The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

by द पोस्टमन टीम
5 September 2024
in भटकंती, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


भारताच्या नैऋत्य (साऊथ ईस्ट) भागातील अंदमान-निकोबार बेटांचा समूह देशाचा अविभाज्य भाग असले तरीही मुख्य भूमीपासून ते साधारणतः हजारो किलोमीटर लांब आहेत.  ही बेटे सेल्युलर जेलसाठी प्रसिद्ध असली तरीही याच भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींचे जीवन देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथील अनेक आदिवासी जमाती अजूनही आधुनिक जीवन न जगता पारंपरिक आणि निसर्गाशी जवळीक साधणारं जीवन व्यापन करीत आहेत. अशाच प्रकारचे पण आगळे वेगळे जीवनपद्धती असणाऱ्या एका आदिवासी जमातीचे अस्तित्वमात्र देशांतर्गत वादांमुळे आज धोक्यात आलं आहे.

अंदमानचा काही भाग थायलंड आणि म्यानमार या देशांमध्येसुद्धा येतो. समुद्रातील सीमारेषा निश्चित नसल्याने अंदमान सागरातील काही भागांवर थायलंडबरोबरच म्यानमारही आपला अधिकार सांगत आला आहे. पण या सीमावादामध्ये अंदमान सागरातील बेटांवर हजारो वर्षांपासून राहणारे आदिवासीमात्र भरडून निघत आहेत. तुम्ही कांतारा सिनेमा पहिलाच असेल, त्यामधील स्थानिकांची जी व्यथा असते तशीच या आदिवासींचीही आहे. त्यांना त्यांच्या निसर्गाशी संबंधित जीवनपद्धतीचे पालन करू दिले जात नाही. काय आहे नेमकं हे प्रकरण, जाणून घेऊया या लेखातून…

मोकन हे सेमी-नॉमॅडीक पद्धतीत मोडणारे ॲस्ट्रॉनेशियन आदिवासी, मरगुई या सुमारे ८०० बेटांच्या बेटसमूहांवर राहत आहेत. हे आदिवासी सुमारे ४ हजार वर्षांपासून येथे वास्तव्य करत आहेत. मरगुई या बेटसमूहावर आणि येथील समुद्रावर थायलंड आणि म्यानमार दोन्ही देश आपापला हक्क सांगतात. सुमारे ४ हजार वर्षांपूर्वी दक्षिण चीनमधून थायलंड, म्यानमार आणि मलेशिया याठिकाणी स्थलांतर केलेले हे लोक वर्षातील बहुतेक काळ काबांग  नावाच्या स्वहस्ते तयार केलेल्या होड्यांमध्ये राहतात.

मोकन लोक होड्यांचे समूह तयार करून सतत एका बेटावरून दुसऱ्या बेटावर स्थलांतर करीत असतात. या स्थलांतरांना दैनंदिन गरजा, वाऱ्यांची दिशा, रोगराई, सुरक्षा असे अनेक घटक कारणीभूत आहेत. सुरुवातीपासूनच ते संपत्ती, ऐषाराम आणि जगातील प्रगत तंत्रज्ञानापासून अलिप्त राहिले आहेत. वर्षभरातील मे ते ऑक्टोबर महिन्यांदरम्यान नैऋत्य मोसमी वारे पाऊस घेऊन येतात. वादळी वारे आणि पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी मोकन जमातीतील लोक मरगुई बेटसमूहाच्या पूर्वेकडील भागांमध्ये तात्पुरत्या झोपड्या तयार करून राहतात.



या जमातीतील लोक वनांतील फळे, कंदमुळे, मध इत्यादींवर आपला उदरनिर्वाह करतात. तर औषधोपचार, बांधकाम आणि इंधनासाठी १५० हून अधिक वेगवेगळ्या झाडांचा उपयोग केला जातो, आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर खऱ्या अर्थाने ते ‘इको-फ्रेंडली’ जीवन जगत आहेत. 

आश्चर्यकारक बाब म्हणजे मोकेन मुलांची दृष्टी युरोपियन मुलांपेक्षा ५०% अधिक शक्तिशाली आहे असे स्वीडनमधील एका युनिव्हर्सिटीने केलेल्या वैज्ञानिक अभ्यासातून दिसून आले. शेकडो वर्षांपासून ते पाण्याखालीही डोळे उघडे ठेऊन शिकार करतात, त्यासाठी त्यांना लक्षही केंद्रित करावे लागते. याचे कारण म्हणजे ही मुलं आपले अन्न खोल समुद्रातून मिळवतात आणि पिढ्यन्पिढ्यापासून त्यांची ही क्षमता वाढतच गेली आहे..! आणखी खोल समुद्रात जायचे असल्यास हे लोक झाडाच्या सालीपासून आणि लाकडापासून तयार केलेले गॉगल्स वापरतात..

