आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मस्त पाऊस पडून गेल्यावर लॉंगड्राईव्हला निघाल्यावर हायवेला, रस्त्याच्या कडेला छोट्या दगडांवर काही आकडे लिहिले दिसतात. आपण ते बघतो, आपल्या गंतव्य ठिकाण किती अंतरावर असेल याचा अंदाज घेऊन पुढे निघून जातो.
पण कधी एक गोष्ट लक्षात आली आहे का की हे जे मैलाचे दगड (माईलस्टोन) असतात हे वेगवेगळ्या रंगांचे असतात. नाही? या मैलाच्या दगडांवर नारिंगी, पिवळी, काळी (किंवा निळी) आणि हिरवी, या चारपैकी एका रंगाची पट्टी मारलेली असते. या पट्ट्या काय रंगवणाऱ्याच्या आवडीच्या रंगाच्या नसतात तर प्रत्येक रंगाच्या पट्टीमागे एक कारण असतं. काय? जाणून घेऊया या लेखातून.
नारिंगी पट्ट्या
अनेकदा रस्त्याच्या कडेला असलेल्या या माईलस्टोनवर नारिंगी रंगाच्या पट्ट्या मारलेल्या दिसतात. या पट्ट्या बघून समजून जा की ग्रामीण रस्त्यावर आहात. प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना, जवाहर रोजगार योजना आणि इतर योजनांद्वारे भारतात 3.93 लाख किलोमीटरभर पसरलेल्या ग्रामीण स्त्यावरील मैलाच्या दगडांवर नारिंगी रंगाची पट्टी मारली जाते.
पिवळी पट्टी
तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना असे पिवळ्या रंगाचे मैलाचे दगड बघितले असतीलच. हे पिवळ्या रंगाची पट्टी मारलेले दगड म्हणजे तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर आहात. सध्या भारतात जवळपास 1 लाख 51 हजार 19 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आहेत.
निळी किंवा काळी पट्टी
एखाद्या शहरातल्या रस्त्यावरील काळी, निळी किंवा पांढरी पट्टी मारलेले मैलाचे दगड दिसतात. सध्या भारतात या रस्त्यांचं जाळं जवळपास 5 लाख 61 हजार 940 किलोमीटर एवढं पसरलेलं आहे.
हिरवी पट्टी
भारतात एका राज्यातील वेगवेगळे शहरं स्टेट हायवेने जोडले असतात. या राज्य महामार्गावर असलेल्या मैलाच्या दगडांवर हिरवी पट्टी मारलेली असते. राज्य महामार्गाचं जाळं लाख 76 हजार 166 किलोमीटरभर पसरलेलं आहे.
तर, पुढच्या वेळी मस्त वातावरणात लॉंगड्राईव्हला जाल तेव्हा या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.