The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

जाणून घ्या मातृसत्ताक कुटुंबपद्धती जपणाऱ्या ‘किहनू’ बेटाबद्दल…!

by द पोस्टमन टीम
20 February 2022
in ब्लॉग, भटकंती
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


तुम्हाला कधी बाहेर फिरत असताना हे आढळून आलं आहे का की एखाद्या गावात किंवा शहरात असा काही भाग असतो किंवा अशा काही इमारती असतात ज्या अगदी जुन्या पडक्या असतात ? कधी कधी असं वाटतं की या जुन्या पडक्या इमारती किंवा हे जुने भाग काही बोलायचा सांगायचा प्रयत्न करत असतात. हे बघताना एक लक्षात येत की गोष्टी किती पटकन बदलतात. “परिवर्तन” हा शब्द साधा सोपा सरळ दिसतो पण त्याचा अर्थ तेवढाच गहन आहे. इंग्रजीत एक छान वाक्य आहे “There is only one thing which is constant and that’s change”.

आजच्या मानवाची पाळंमुळं ही जुन्या सभ्यतेत आहेत. आधी मानव आला मग सभ्यता आली मग रूढी-परंपरा आल्या मग शासन प्रणाली आली आणि अशा प्रकारे समाज हा टप्प्या टप्प्यात स्थापन आणि विकसित होत गेला. काही ठिकाणी हा समाज पितृसत्ताक होता तर काही ठिकाणी मातृसत्ताक.

कुटुंबातील व्यक्ती, मालमत्ता, आणि व्यवहार यांच्यावर जेव्हा स्त्रीची अधिसत्ता चालते तेव्हा त्याला मातृसत्ताक कुटुंबपद्धती असं म्हटलं जातं. मानवाच्या अप्रगत भटक्या अवस्थेमध्ये पुरुष शिकारी साठी बाहेर जात त्यामुळे कुटुंबातील मालमत्ता, आणि व्यवहार यावर स्त्रीची अधिसत्ता चालायची आणि त्यातूनच मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचा उगम झाला असे काही मानवशास्त्रज्ञ म्हणतात. या व्यवस्थेमध्ये कुटुंबाची वंशपरंपरा, मातेकडून अपत्यांना प्राप्त होत असे. मातृसत्ताक कुटुंबपद्धतीमध्ये मुली या वारसदार असत. धार्मिक कार्यात गृहप्रमुख असल्याने स्त्रियांना प्राधान्य असे.

मातृसत्ताक कुटुंबपद्धतीमध्ये वर-वधुकडे राहायला जात. मातृसत्ताक कुटुंबपद्धतीमध्ये पुरुषांचे स्थान गौण नसते. घरातील कामे स्त्रियांकडे व बाहेरील कामे पुरुषांकडे असे श्रमविभाजन असते. मातृसत्ताक कुटुंबपद्धतीमध्ये कुटुंबप्रमुख जरी स्त्री असली तरी घरचा कार्यकारी प्रमुख हा स्त्रीचा सख्खा भाऊ किंवा त्या घरातला थोरला मुलगा असतो.

ADVERTISEMENT

सिंधू संस्कृती आणि अन्य द्रविडी जमातींमध्ये मातृसत्ताक कुटुंबपद्धती अस्तित्वात होती असं मानणारा मानव शास्त्रज्ञांचा एक गट आहे. वेदोत्तर वाङ्मयामध्ये काही मातृसत्ताक कथाभाग आढळतात. भारतात ईशान्येस खासी व गारो या जमाती तर दक्षिण भारतात तोडा, कादर, व नायर या मातृसत्ताक जमाती आहेत.

तर आज आपण जाणून घेणार आहोत एस्टोनिया (Estonia) देशाच्या किहनू या बेटावर अस्तित्वात असलेल्या मातृसत्ताक समाजाबद्दल जो आता त्याच्या अस्ताकडे मार्गक्रमण करतो आहे.

