The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

शेजारील देशांनी वाळीत टाकूनही हा देश स्वबळावर उभा राहिला आहे!

by द पोस्टमन टीम
15 April 2022
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


सध्या आपल्या शेजारील राष्ट्र असलेल्या श्रीलंकेची राजधानी कोलंबो ही आशियातील सर्वात अस्वस्थ आणि अशांत शहर बनलं आहे. कोलंबोमध्ये श्रीलंका सरकारच्या विरोधात वारंवार हिंसक निदर्शने होत आहेत. श्रीलंका सरकार देशातील २५ दशलक्ष लोकांना उपाशी मारण्याचा विचार करत आहे, असा आरोप तेथील नागरिक करत आहेत. सरकारच्या भोंगळ कारभारामुळं श्रीलंकेत सध्या एक चहाचा कप १०० रुपयांना मिळत आहे. एलपीजीसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

याशिवाय श्रीलंकेत पेट्रोल-डिझेलही संपलं आहे. श्रीलंका सरकारकडे पेट्रोल घेण्यासाठीही पैसे नाहीत. या संकटाच्या काळात भारतानं ४० हजार मेट्रिक टन डिझेल आणि ४० हजार टन तांदळाच्या चार खेपा श्रीलंकेला पाठवून आपला शेजार धर्म पाळला आहे. असं म्हणतात संकाटाच्या काळात आपले शेजारी सर्वात अगोदर मदतीसाठी येतात. भारतानं वेळोवेळी ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे.

मात्र, जगातील सर्वच देशांना भारतासारखे शेजारी लाभत नाहीत. जगाच्या पाठीवर काही देश असेही आहेत की ज्यांना शेजारी राष्ट्रांच्या आडमुठेपणामुळं मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. अशा देशांमध्ये कतारचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. २०१७ मध्ये शेजारील राष्ट्रांनी केलेल्या नाकेबंदीमुळं कतारची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. मात्र, कतारनं हातपाय न गाळता शांत डोक्यानं परिस्थितीचा सामना केला. 

गेल्या चार वर्षांच्या काळात कतारच्या अर्थव्यवस्थेनं एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणं भरारी घेतली आहे. या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा…

कतार, कच्च्या तेलाच्या विहिरी असलेला एक छोटासा देश. या देशाचा बहुतांश भागात वाळवंट आहे. त्यामुळं तिथे शेती करता येत नाही. कतार आपल्या ९९ टक्के अन्न पुरवठ्यासाठी इतर देशांवर अवलंबून आहे. कतारच्या ८० टक्के खाण्यापिण्याच्या गरजा मोठ्या आखाती देशांकडून पूर्ण होतात.

जवळपास २२.४ लाख लोकसंख्या असलेल्या या देशावर जून २०१७मध्ये शेजारच्या देशांनी निर्बंध टाकले आणि नाकेबंदी केली. कतार दहशतवादी कारवायांना मदत करत असल्याचं कारण देऊन ही नाकेबंदी करण्यात आली होती. ५ जानेवारी २०२१ रोजी सौदी अरेबिया, बहरीन, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि इजिप्तनं कतारची साडेतीन वर्षांची नाकेबंदी संपवली. आखाती देशांच्या सहकार्य परिषदेच्या ४१ व्या शिखर परिषदेदरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या अल-उला जाहीरनाम्यामुळं कतार आणि नाकेबंदी करणार्‍या देशांमधील प्रवास आणि व्यापार पुन्हा सुरू झाला.

या साडेतीन वर्षांच्या काळात कतारनं आपल्या पद्धतीनं संकटाचा सामना केला. ही नाकेबंदी कतारच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी महत्त्वाची घटना ठरली. कतार आणि त्याचे आखाती शेजारी यांच्यातील मतभेद नवीन नाहीत. परंतु, २०१७ च्या नाकेबंदीनं कतारला आपलं स्वतंत्र परराष्ट्र धोरण तपासण्यास भाग पाडलं.

हे देखील वाचा

जुगारात पैसे उडवून जिओनीच्या मालकाने या लिडिंग स्मार्टफोन कंपनीला कायमचं संपवलंय..!

झिम्बाव्वेने १० हजार करोड डॉलर्सपर्यंतच्या नोटा छापल्या होत्या, पण…

सरकारच्या या नियमामुळे भारतातील ‘गुगल अर्थ’ इमेजेस क्लिअर नसतात..!

कतारच्या परराष्ट्र धोरणामध्ये मुस्लिम ब्रदरहुड या राजकीय इस्लामी चळवळीला पाठिंबा देण्यात आला होता. मुस्लिम ब्रदरहुडला कतारची नाकेबंदी करणाऱ्या चार देशांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं होतं. म्हणून कतारच्या शेजाऱ्यांनी कतारची नाकेबंदी केली. नाकेबंदीचा उद्देश कतारवर आर्थिक दबाव आणणे हा होता. यामुळं कतार सौदी अरेबिया, यूएई आणि बहरीनपासून आर्थिकदृष्ट्या विभक्त झाला आहे. 

नाकेबंदीपूर्वी, कतारनं आपल्या शेजाऱ्यांकडून बर्‍याच वस्तू आणि सेवा आयात केल्या होत्या. नाकेबंदीनंतर, कतारला त्वरीत पर्यायी पुरवठा मार्ग विकसित करण्याची गरज भासू लागली. मूलभूत वस्तू आणि सेवांचं देशांतर्गत उत्पादन वाढवणं आणि २०१७च्या सुरुवातीस काम सुरू केलेल्या हमद बंदराचा विस्तार करण्याची नितांत गरज जाणवत होती. यामुळं कतारला अधिक स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली आणि देशाच्या आर्थिक विविधीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली.

