आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जोहान्स केप्लरचा जन्म दक्षिण जर्मनीत झाला. जेव्हा त्याचा सोळाव्या शतकात जन्म झाला त्यावेळी लोकांना वाटायचं की ग्रह पृथ्वीच्या भोवती गोलाकार वर्तुळात फिरतात तसेच मंगळ ग्रह हा एका वेगळ्या वर्तुळाकार मार्गाने उलट दिशेने पृथ्वीची प्रदक्षिणा मारतो.
परंतु केप्लरने लोकांचा हा गैरसमज दूरच केला नाही तर त्यांनी दाखवून दिलं की सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात आणि त्यांच्या भ्रमंतीच्या कक्षा ह्या गोलाकार नसून लंबवर्तुळाकार आहेत. त्याने ग्रहांच्या प्रदक्षिणेसंदर्भात केलेल्या नियमांना केप्लरस लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन म्हणून जगभरात ओळखले जाते.
आज या नियमांच्या बळावर फक्त ग्रहांचे स्थानच नाहीतर स्पेस स्टेशन व सॅटेलाईटचे प्रक्षेपणपण करणे देखील सहज शक्य झाले आहे.
जोहान्स केप्लरचा जन्म २७ डिसेंबर १५७१ मध्ये जर्मनीच्या स्वबिया याठिकाणी झाला. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची होती. लहानपणापासूनच तो आजारी असायचा. परंतु अभ्यासात हुशार असल्याने त्याला शिक्षणात यश प्राप्ती झाली आणि त्याला युनिव्हर्सिटी ऑफ टूबिंगेनची शिष्यवृत्ती मिळाली.
पुढे त्याला सर कोपर्निकस यांच्या कार्याविषयीची माहिती याठिकाणी मिळाली. कोपर्निकस यांचा दावा होता की सूर्य पृथ्वीभोवती नव्हे तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते. १५९४ मध्ये ऑस्ट्रियाच्या गाझ येथील सेमिनरी येथे तो गणिताचा प्रोफेसर म्हणून कार्यरत झाला. सोबतच दिगदर्शिका निर्मितीचे कार्य देखील करत होता. हे करत असताना त्याला जो मोकळा वेळ मिळायचा त्यात तो ज्योतिषशास्त्र आणि अंतराळशास्त्राचा अभ्यास करत होता.
१५९६ साली केप्लरने कोपर्निकसच्या दाव्यांचे समर्थन करणारी पत्रिका प्रकाशित केली. केप्लरचे हे कार्य फारच क्रांतिकारक होते.
यामुळे प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक मार्टिन ल्युथर त्याच्यावर प्रभावित झाला. परंतु कॅथलिक चर्चचा मात्र तिळपापड झाला कारण त्यांच्या धार्मिक मतांच्या विरोधात केप्लरचा दावा जात होता. याच कारणासाठी गॅलिलिओला रोमने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.
तो काळ प्रचंड धर्मांधतेने व्यापलेला काळ होता. त्या काळात धार्मिक श्रद्धा प्रबळ असल्याने, जो कोणी धर्माच्या विरुद्ध बोलायचा त्याला कडक शिक्षेला सामोरं जावं लागायचं. त्यामुळे केप्लरने जे केलं ते सरळ पोपच्या विरोधात जाणारं होतं.
त्याकाळी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या मताप्रमाणे अवकाश अस्तित्वात नसून स्वर्ग लोक आहे, ज्यात विविध पारलौकिक देवतांचा निवास आहे. त्यांच्या ह्या कल्पनाशक्तीला धर्मग्रथांची मोठ्याप्रमाणावर मान्यता असल्याने त्याकाळची बहुतांश जनता यावर विश्वास ठेवत असे, त्यात धर्ममत हे ईश्वरीमत या न्यायाने नवीन विचार स्वीकारणायची तयारी तत्कालीन लोकांची नव्हती, त्यामुळे अंतराळाच्या गोष्टी सांगणाऱ्या शास्त्रज्ञांना प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागायचं.
धर्ममताचा आदर म्हणून केप्लर म्हणाला की ख्रिश्नन धर्मात सूर्याला पिता म्हटले असून सर्व ग्रह त्याचा भोवती फिरतात हे सत्य आहे, त्याचा हा दावा स्वसंरक्षणार्थ असला तरी त्याने आपल्या लेखनात कुठेच असा दावा शास्त्रीय कारणांच्या आधारावर केलेला नव्हता.
ग्रहांची स्थिती व चक्र समजण्या संदर्भात केप्लरची पत्नी बार्बरा हिने मोलाची साथ दिली होती.
ग्रहांच्या कक्षेच्या अभ्यासासंदर्भात त्याने खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांच्याशी संपर्क साधला. केप्लरशी मतभेद असून देखील त्यांनी तयार केलेल्या दुर्बिणीच्या माध्यमातून ग्रहांचे निरीक्षण करण्यासाठी त्याला बोलावून घेतले. त्याने केप्लरची आपला सहाय्य्क म्हणून नेमणूक केली.
ब्राहे हा कधीच आपले संशोधन इतर कोणाला सांगत नसायचा, यामुळे केप्लर आणि त्याचे खटके उडायचे.
एकदा ब्राहे त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आले आणि केप्लर यांच्या हाती त्यांनी संशोधन केलेले काही महत्वपूर्ण कागद्पत्र लागले. ते कागदपत्र बघून केप्लरला आनंद झाला आणि त्याने ते संशोधन अत्यंत चलाखीने आपल्या नावावर करून घेतलं.
१६०१ साली ब्राहेच्या मृत्यूनंतर १९०१ साली त्याची कंबर खोदून शास्त्रज्ञांनी हाडांचे परीक्षण केले, त्यांना वाटत होतं की केप्लरने ब्राहेचा खून करून त्याचं संशोधन पळवलं आहे.
ब्राहेच्या शरीरावर सापडलेल्या मर्क्युरी या अत्यंत विषारी पदार्थाचा अंश देखील ब्राहेच्या सांगाड्यातून प्राप्त झाला होता, असे म्हटले जाते.
यामुळे केप्लरवर ब्राहेच्या खुनाचा आरोप होता. पण ब्राहेच्या संशोधनाचा वापर करून केप्लरने अंतराळाळतील ग्रहांच्या परिक्रमेची पूर्ण माहिती घेऊन, आपल्या प्रसिद्ध तीन नियमांची निर्मती केली. या तीन नियमांमुळे तो इतिहासात अमर झाला.
केप्लरचे तीन नियम:-
१) पृथ्वीची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ही लंबगोलाकार कक्षेत पूर्ण होते.
२) पृथ्वी प्रदक्षिणेदरम्यान एक विशिष्ट अंतर एका विशिष्ट वेळात पूर्ण करते.
३) एका कक्षेतील प्रदक्षिणेला जितका वेळ लागतो तो सेमी मेजर एक्सिसच्या घना इतका असतो.
या तीन नियमांच्या माध्यमातून केप्लरने खगोलशास्त्रातील एका अत्यंत मूलभूत सत्याची उकल केली होती. यामुळे पुढे अंतराळ संशोधनाला एक वेगळी दिशा मिळाली आहे.
आज अंतराळात असलेल्या सॅटेलाईट्स आणि स्पेस स्टेशनच्या कक्षावार संस्थापनेत या केप्लरच्या तीन नियमांचा आधार घेतला जातो. केप्लर हा माणूस ५८ वर्ष जगला, यात त्याने मानवाला उपयुक्त असे महत्वाचं संशोधन खगोलशास्त्रात केलं. १५ नोव्हेंबर १९०९ ला त्याचा आजारपणात मृत्यू झाला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.