The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

सत्याग्रहाची आयडिया गांधीजींच्या या नातेवाईकाच्या डोक्यातून निघाली होती

by द पोस्टमन टीम
3 January 2021
in इतिहास
Reading Time:1min read
0
Home इतिहास

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब

भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसेच्या मार्गाने लढताना सर्वात जास्त वापरले गेलेले प्रभावी हत्यार म्हणजे सत्याग्रह. महात्मा गांधींनी आफ्रिकेत जो वर्णभेदाविरोधात लढा उभा केला होता त्यातही त्यांनी याच शस्त्राचा प्रामुख्याने वापर केला. आफ्रिकेत वर्णभेदा विरोधात लढताना वापरलेला गेलेला हा शब्द नंतर इतका प्रभावी ठरला की ब्रिटिशांना देखील या एका शब्दाची धडकी भरू लागली. महात्मा गांधींनी ११ सप्टेंबर १९०६ रोजी पहिल्यांदा या शब्दाचा वापर केला होता. नंतर संपूर्ण जगभरात शत्रूच्या विरोधात हेच हत्यार वापरले गेले.

सत्याग्रहाचा अर्थ होतो सत्याच्या अग्रहासाठी लढणे. सत्याच्या मार्गावरून दृढ वाटचाल करणे. आफ्रिकेत जेंव्हा गांधींना वर्णभेदाचे चटके जाणवू लागले तेंव्हा याविरोधात आवाज उठवणे अगत्याचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना वर्णभेदाच्या या अन्याय रूढी विरोधात लढायचे होते. पण, त्यासाठी त्यांना शस्त्रांचा वापर करायचा नव्हता. तर अशा शस्त्रापेक्षाही प्रभावी अस्त्र ते शोधत होते. अहिंसेच्या मार्गाने शत्रूला विरोध करण्यासाठीचा मार्ग त्यांनी अवलंबला होता. पण, या मार्गाला काही तरी नाव देणे भाग होते. अशा प्रकारच्या नि:शस्त्र लढ्याला काय नाव द्यावे हे त्यांना सुचत नव्हते. म्हणून त्यांनी यासाठी अगदी योग्य शब्द सुचवण्याची स्पर्धा ठेवली.

अनेकांनी अनेक शब्द सुचवले. असाच एक शब्द सुचवण्यात आला ‘सदाग्रह.’ मग गांधीजीनी त्यातील सदा काढून त्याला सत्य या शब्दाची जोड दिली आणि अशा पाध्तीने ‘सत्याग्रह’ शब्द जन्माला आला.

अमेरिकन तत्वज्ञ, विचारवंत आणि लेखक थरो याने ज्या सिव्हील डिसओबेडिअन्सला जन्म दिला अगदी त्याच्याशी जवळीक साधणारा हा शब्द होता.

गांधींना हा शब्द सुचवणाऱ्या व्यक्तीचे नाव होते मगनलाल खुशालचंद गांधी.

मगनलाल गांधी हे महात्मा गांधींचे पुतणे होते. सुरुवातीला अर्थार्जन करण्यासाठी म्हणून आफ्रिकेला गेलेले मगनलाल नंतर गांधींच्या आश्रमाशी आणि त्यांच्या वर्णभेद विरोधी चळवळीशी जोडले गेले. गांधींच्या विचारांनी त्यांना भारून टाकले होते. नंतर ते गांधींच्या आफ्रिकेतील फिनिक्स आश्रमातच राहू लागले. गांधींना देखील मगनलाल यांच्यावर अतोनात विश्वास होता. अनेकदा त्यांनी मगनलाल यांचा उल्लेख आपला विश्वासू सहकारी म्हणून केला आहे.

आफ्रिकेतील काम संपल्यानंतर गांधीजी भारतात परत आले. इथे त्यांनी साबरमती आश्रमाची स्थापना केली. सुरुवातीला सबरमती आश्रमाची सगळी देखरेख मगनलाल यांच्याच हाती होती.

हे देखील वाचा

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

पाकिस्तानी सैन्याची पळताभुई करून सोडणारे मेजर आसा राम

गांधीजींनी स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक प्रश्नावर तोडगा काढताना सत्याग्रहाचा वापर केला. त्यांच्या सत्याग्रहाने सर्वसामान्य भारतीयांना देखील स्वातंत्र्याच्या प्रश्नाशी जोडून घेण्याची संधी मिळाली. सत्याग्रहाच्या ताकदीमुळेच लाखो करोडो भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात उतरले. परंतु सुरुवातीला मात्र गांधींच्या या मार्गाची खूप खिल्ली उडवण्यात आली.

हळूहळू त्यांच्या आंदोलनाला यश मिळत गेले आणि या मार्गाची खरी ताकद काय आहे ते सर्वांना उमगले. याच हत्याराचा वापर करून त्यांनी आफ्रिकेतील वर्णभेदी सरकारला झुकवले आणि भारतातील ब्रिटीशांच्या साम्राज्यशाहीलादेखील.

विरोधक प्रबळ असतील तर त्यांच्याशी शस्त्राने लढून काहीच उपयोग नाही असे गांधींचे मत होते. सशस्त्र आणि क्रूर विरोधकांना नेहमीच शांततेच्या मार्गाने होणाऱ्या विरोधाची भीती वाटते असे ते म्हणत.