भूतपूर्व सोव्हिएत संघराज्यांपैकी पश्चिमेकडील बाल्टिक किनाऱ्यावरील हा देश म्हणजे एस्टोनिया (Estonia). टॅलिन (Tallinn) ही एस्टोनियाची (Estonia) राजधानी. एस्टोनिया (Estonia) हा देश प्राकृतिकदृष्टीने कमी उंचीचे पठार आहे. या पठाराचा उत्तरेकडील भाग सपाट व दलदलीचा आहे. या देशाला बरीच नैसर्गिक बंदरे लाभली आहेत. या प्रदेशाचे हवामान सौम्य खंडार्गत आहे. थंडीत तापमान -5℃ ते -8℃ एवढे असते तर उन्हाळ्यात तापमान 17℃ एवढेच असते. या देशाचा उत्तरेकडील समुद्रकिनारा 150 दिवस गोठलेला असतो तर पश्चिमेकडील किनारा हा 50 दिवस गोठलेला असतो. या देशात उन्हाळ्यात पाऊस पडतो.

हे देखील वाचा

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

9व्या शतकात डेन्मार्कने एस्टोनिया (Estonia) जिंकून घेतला. 1346 मध्ये डेन्मार्कने हा देश जर्मन सरदारांना विकला. नंतर या देशाचा ताबा स्वीडनकडे आला. 1919 पर्यंत या देशावर विविध युरोपियन देशांची सत्ता होती. अखेर 31 डिसेंम्बर 1919 ला रशिया ने एस्टोनियाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. दुसऱ्या महायुद्धात नाझींनी एस्टोनियाच्या जनतेचा भरपूर छळ केला. सध्या रशिया एस्टोनियावर आपला हक्क सांगत आहे पण अमेरिकेने याला मान्यता दिली नाही. असा हा एस्टोनियाचा संक्षिप्त इतिहास.

तर या एस्टोनियाच्या दक्षिणेला किहनू (Kihnu) नावाचं एक छोटंसं बेट आहे. या बेटाची लोकसंख्या ही फक्त 700 आहे. आपल्या शहराच्या एखाद्या प्रभागाची संख्या ही या देशापेक्षा जास्त असेल. तर असं काय खास आहे या बेटाबद्दल? आज जगात कुठेही जा तुम्हाला बहुतांश ठिकाणी पितृसत्ताक कुटुंबपद्धती दिसून येते.

पण पृथ्वीवर अजूनही काही भाग असे आहेत जिथे मातृसत्ताक कुटूंबपद्धती आहे त्यातील एक म्हणजे हे किहनू (Kihnu) बेट. या बेटावर कुटुंब व सामाजिक व्यवहारात अधिसत्ता ही महिलांची आहे. 

किहनू (Kihnu) या बेटावर मासेमारी हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन व मासेमारी करण्याकरिता या बेटावरचे पुरुष हे वर्षभर समुद्रात असतात अशा वेळी घर आणि इतर सामाजिक जबाबदाऱ्या या इथल्या स्त्रियांवर येतात. इथल्या महिला फक्त इथल्या दैनंदिन जीवनात अधिसत्ता गाजवत नाहीत तर त्या या बेटाच्या रूढी, परंपरा, चालीरीती, संस्कृती याचं संवर्धन आणि रक्षणही करतात.

या बेटावर मुलांच्या शालेय शिक्षणाकडेही स्त्रियाच लक्ष देतात. इथल्या महिला या त्यांच्या येणाऱ्या पिढीला त्यांची पारंपरिक वाद्य कशी वाजवावीत याचे प्रशिक्षण लहानपणापासूनच देतात. जर तुम्ही कधी या बेटाला भेट दिली तर तुम्हाला दिसेल इथल्या लोकांचा विशेषतः महिलांचा एक वेगळा व पारंपरिक पोशाख आहे जो त्या केवळ सणासुदीला नाही तर रोज परिधान करतात.

इथले पुरुष बराच काळ बाहेर असल्याने या महिलांना पुरुषांची कामंही लीलया करताना दिसून येतात. उदाहरणार्थ, शेती व बागकाम करणे, वाहन दुरुस्ती करणे, इत्यादी. इथे सामाजिक ऐक्य राहावं या करता सामूहिक प्रार्थनेला आणि कौटुंबिक समारंभाला सर्व महिला एकत्र जमतात.

