पराक्रमी सैन्य होते.

सरळ लढून आपल्याला यश मिळणार नाही हे ओळखून सुबुटाईने त्यांच्यावर तीन बाजूंनी हल्ला केला. या लढाईत दोन्हीकडील सैन्याचे अतोनात नुकसान झाले तरीही सुबुटाई हे युद्ध जिंकला होता. चंगेज खानच्या राज्याची पताका अशाप्रकारे युरोपमध्येही अभिमानाने फडकू लागली.

सुबुटाई इतका पराक्रमी हुशार आणि धाडसी असूनही त्याने कधी चंगेज खानशी प्रतारणा करण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटपर्यंत तो आपल्या राजाशी एकनिष्ठ राहिला. राजाला फसवून किंवा राजद्रोह करून आपण सत्ता बळकवावी असा विचार त्याने स्वप्नातही केला नाही. चंगेज खानच्या मृत्यूनंतर सत्तेत आलेल्या त्याच्या वारसदाराने सुबुटाईची किंमत ओळखली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत तो आपल्या राज्यासाठी लढत राहिला.

चंगेज खानच्या साम्राज्य विस्तारासाठी हरेक प्रयत्न करूनही सुबुटाईला कधी कौतुकाचे दोन शब्दही ऐकायला मिळाले नाहीत. उलट सुबुटाईच्या पराक्रमाच्या जोरावर चंगेज खान स्वतःचीच वाहवा करून घेत असे. पण, सुबुटाईने कधी त्याबद्दलही खेद व्यक्त केला नाही.

फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहावे, हे गीतेतील तत्व तो खऱ्या अर्थाने जगला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweetShare
Previous Post

भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ मधे भरती कसं व्हायचं?

Next Post

भेटा जगातील सर्वात अलिप्त आणि खुंखार जमातीशी संपर्क साधणाऱ्या पहिल्या महिलेला

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

इतिहास

या दोन देशांमधील युद्ध तब्बल सहाशे वर्षांहून अधिक काळ चालू होतं!

4 June 2022
इतिहास

या नकाशाने अब्राहम लिंकन यांना गुलामगिरी संपवण्यास भाग पाडले!

2 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

20 April 2022
इतिहास

ही आहे जगातील पहिली संघटित दहशतवादी चळवळ!

20 April 2022
इतिहास

त्याच्या संशोधनाने कोट्यवधी लोकांना अन्न दिले आणि लाखोंना वेदनादायक मृत्यूही!

18 April 2022
इतिहास

एका लहानशा दगडामुळं ग्रीक संस्कृतीच्या इतिहासाच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय!

15 April 2022
Next Post

भेटा जगातील सर्वात अलिप्त आणि खुंखार जमातीशी संपर्क साधणाऱ्या पहिल्या महिलेला

चीनी हॅकर्सनी गुगलसह ३४ अमेरिकी कंपन्यांचा टप्प्यात कार्यक्रम केला होता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)