The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

आपण घेतोय ते सोनं किती शुद्ध आहे हे कसं ओळखायचं ..?

by द पोस्टमन टीम
30 March 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


हिरा है सदा के लिए! असं जरी म्हटलं जात असलं तरीही भारतीयांना सोन्याचा सोस जास्त आहे. हौसेसाठी म्हणून दागिने असोत किंवा गुंतवणूकीसाठी असो सोनं ही भारतीयांची सदासर्वकालाची पहिली पसंती आहे. चोख सोनं खरेदी करताना त्याचे कॅरेट बघितले जातात काय असतात हे कॅरेट आणि ते कसे ओळखतात?

सोनं खरेदी करताना ते “चोख” किंवा “शुध्द” असल्याची खात्री केली जाते. मात्र हे चोख सोनं नेमकं काय असतं? हे फारसं कोणाला माहित नसतं. गेल्या दीड दशकांपासून दागिन्यांवर सोन्याची शुध्दता लिहिणं, मार्कींग करणं बंधनकारक केल्यानं ग्राहकांना किमान आपण पैसे मोजून जो सोन्याचा दागिना घेत आहोत त्यात सोनं किती आहे? हे समजतं तरी पूर्वी मात्र सगळा कारभार रामभरोसे असायचा ग्राहक आपापल्या सराफ़ाकडे विश्र्वास ठेवून खरेदी करत.. सोन्याच्या शुध्दतेची खातरजमा करण्याचा केवळ तोंडी हमीचा पर्याय होता. जुना दागिना मोडायला गेलं की मग यातल्या भेसळीची कल्पना येत असे.

मुळात सोन्याची शुध्दता काय असते? तर शुध्द सोन्यात कशाचीही भेसळ केलेली नसते. इतर कोणताही धातू त्या सोन्यात नसतो.

सोन्याची शुध्दता कॅरेट या परिमाणात मोजतात आणि याचा सर्वात शुध्द प्रकार म्हणजे २४ कॅरेट. यामधे ९९.९९ टक्के सोनं असतं. आता तुम्ही म्हणाल की सर्वात शुध्द सोन्यातही ९९.९९ टक्केच? शंभर टक्के नाहीतच? याचं कारण सोन्याचा दागिना घडविताना त्याला थोडा कडकपणा आणावा लागतो.

शुध्द स्वरूपातलं सोनं मऊ असतं त्यामुळे ते दागिन्याचा आकार टिकवून धरू शकत नाही. सर्वात शुध्द सोनं हे दागिन्यांसाठी वापरलं जात नाही ते याच कारणासाठी. सोन्याची नाणी किंवा बिस्किटांसाठी ते वापरलं जातं.

The Bureau of Indian Standards (BIS) चा हॉलमार्कचा शिक्का सोन्यावर असणं याचाच अर्थ त्या दागिन्यातल्या सोन्याची शुद्धता पडताळलेली असणं. असा शिक्का दागिन्यांवर असणं हे सोन्याचा दर्जा आणि पर्यायानं त्याची विक्री करणार्‍या सोनं पेढीची पत ठरवतं तर सोन्याच्या नाणी आणि बिस्किटांवर हा शिक्का बंधनकारक आहे.

ADVERTISEMENT

२४ कॅरेट व्यतिरीक्त २२ आणि १८ कॅरेटमधेही सोनं विकलं जातं. यानुसार त्याच्या किमतीतही फ़रक पडतो. दागिन्यांसाठी मात्र २२ कॅरेट सोनंच सर्वसाधारणपणे वापरलं जातं. सोनं हा अत्यंत लवचिक असा धातू असल्यानं त्याला अगदी सहज कागदापेक्षाही पातळ बनविता येतं. पण म्हणूनच त्याचे दागिने घडविणं अवघड आणि कौशल्याचं काम आहे. याच कारणामुळे सोन्याचे दागिने विकताना त्यात “घडणावळ” किंवा “मजूरीही” भक्कम रकमेची असते. जितका दागिना नाजूक तितकी त्याची मजूरी जास्त.

हे देखील वाचा

या एका बँकेमुळे जगात पुन्हा आर्थिक मंदीचे सावट येऊ घातले आहे

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

रशिया दुसऱ्या महायुद्धापासून जपानच्या या बेटांवर ठाण मांडून बसलाय!

सोनं खरेदी करताना म्हणूनच हॉलमार्क असलेलं खरेदी करावं कारण या सोन्याच्या शुध्दतेला भारत सरकारची हमी असते. तुम्ही कधी काळजीपूर्वक हॉलमार्क असणारा दागिना पाहिला असेल तर त्यावर हॉलमार्कचा शिक्का आणि सोबत ९९९,९१६, ८७५ असे काही अंकही दिसतील. या आकड्यांतच तुमच्या सोन्याची शुध्दता दडलेली असते.

२४ कॅरेट, हॉलमार्क आणि ९९९ हा अंक असणारं सोनं सर्वात जास्त शुध्द सोनं आहे हे लक्षात घ्या. ९९९ म्हणजे त्या दागिन्यात वापरलं गेलेलं सोनं हे ९९९ इतकं चोख सोनं आहे. या वर्गवारीनुसार २३ कॅरेट सोन्यात ९५८, २२ कॅरेट सोन्यात ९१६, २१ कॅरेट सोन्यात ८७५ आणि १८ कॅरेट सोन्यात ७५० अंक तुम्हाला आढळतील.

