आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जगातील सर्वांत दु:खी, बेअक्कल, मूर्ख आणि तितकीच दुर्दैवी स्त्री म्हणून इतिहासकरांना कायमच या दुर्दैवी व्यक्तिमत्त्वाबद्दल खेद वाटतो. ही स्त्री आतून प्रचंड निराश, दु:खी, दुराग्रही, आणि विक्षिप्त असली तरी, ती जगातील सर्वांत मोठ्या नेत्याची आणि जगातील तिसऱ्या श्रीमंत व्यक्तीची पत्नी होती.
एकाच वेळी टोकाचे विरोधाभासी सत्य जगणारी आणि आजही इतिहासकरांना तिच्या सत्य स्वरूपाबद्दल बुचकळ्यात टाकणारी ही स्त्री होती, इव्हा ब्राऊन, ना*झी पक्षाचा प्रमुख, जर्मनीचा तारणहार (यावर इव्हाचा प्रचंड विश्वास होता), दुसऱ्या महायु*द्धाचा आणि वंशसं*हाराचा प्रणेता ॲ*डोल्फ हि*टल*रची पत्नी!
हि*टल*रसोबत लग्न केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ती हि*टल*रसोबत मृतावस्थेत आढळून आल्यानंतर प्रत्येकाने तिचे वर्णन ‘मूर्ख सुंदरी’ असेच केले आहे. काही लोकांना हि*टल*रवरील तिचे प्रेम म्हणजे मूर्खपणाचा आणि आंधळ्या प्रेमाचा कळस वाटत असले तरी, काहींच्या मते मात्र ती हि*टल*रच्या कृष्णकृत्यातील समभागीदार आहे.
इतकेच नाही तर ना*झी प्रचारतंत्रामागील खरी प्रेरणा तिचीच असल्याचेही काही लोकांचे मत आहे. अर्थात, याबद्दल काही मतभेद असतीलही!
एक २३ वर्षीय सुंदर युवती आणि फोटोग्राफ असिस्टंट इव्हा ब्राऊन, ॲ*डोल्फ हि*टल*रची प्रेयसी होण्याचे गुपित घेऊन जगत होती. म्हटले तर हे गुपित एकाच वेळी वरदानही होते आणि शापही. इव्हा आणि हि*टल*र यांच्यातील नाते अनेक वादळातून निसटूनही शेवटी आत्मह*त्येच्या वळणावर येऊन ठेपले. दहा वर्षांच्या त्यांच्या प्रवासात दोघांमध्ये अनेकदा टोकाच्या वितंडवादाचे प्रसंगही निर्माण झाले.

पण, इव्हा आपल्या विचारांवर प्रभाव टाकते, असे हि*टल*रचे मत होते. “माणसाचे चरित्र दोन गोष्टींवर ठरते, एक म्हणजे तो कोणत्या स्त्रीशी लग्न करतो आणि दुसरे म्हणजे तो कसा मरतो,” त्याचा मित्र अर्नेस्टजवळ हि*टल*र हे विचार नेहमी बोलून दाखवत असे.
हि*टल*रने इव्हाशी लग्न केले आणि दुसऱ्या दिवशी तिच्यासोबतच आत्मह*त्या केली. पण ही इव्हा नेमकी होती तरी कशी, जिने हि*टल*रवर आपल्या व्यक्तिमत्त्वाची इतकी गडद छबी सोडली होती?
इव्हा ही इतिहासातील अत्यंत बेअक्कल आणि क्षुल्लक पात्र असल्याचे अनेकांचे मत असले तरी, ती हि*टल*रची कट्टर अनुयायी होती, त्याची प्रामाणिक शिष्या होती. हि*टल*रने आपल्या लष्करी सहाय्यकाजवळ तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. “जेव्हा सगळे सहकारी मला सोडून जात होते, तेव्हा ही स्त्री माझ्या आयुष्यात आली. माझ्या दृष्टीने ही गोष्ट किती लाखमोलाची आहे, यावर तुझा विश्वासही बसणार नाही.”
