The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

ही हरवलेली महिला स्वतःलाच शोधण्यासाठी पथकाबरोबर रात्रभर फिरली

by द पोस्टमन टीम
8 April 2022
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आत्मशोध, अर्थात स्वतःचा शोध ही अध्यात्मातली एक अत्यंत गांभीर्याने पार पडण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून पार पडल्याशिवाय अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करणं शक्यच नाही. धर्मग्रंथ, गुरू, योगसाधना, ध्यानधारणा असे आत्मशोधाचे अनेक प्रभावी मार्ग अध्यात्माच्या क्षेत्रात सांगितले जातात.

मात्र, अध्यात्माच्या क्षेत्रात नव्हे तर प्रत्यक्षात लौकिकार्थाने जर कोणी स्वतःला शोधायला रात्रभर मैलोनमैल पायपीट केली; तर त्याला तुम्ही आम्ही वेड्यात काढल्याशिवाय राहणार नाही. एका पर्यटक महिलेच्या बाबतीत अनावधानाने हेच घडलं आणि मग काय; समाजमाध्यमांवर या घटनेवरून एकापेक्षा एक विनोदांचा महापूर लोटला.

आईसलँड येथे पर्यटनासाठी आलेली एक महिला प्रवासादरम्यान घेतलेल्या एका थांब्यापासून बेपत्ता असल्याचं बस चालकाच्या लक्षात आलं. त्याने आपल्या कार्यालयापासून ते पोलिसांपर्यंत सर्व ठिकाणी ही महिला बेपत्ता झाल्याची खबर कळवली. एक पर्यटक महिला बसमधून गायब झाल्याबद्दल तक्रार नोंदवण्यात आली.

ही महिला साधारणपणे १६० सेमी उंचीची, मध्यम बांध्याची आशियाई महिला आहे. तिनं गडद रंगाचे कपडे घातलेले आहेत हे वर्णनही त्याने पोलिसांना दिलं. पोलिसांनी या बेपत्ता महिलेचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली. इतकाच नाही तर कोस्टल गार्ड्सनी आपल्या हेलिकॉप्टरमधून महिलेला शोधायला सुरुवात केली.

या महिलेबरोबर बसमध्ये बसून आलेल्या ५० जणांच्या पर्यटकांच्या गटानेही आजूबाजूच्या परिसरात बेपत्ता महिलेचा माग काढण्यास सुरुवात केली. हरवलेल्या महिलेचा शोध घेण्याची मोहीम शनिवारी दुपारी सुरू करण्यात आली. ती रविवारच्या पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होती.

अखेर शोध घेणाऱ्यांच्या जमावाच्या एकमेकांशी बोलण्यातून त्यांच्यातल्याच एका तरुणीच्या लक्षात आलं की हे लोक आपल्याबद्दलच बोलत आहेत आणि आपणच बेपत्ता झालो आहोत असं समजून आपलाच शोध घेत आहेत. इतका वेळ याची जाणीव न झाल्याने आपणही त्यांच्याबरोबर भटकत आहोत.

ही बाब लक्षात आल्यानंतर तिने त्वरित पोलीस अधिकाऱ्यांना गाठलं आणि घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं. घडलं असं होत की, आईसलँडमध्ये पर्यटकांना निद्रिस्त ज्वालामुखी दाखवण्यासाठी एल्डग्जा कॅन्यन या ठिकाणी बस थांबवण्यात आली. विश्रांतीच्या ठिकाणी थांबलेली असताना या तरुणीने आपले कपडे बदलले. मेकअप बदलला आणि जाण्याच्या वेळी वेगळ्याच स्वरूपात ती परत बसमध्ये येऊन बसली. तिने पेहराव बदलल्यामुळे चालकाने तिला ओळखलंच नाही आणि त्याने ती हरवल्याची तक्रारही देऊन टाकली.

हे देखील वाचा

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

ही चक्रावून टाकणारी कहाणी ऐकल्यावर अनेकांची मतीच गुंग होऊन गेली. मात्र, महिला पर्यटक बेपत्ता झाल्याचा ताण मात्र, सर्वांच्या डोक्यातून निघून गेला आणि त्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. अर्थातच, चटपटीत बातम्यांच्या शोधात असलेल्या प्रसारमाध्यमांनी, ‘स्वतःलाच शोधत शोधपथकामध्ये फिरत राहिली हरवलेली महिला!’ अशा अर्थाचे मथळे देऊन त्यांनी या प्रसंगाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या.