सोनं खरेदी करताना केवळ हॉलमार्कची खातरजमा करून भागणार नाही तर त्याचा कागदोपत्री पुरावा म्हणून त्याच्या शुध्दतेचं प्रमाणपत्रही सोबत घेणं जरूरी आहे. सोन्यात जर हिरे किंवा इतर काही मौल्यवान खडे, मोती जडवले असतील तर त्यांच्या शुध्दतेचं स्वतंत्र प्रमाणपत्र घेणं जरूरी आहे.

२२ कॅरेट सोन्यात ९१.६ टक्के सोनं आणि त्याच्या जोडीला इतर धातू असतात. जेणेकरून दागिन्याचा आकार वर्षानुवर्षं जसा आहे तसाच रहावा. बरेचदा तुम्ही पाहिलं असेल विशेषत: आजी, पणजीच्या काळातले दागिने असतील तर, की अनेक वर्षांच्या वापरांनंतर या दागिन्यांवरची नक्षी गायब झालेली असते, ते गुळगुळीत होतात आणि त्यांचा मूळ आकारही बिघडलेला असतो. याचं कारण ते सोनं शुध्द असतं. सोन्याची घट तर होतेच पण त्या सोबतीला हेही कारण असतंच.

याशिवाय आणखी एक प्रकार म्हणजे १८ कॅरेट सोनं. यामधे ७५ टक्के सोनं आणि बाकी २५ टक्के इतर धातू असतात. मोती, हिरा, मीनाकाम, कुंदन असं काम असलेले सोन्याचे दागिने हे सहसा १८ कॅरेटमधे बनविले जातात आणि तरीही ते २४ कॅरेटच्या तुलनेत महागही असतात. याचं कारण म्हणजे एकतर यात हिरा, मोती, कुंदन, मीना यांची किंमत असते आणि दुसरं म्हणजे अर्थातच हे दागिने बनविण्यासाठी कारागिरांना घ्यावी लागणारी मेहनत. हिर्‍याला पैलू पाडणं हेच मुळात कौशल्याचं आणि खर्चिक काम आहे. असा हिरा सोन्याच्या कोंदणात बसविणं आणखीन कौशल्याचं काम.

म्हणूनच १८ कॅरेटमधे असणारा एकाच वजनाचा हिर्‍याचा दागिना हा २४ कॅरेट सोन्याच्या तुलनेत महाग असतो. (अर्थात यातही हिर्‍याची प्रतही महत्त्वाची असते). २२ आणि २४ कॅरेटच्या तुलनेत १८ कॅरेट सोनं मजबूत असतं. टिकायला हे इतर दोघांपेक्षा जास्त चांगलं.

सोन्याचे कॅरेट कमी जास्त करताना इतर धातू मिसळले जातात, हे धातू प्रामुख्यानं चांदी, तांबं, निकेल, झिंक यांचा समावेश असतो. यापैकी एक किंवा कधी कधी सगळे सोन्यात मिसळून त्यापासून विविध कॅरेटचे सोन्याचे दागिने बनतात.

सोनं खरेदी करताना केवळ हॉलमार्कची खातरजमा करून भागणार नाही तर त्याचा कागदोपत्री पुरावा म्हणून त्याच्या शुध्दतेचं प्रमाणपत्रही सोबत घेणं जरूरी आहे. सोन्यात जर हिरे किंवा इतर काही मौल्यवान खडे, मोती जडवले असतील तर त्यांच्या शुध्दतेचं स्वतंत्र प्रमाणपत्र घेणं जरूरी आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

इब्राहिम लोदी – लोदी वंशाचा शेवटचा सुलतान

Next Post

या तरुणाच्या शोधामुळे शेतातला ताजा भाजीपाला आपल्याला शहरात खायला मिळणार आहे

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

विश्लेषण

या एका बँकेमुळे जगात पुन्हा आर्थिक मंदीचे सावट येऊ घातले आहे

8 October 2022
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
विश्लेषण

रशिया दुसऱ्या महायुद्धापासून जपानच्या या बेटांवर ठाण मांडून बसलाय!

18 May 2022
विश्लेषण

३००० वर्षांपूर्वी माया संस्कृतीतील लोकांनी प्राण्यांचा व्यापार का केला?

18 April 2022
विश्लेषण

शास्त्रज्ञांनी २ हजार वर्ष जुन्या खजुराच्या बिया रुजवून खजुराच्या प्रजातीचं पुनरुज्जीवन केलंय!

16 April 2022
विश्लेषण

वंचित घटकांमधल्या हजारो जणींचे भान जागवणारी ‘सावित्रीची लेक’!

16 April 2022
Next Post

या तरुणाच्या शोधामुळे शेतातला ताजा भाजीपाला आपल्याला शहरात खायला मिळणार आहे

या लहान पोराने रात्री घरात घुसलेल्या चोराला असं उल्लू बनवून पोलिसांच्या हवाली केलं होतं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)