उदाहरणार्थ, सौदी अरेबियातून आयात केलेल्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर अवलंबून असलेला कतारनं या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्वयंपूर्णता मिळवली. नाकेबंदीपूर्वी, कतार मुख्यत्वं सौदी अरेबियातून दररोज ४०० टन दूध आणि दही आयात करत असे.

पण नाकेबंदीनंतर काही महिन्यांतच कतारनं विविध शाश्वत योजना तयार केल्या. त्यानं युरोप आणि यूएसमधून हजारो गायी आयात केल्या आणि ‘बलदाना’ याठिकाणी पहिलं स्थानिक डेअरी आणि मीट फार्म स्थापन केलं. यामुळं कतार दूध आणि दुग्धजन्यपदार्थांच्या बाबतीत अधिक सक्षम बनू शकला. शिवाय कधीकाळी इतरांवर अवलंबून असलेल्या हा देश दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीकडेही वाटचाल करू लागला.

अन्नाचा पुरवठा वाढवण्यासाठी, अनेक स्थानिक कंपन्यांनी सुपरमार्केटमध्ये ताजी फळे आणि भाज्या पुरवण्यासाठी डझनभर शेती प्रकल्प हाती घेतले. कतारची अन्न सुरक्षा बळकट करण्याच्या या हालचाली कोरोनाच्या काळात फार महत्त्वाच्या ठरल्या.

तीन वर्षांपूर्वी कतारमध्ये, फळं आणि भाज्यांचं स्थानिक उत्पादन १० टक्क्यांपेक्षा जास्त नव्हतं. आज हेच प्रमाण जवळपास 30 टक्क्यांपर्यंत गेलं आहे. 

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटनं संकलित केलेल्या ताज्या ग्लोबल फूड सिक्युरिटी इंडेक्समध्ये कतारनं मध्य पूर्वेतील अन्न सुरक्षेमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. जागतिक स्तरावर कतार १३व्या क्रमांकावर आहे.

नाकेबंदीनंतर सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत कतारनं मध्य पूर्वेतील सर्वात मोठं बंदर असलेल्या हमद बंदराचं उद्घाटन केलं. नवीन सागरी मार्ग सुरक्षित करण्यात आणि मूलभूत पुरवठा व वस्तू उपलब्ध करून देण्यात या बंदराची महत्त्वाची भूमिका होती.

कतार एअरवेजनं २०१७ मध्ये चार ब्लॉकिंग राष्ट्रांमधील १८ शहरांमध्ये प्रवेश गमावल्यानंतर मोठ्या प्रमाणात तोटा अनुभवला. त्यानंतर मात्र, या कंपनीनं मागे वळून पाहिलं नाही. या नाकेबंदीचा प्रभाव टाळण्यासाठी दोहाला इतर देशांकडं वळण्यास भाग पडलं. परिणामी, कतारनं तुर्कस्तान आणि इराण या प्रादेशिक मित्र देशांसोबत आपले व्यापारी संबंध दृढ केले.

नाकेबंदी करणार्‍या देशांद्वारे पुरवठा मार्ग बंद झाल्यानं कतारसाठी इराण अन्न, पाणी आणि औषधांचा मुख्य स्त्रोत बनला. २०१७ आणि २०१८ दरम्यान या दोन्ही देशांमधील व्यापार अचानक दोन अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला.

अन्न आणि व्यापाराव्यतिरिक्त, कतारमध्ये गेल्या तीन वर्षांत महत्त्वाकांक्षी नवीन कला आणि सांस्कृतिक प्रकल्प उभे राहिले आहेत. यामध्ये २०२२ मधील फिफा विश्वचषक स्पर्धेचाही समावेश आहे. २०१९ मध्ये कतारनं आपलं राष्ट्रीय संग्रहालय उघडलं ज्याची किंमत ५०० मिलीयन डॉलर्सपेक्षाही जास्त आहे.

एकूणच, कतारनं आपली नाकेबंदी सकारात्मक पद्धतीनं घेत, आपला विकास केला. जगातील इतर देशांनी याबाबत नक्कीच कतारचा आदर्श घेतला पाहिजे, यात शंका नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ICC नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम आजही इंग्लंडचा हा क्लब बनवतो..!

Next Post

एका लहानशा दगडामुळं ग्रीक संस्कृतीच्या इतिहासाच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय!

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

विश्लेषण

जुगारात पैसे उडवून जिओनीच्या मालकाने या लिडिंग स्मार्टफोन कंपनीला कायमचं संपवलंय..!

25 November 2023
विश्लेषण

झिम्बाव्वेने १० हजार करोड डॉलर्सपर्यंतच्या नोटा छापल्या होत्या, पण…

24 November 2023
विश्लेषण

सरकारच्या या नियमामुळे भारतातील ‘गुगल अर्थ’ इमेजेस क्लिअर नसतात..!

23 November 2023
इतिहास

पाकीट विसरले म्हणून नाही तर स्टोअर कार्ड्सच्या या समस्येवर उपाय म्हणून क्रेडिट कार्ड सुरु झाले..

22 November 2023
गुंतवणूक

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

21 November 2023
विश्लेषण

मुंगीएवढ्या लहान किड्यांनी इथं आपलं वेगळं साम्राज्यच उभं केलंय

20 November 2023
Next Post

एका लहानशा दगडामुळं ग्रीक संस्कृतीच्या इतिहासाच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय!

टेस्ट क्रिकेटची बादशहा असलेली न्यूझीलंडची टीम २६ धावांवर ऑल आऊट झाली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023

जुगारात पैसे उडवून जिओनीच्या मालकाने या लिडिंग स्मार्टफोन कंपनीला कायमचं संपवलंय..!

25 November 2023

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)