हि*टल*र आपल्या खाजगी फोटोग्राफर हैरीच हॉफमनला भेटण्यासाठी त्याच्या स्टुडीओमध्ये गेला तेव्हा, त्याची असिस्टंट असणाऱ्या इव्हाशी त्याची पहिली भेट झाली. स्टुडीओत आलेल्या या बड्या यजमानाचा पाहुणचार करण्यासाठी इव्हा लगबगीने जाऊन एक बिअर आणि बेव्हेरीयन मिटलोफ घेऊन आली. १७ वर्षीय इव्हाने हि*टल*रचे लक्ष वेधून घेतले. इव्हा पारंपारिक कॅथोलिक कुटुंबात वाढली होती. छोटे पण सोनेरी छटा असणारे केस, निळ्या डोळ्यांची इव्हा कॅथोलिक कॉन्व्हेंटमध्ये शिकली असली तरी, तिच्यात स्त्रीसुलभ कावेबाजपणा होता.
हॉफमनच्या मते, तिचे सौंदर्य आणि त्यासोबत असलेला अल्लड दृष्टीकोन सोडल्यास हि*टल*रला भावातील असे काही विशेष गुण तिच्यात नव्हते. पण तिच्यामध्ये त्याला थोडा विसावा मिळे आणि कधीकधी हि*टल*र तिच्यामध्ये स्वतःचीच छबी पाहत असे.
जर्मनीच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या हि*टल*रला इव्हा ही एकच प्रेयसी होती, असे अजिबात नाही. ब्रिटीश लेखक डेव्हिड प्रिस-जोन्सने वर्णन केल्यानुसार हि*टल*रच्या पायावर डोके टेकवण्यासाठी जर्मनीमधील असंख्य स्त्रिया अक्षरश: वेड्या होत असत. तो ज्या रस्त्यावरून जाई ती धूळ चाटायलाही त्या मागे पुढे पाहत नसत. स्त्रियांमध्ये हि*टल*रची लोकप्रियता किती होती हे समजायला एवढे वर्णन पुरेसे आहे.
हि*टल*रकडून एकनिष्ठतेची अपेक्षा करणं चुकीचं आहे हे ब्राऊनला ठाऊक होतं. याबद्दल ती लिहिते, “जरी तो पुन्हा प्रेमात पडला तरी, मी त्याच्या मार्गात कधीच आडवी येणार नाही. माझे काय होईल याची चिंता त्याने का करावी?”
पण, तरीही हि*टल*रचे तिच्याकडे दुर्लक्ष करणे तिला सहन होत नव्हते. तिच्या तेविसाव्या वाढदिवशी हि*टल*रने तिला गिफ्ट्स दिले नाहीत, त्याबद्दल तिने दुःख व्यक्त केले. “त्याने माझ्यासाठी काही घेतले नाही तरी, मी स्वतःसाठी नेकलेस, इअररिंग्ज आणि एक अंगठी घेतली आहे, त्यालाही हे आवडेल अशी आशा वाटते.”
ब्राऊनसोबतचे आपले नाते हि*टल*रने नेहमीच गुप्त ठेवले. इव्हाने लिहिलेली प्रेमपत्रेही तो ताबडतोब जाळून टाकत असे. फक्त इव्हाच नाही तर इतर त्याच्या इतर प्रेयसींनी लिहिलेली प्रेमपत्रेही तो जाळून टाकत असे. हि*टल*रशी लग्न करण्याचा इव्हाचा आग्रह त्याला मान्य नव्हता. अगदी लग्न करण्याच्या आदल्या दिवसांपर्यंत त्याचा या लग्नाला नकारच होता.

माझ्या कामाशीच माझे लग्न झाले असून मी माझे आयुष्य जर्मनीसाठी वाहून घेतल्याचे हि*टल*र नेहमी सांगत असे. या कामात माझ्या संसारामुळे व्यत्यय येऊ शकतो, असे त्याचे मत होते. पण, प्रेमसंबधांचे त्याला विशेष आकर्षण होते.