या बेटाबद्दल अजून एक अजब अशी गोष्ट म्हणजे इथे एखादी महिला ही 60 वर्षांची झाली की तिने तिच्या अंतयात्रेसाठीची तयारी करायची. ऐकून नवल वाटलं असेल ना पण हो ही गोष्ट खरी आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की स्वतःच्या अंतयात्रेची तयारी करायची म्हणजे नक्की काय करायचं ? तर इथल्या सर्व महिला या ख्रिश्चन धर्माच्या अनुयायी आहेत त्यामुळे त्यांच्यात एखादी व्यक्ती वारल्यानंतर त्याला जमिनीत दफन केलं जातं. दफन करताना मृत व्यक्तीला स्वच्छ करून नवीन वस्त्रे घातली जातात. त्यामुळे इथल्या महिला या 60 वर्षाच्या झाल्यावर दफन करतानाची जी वस्त्रे असतात ती स्वतः शिवतात.

ख्रिश्चन धर्मात दफन करण्यासाठी जमिनीत खड्डा खणावा लागतो आता हा खड्डा लवकर खणणं काही एका माणसाचं काम नाही याला किमान 4 माणसं लागतात या खड्डा खणणाऱ्या माणसांना “ग्रेव्ह डीगर” (Grave Digger) असं म्हणतात. तर या ग्रेव्ह डीगर(Grave Digger)बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला हातमोजे (Hand Gloves) तयार करतात.

आज इथली 70% जनता ही वृद्ध आहे. प्रतिकूल हवामानामुळे इथे शेती किंवा औद्योगिकरण झालेलं नाही ज्यामुळे इथली नवीन पिढी ही उदरनिर्वाहासाठी हे बेट सोडून दुसरीकडे स्थलांतरित होत आहे. 70% वृद्ध जनता व स्थलांतरित होणाऱ्या तरुण पिढीमुळे या बेटावरची मातृसत्ताक संस्कृती ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 2003 साली युनेस्कोने “Masterpiece of the oral and intangible heritage of humanity” अशी मान्यता दिली.

आज जगभरातील स्त्रियांचे प्रश्नांबाबत फक्त चर्चा केली जाते त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावलं उचलली जात नाहीत. स्त्रीला आधीही सक्षम होती आजही आहे आणि कायम राहील, पण स्रीला आपले कर्तृत्व सिद्द करण्यासाठी फक्त जागा आणि संधी हवी असते. अनेकदा जागा व संधी असूनही स्त्रियांना त्याचा उपयोग करता येत नाही.

काहीवेळा स्त्रियांची जागा, संधी व हक्क हिसकावून घेतले जातात आणि याची उदाहरणे वारसाहक्कापासून ते बौद्धिक संपदेपर्यंत घडताना दिसते. त्यामुळे नुसती आंतरराष्ट्रीय संस्थानांकडून “Masterpiece of the oral and intangible heritage of humanity” अशा मान्यता देऊन जगभरातील मातृसत्ताक संस्कृतीचे रक्षण होणार नाही. या संस्कृतीचं रक्षण करणे हे आपलं वौश्विक दायित्व आहे हे समजून विकसित व विकसनशील देशांनी मातृसत्ताक संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी पावलं उचलायला हवीत.

त्यामुळे नुसता आंतरराष्ट्रीय महिला दिन किंवा आंतरराष्ट्रीय कन्या दिन साजरा करून आम्ही स्त्रियांचा कसा सन्मान करतो हे दाखवण्यापेक्षा प्रामाणिक, कष्टाळू, ध्येयवेड्या, व पात्र स्त्रियांना योग्य संधी, प्रोत्साहन, व आधार दिला तर मातृसत्ताक संस्कृतीचं जतन, स्त्रीयांची आर्थिक व सामाजिक प्रगती असे दोन्ही हेतू साधता येतील व हाच स्त्रियांना दिलेला सर्वोच्च आदर असेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

धोनी हेडनला म्हणाला, “काय म्हणशील ते देतो, पण ही ‘मंगूस बॅट’ नको वापरू..!”

Next Post

खेरुका परिवाराने तेव्हा हार मानली असती तर आज बोरोसिल सारखा ब्रँड अस्तित्वात नसता

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

7 September 2022
क्रीडा

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
इतिहास

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

20 April 2022
ब्लॉग

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

15 April 2022
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

13 April 2022
ब्लॉग

धार्मिकतेबरोबरच धर्मचिकित्सेचा आग्रह धरणारे तत्वचिंतक: डेसिडेरियस इरास्मस

24 March 2022
Next Post

खेरुका परिवाराने तेव्हा हार मानली असती तर आज बोरोसिल सारखा ब्रँड अस्तित्वात नसता

या पठ्ठ्याने एका बोगद्यातून विमान उडवण्याचा विक्रम केलाय..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)