गांधींच्या मते सत्याग्रहाचा अर्थ होता अन्यायाविरोधात आवाज उठवणे. गुन्हेगारावर किंवा अपराध्यांवर हात उचलून किंवा शस्त्र घेऊन त्याला विरोध करण्याऐवजी सत्याने, प्रेमाने आणि अहिंसेने जिंकणे. सत्याग्रहाचा अर्थच हा असतो, की अन्याय करणाऱ्याला प्रेम आणि अहिंसेच्या मार्गाने त्याच्या वर्तणुकीची जाणीव करून देणे.

सत्याग्रहाची व्याख्या करताना गांधीजी नेहमी म्हणत, “हे असे आंदोलन आहे जे पूर्णत: सत्यावर अवलंबून आहे. हिंसेच्या ऐवजी आणि हिंसेच्या विरोधात हे आंदोलन आवश्यक आहे.”

अहिंसा हे सत्याग्रहातील एक महत्वपूर्ण तत्व असल्याचे म्हटले जाते. अहिंसेच्या आधारानेच सत्यापर्यंत पोहोचता येते. सत्याच्या मार्गावर टिकून राहायचे असेल तर अहिंसेचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही. गांधीजींचे प्रत्येक आंदोलन याच विचारांवर आधारलेले होते.

गांधींच्या सत्याग्रहाची ताकद आज संपूर्ण जगाला कळली आहे. आजही जगभरात जिथे कुठे अन्यायाविरोधात प्रतिकार करावयाचा असेल तेंव्हा बहुतांश वेळेस सत्याग्रहाचाच मार्ग अनुसरला जातो. जगभरातील अनेक नेत्यांवर गांधींच्या या विचारांचा प्रभाव जाणवतो.

मार्टिन ल्युथर किंग पासून ते नेल्सन मंडेला यांच्या पर्यंत आजवर अनेकांनी या मार्गाचा वापर करून आपल्या समाजाच्या प्रश्नांची उकल केली आहे.

गांधींनी केलेला मिठाचा सत्याग्रह असो चंपारण्य सत्याग्रह असो अशा सत्याग्रहांमुळेच ब्रिटीश साम्राज्याला हादरे बसत होते. गांधींनी राजनैतिक लढाईला एक सभ्यतेचा गंध दिला होता.

आजही देशातील समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी याच सत्याग्रह आंदोलनाचा पर्याय अवलंबला जातो. सत्यासाठी ज्याच्याकडे त्रास सहन करण्याची शक्ती आहे त्यालाच सत्याग्रहाचा मार्ग अवलंबता येईल. गांधींजीनी याच मार्गाने सामान्य लोकांतही स्वातंत्र्याच्या भावनेची बीजे पेरली. स्वातंत्र्य म्हणजे काय? ते का आवश्यक आहे? त्यासाठी सामान्य लोकांनी कसा लढा दिला पाहिजे? अशा अनेक गोष्टी अगदी सहजसोप्या भाषेत सांगितल्यामुळेच सामान्य लोकांना सत्याग्रहाचा मार्ग अवलंबणे सहज शक्य झाले.

ADVERTISEMENT

अहिंसेच्या मार्गाने त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला नैतिक अधिष्ठान दिले. अनेकदा सत्याग्रह करताना हे आमरण उपोषणाचीही घोषणा करत. परंतु, सत्यासाठी आपली प्राणत्याग करण्याचीही तयारी असल्याचे ते यातून दाखवून देत. ते म्हणत, “ईश्वर सत्य नाही तर सत्य हाच ईश्वर आहे.” म्हणूनच सत्याचा आग्रह आणि सत्याच्या मार्गावर ठाम राहणे त्यांना इतर कशापेक्षाही जास्त महत्वाचे होते.

सुरुवातीला जरी गांधींच्या सत्याग्रहाची खिल्ली उडवली गेली असली तरी नंतरच्या काळात प्रत्येक अन्यायाला उत्तर देण्यासाठी सात्याग्रहासारखे दुसरे हत्यार नाही, हे सर्वांनाच कळून चुकले.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

जगण्यासाठी आवश्यक बनलेल्या वायफायचा शोध हॉलीवूडच्या या अभिनेत्रीने लावलाय

Next Post

पाकिस्तानी सैन्याची पळताभुई करून सोडणारे मेजर आसा राम

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

इतिहास

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021
इतिहास

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

4 January 2021
इतिहास

पाकिस्तानी सैन्याची पळताभुई करून सोडणारे मेजर आसा राम

3 January 2021
लेडी डायनाच्या आयुष्यातील रहस्य अजूनही उलगडले नाहीत
इतिहास

लेडी डायनाच्या आयुष्यातील रहस्य अजूनही उलगडले नाहीत

3 January 2021
इतिहास

अफगाणी सैनिकांसाठी युद्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

16 January 2021
इतिहास

तत्कालीन राजकाराभारावर प्रश्न उपस्थित केले म्हणून सॉक्रेटिसला विषप्राशन करावं लागलं होतं…

4 January 2021
Next Post

पाकिस्तानी सैन्याची पळताभुई करून सोडणारे मेजर आसा राम

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

21 April 2020
शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

20 June 2020
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

अफगाणी सैनिकांसाठी युद्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

16 January 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!