समाजमाध्यमांवर कार्यरत असणाऱ्यांच्या नजतेतून या बातम्या सुटल्या नाहीत. त्यांनी या बातम्यांवर मजेदार टिपण्णी करून त्या प्रसिद्ध केला आणि त्यावर वेगवेगळ्या टिपण्याचा ओघच सुरु झाला.

ADVERTISEMENT

या प्रसंगाचं वृत्त समाजमाध्यमात प्रसिद्ध होताच त्याला लाखो लाईक्स आणि प्रतिक्रिया मिळाल्या. ट्विटर वापरकर्ता ब्रायन मिलरने ट्विटरवर या बातमीचं कात्रण ट्विट केलं. त्याला अल्पावधीतच २ लाख ७५ हजार ८०० लाइक्स माल्या आणि तब्बल ७३ हजार ५०० जणांनी ते रिट्विट केलं. यावर नेटकरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियाही नमुनेदार आहेत.

एका वापरकर्त्याने, चालकाला आपल्या बसमधले प्रवासी मोजायचं सुचलं नाही का; असा अगदी साधा पण स्वाभाविक प्रश्न विचारला आहे. दुसऱ्या एकाने त्यांचं गणिताचं ज्ञान अगाध असलं पाहिजे, असा शालजोडीतला टोला लगावला आहे. मात्र, बहुतेक जणांनी खरंच कोणी हरवलं नाही, याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. एका वापरकर्त्याने तर तत्वज्ञाच्या आविर्भावात, आपल्या सर्वांची अवस्था आपापल्या परीने या महिलेसारखीच नाही का; असा गंभीर सवाल केला आहे.

अशीच एक घटना तुर्कस्तानमध्ये घडली होती. मात्र, या घटनेतील व्यक्ती खरोखरच हरवली होती. तो एक मद्यपी होता आणि योगायोगानेच तो त्यालाच शोधायला निघालेल्या पथकात सामील झाला.

बेहान मुतलू नामाचा इसम हा एके दिवशी मित्रांसोबत मद्यपान करत जंगलात भटकत होता. दाट जंगलात तो रास्ता चुकला. तो वेळेवर घरी परत आला नाही तेव्हा त्याची पत्नी आणि मित्र यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथकं रवाना केली.

योगायोगानेच मुतलू भटकत असताना त्याला हे पथक दिसलं. त्याने त्यांच्याबरोबर येण्याची विनंती केली. तेव्हा त्याला पोलिसांनी त्याचं नाव विचारलं. त्याने नाव सांगितल्यावर सगळा उलगडा झाला. त्याला जबाब देण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने एका बाजूला नेलं तेव्हा या ५० वर्षाच्या मुतलूने शाळेतल्या मुलाने शिक्षकांना सांगावं; तशी विनंती पोलिसांना केली. मला जास्त कडक शिक्षा देऊ नका. माझे वडील मला मारतील, ते तो म्हणाला. अखेर पोलिसांनी मुतलूला त्यांच्या गाडीत घालून घरी नेऊन सोडलं. मात्र, त्याला शिक्षा किंवा दंड काय केला ते काही कळलं नाही.

तुम्हीही कोणाला शोधायला जाल तर आधी खात्री करून घ्या की ती व्यक्ती तुमच्यासोबत तर नाही ना!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

या ऑटिस्टिक मुलीनं भारत-श्रीलंका अंतर अवघ्या १३ तासांत पोहून पार केलंय!

Next Post

बॅटमॅन तयार केला एकाने आणि श्रेय लाटलं भलत्यानेच!

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

मनोरंजन

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

28 December 2022
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

7 September 2022
मनोरंजन

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

4 June 2022
मनोरंजन

या बयेनी नवऱ्याला तुरुंगातून पळवण्यासाठी चक्क पायलटचं लायसन्स मिळवलं होतं

22 April 2022
मनोरंजन

‘त्या’ दिवशी उडती तबकडी बघून लंडनवासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता, पण…

20 April 2022
मनोरंजन

‘हॅप्पी बर्थडे’ गाण्याची मालकी सांगून वॉर्नर म्युझिकने रग्गड पैसे छापले होते, पण…

14 April 2022
Next Post

बॅटमॅन तयार केला एकाने आणि श्रेय लाटलं भलत्यानेच!

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)