मोकन जमातीच्या लोकांना शांततामय आणि निसर्गसान्निध्य जीवन जगायचे आहे हेच या सगळ्यावरून लक्षात येतं. देशांच्या सीमा आणि वादांपासून कैक मैल लांब असणाऱ्या या नैसर्गिक आणि सागरी लोकांचे अस्तित्व मात्र आज राजकीय आणि आर्थिक कारणांनी धोक्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्सुनाम्या आल्यानंतर राबवलेल्या नियमांमुळे आणि सरकारी धोरणांमुळे या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचं आढळून आलं आहे. विविध तेल कंपन्या समुद्रात करीत असलेले ड्रिलिंग्स, सरकारने पर्यटनाच्या नावाखाली बळकावलेल्या जमिनी, बेसुमार मासेमारी आणि अशी अनेक कारणे या लोकांच्या अस्तित्वास धोका निर्माण करीत आहेत.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

“एवढ्या मोठ्या प्रमाणात मासेमारी केल्यानंतर समुद्रातील मासेच संपले तर काय करणार?” असा करूण प्रश्न तेथील स्थानिक हुक सुरियन कटाले विचारतात. अनेक मोकन आदिवासींनी नाईलाजाने आपले पारंपरिक जीवन सोडून हस्तनिर्मित पारंपरिक वस्तू विकायला सुरुवात केली आहे, काही लोक होडी चालवण्याचं काम करीत आहेत तर काही लोक पर्यटन क्षेत्रात कचरा गोळा करण्याचं काम करताहेत. याठिकाणी नॅशनल पार्क्स तयार झाल्याने होड्या, घरे बांधायला आवश्यक असणाऱ्या लाकडांचीदेखील वानवा आहे. बाहेरून येणाऱ्या आणि पर्यावरणाबद्दल फक्त “बोलाची कढी आणि बोलाचा भात शिजवणाऱ्या” लोकांमुळे आज या निसर्गपुत्रांना त्यांच्याच भूमीत गुलामासारखे जीवन जगावे लागत आहे हीच दुर्दैवाची बाब.

असे असले तरीही काही मोकन कुटुंबे आजतागायत, कठीण परिस्थितीमध्येसुद्धा आपल्या पारंपरिक जीवनपद्धतीचे पालन करताहेत. परंपरेनुसार ही कुटुंबे वर्षांतील ७ ते ८ महिने समुद्रात आपापली काबांग’ घेऊन जातात. तेथील स्थानिक हुक सुरियन कटाले यांच्या मते समुद्र हेच त्यांचे विश्व आहे!

अशी हे समुद्रच अवघं विश्व असणारे या जमातीतील लोक काबांग  होडी तयार करता येते अशांना अतिशय आदराने वागवतात. “जर त्याला काबांग बनवता येते, जर तो  काबांग वलवत असेल आणि जर तो कासवाची शिकार करण्यात निपुण असेल तरच मी त्याला माझी मुलगी देईल अन्यथा माझी मुलगी अविवाहित राहिली तरी बेहत्तर!” अशी म्हण तेथे प्रचलित आहे.

मोकन लोकांची ही विद्या पिढ्यांपिढ्या शाश्वत असून लहान मुलांना याचे प्रशिक्षण दिल्यानेच पुढे चालू राहू शकेल. पण सध्याच्या परिस्थितीमुळे शतकानुशतके चालत आलेले ज्ञान आणि परंपरा पुढे चालवणे कठीण होऊन बसले आहे. “सध्याच्या पिढीला काबांग होडी कशी तयार करायची हे देखील माहिती नाही, ही प्राचीन कलाकुसर आता फक्त तीन ते चार जणांनाच जमते” असं तेथील स्थानिक हुक सुरियन सांगतात.

आजही मोकन जमातीतील लोक निसर्गाच्या अगदी जवळ राहणारे मानले जातात, जेव्हा डिसेंबर २००४ साली त्सुनामी आली, तेव्हा काही ज्येष्ठ मोकन लोकांनी दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे अनेक मोकन लोकांबरोबरच पर्यटकांचेही प्राण वाचले होते, फक्त एका दिव्यांग असलेल्या मोकनला यात आपल्या प्राणाला मुकावे लागले. समुद्रच त्यांचे विश्व आणि जगण्याचे साधन असल्याकारणाने त्यांना त्याबद्दल असलेले ज्ञान वाखाणण्याजोगे आहे.

जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत । पायाविण भिंत तातडीची ।।

विकासाच्या चुकीच्या संकल्पनांमुळे, शाश्वत विकासाच्या ध्येयांबद्दल अज्ञान असल्याने विकासाचा फक्त “देखीचा पर्वत” केला जात आहे. यातून भासणारा विकास ही फक्त ‘पायाविना उभारलेली भिंत’ असून निसर्गाची एक धडक बसली तरी ती कोसळेल..


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

Next Post

काय.? ऑस्ट्रेलियामधील नामशेष झालेला हा शिकारी प्राणी पुन्हा पृथ्वीतलावर वावरणार!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

19 August 2024
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

काय.? ऑस्ट्रेलियामधील नामशेष झालेला हा शिकारी प्राणी पुन्हा पृथ्वीतलावर वावरणार!

मैत्रीच्या नात्याला एक वेगळी उंची देणारी अघोरी प्रथा!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
ADVERTISEMENT