हि*टल*रला प्रेयसी आहे हे जरी उघड झाले असते तरी, हि*टल*रच्या प्रतिमेला तडे गेले असते. जर्मन लोकांच्या भल्यासाठी आपले आयुष्य वेचणारा आपला देवासमान नेता एकटा आहे, ही जी स्वप्रतिमा त्याने उभी केली होती, त्याला प्रेयसीच्या असण्याने तडे गेले असते.
शिवाय, लग्नाची एक काळी बाजू म्हणजे लग्नामुळे अधिकार निर्माण होतो, असे हि*टल*रने पूर्वीही एकदा म्हटले होते. “म्हणून, प्रेयसी असणे कधीही चांगलेच. त्यामुळे मनावरील दडपण कमी होते.” म्हणूनच हि*टल*र ब्राऊनशी असलेले आपले नाते लपवून ठेवत असे.
हि*टल*र आणि ब्राऊनच्या नात्यात ब्राऊन नेहमीच वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत असे. तिने अनेकदा आत्मह*त्येचाही प्रयत्न केला होता. काही वर्षांपूर्वीच हि*टल*रची पुतणी आणि त्याची प्रेयसी गेली रुबेलने आत्मह*त्या केली होती. हि*टल*रच्या निकटच्या वर्तुळात जर दुसऱ्या कोणी आत्मह*त्या केली असती, तर यामुळे हि*टल*रचे करिअर संपुष्टात आले असते. म्हणून इव्हाच्या या आत्मह*त्यांच्या धमक्यांनी हि*टल*र अस्वस्थ होत असे.
पण, हि*टल*रची सेक्रेटरी ख्रिस्ता श्रोओदेरच्या मते ब्राऊनच्या आत्मह*त्यांच्या धमक्या म्हणजे तिचे कटकारस्थानच असे. “आत्मह*त्येची धमकी देत ती त्याला वळवण्याचा प्रयत्न करत असे आणि अर्थातच शेवटी तिने यश मिळवलेच. कारण, हि*टल*रच्या जवळच्या वर्तुळातील ही दुसरी आत्मह*त्या हि*टल*र सहन करू शकला नसता.”
ब्राऊन हि*टल*रची प्रेयसी असली तरी, तिने ना*झी पक्षात प्रवेश केला नाही. पण, ती हि*टल*रच्या धोरणांचे समर्थन करत असे. हि*टल*रच्या अंतर्गत मंडळातील ती एक महत्त्वाची व्यक्ती होती. १९३० ते १९४० या काळात हि*टल*र कोणाला भेटणार, कोणाला नाही, याकडे इव्हा बारकाईने लक्ष ठेवत असे. इव्हामुळेच अल्बर्ट स्पिर आणि जोसेफ गोबेल्स यांची हि*टल*रशी घनिष्ठता वाढली.
म्हणूनच ब्राऊन फक्त एक उथळ मुलगी होती म्हणणे योग्य वाटत नाही. हि*टल*रच्या अंतर्गत वर्तुळातील जी श्रेणी होती त्यामध्ये इव्हाचे स्थान खूपच वरचे होते. दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात इव्हाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. ती एक तर हलक्याफुलक्या कादंबऱ्या वाचत असे किंवा तासनतास फक्त सजण्या-धजण्यात वेळ घालवत असे. कधीकधी तर दिवसातून सात-आठ वेळा कपडे बदलत असे.
हि*टल*र त्यावेळी यु*द्धात व्यस्त होता. ना*झी प्रचारतंत्राचा प्रसार करण्यातही इव्हाची भूमिका महत्त्वाची होती. हि*टल*रच्या माउंट रीट्रीटमधील वास्तव्यावेळी इव्हा त्याची जनसंपर्क तज्ञ होती. तिने हि*टल*रचे असे काही फोटोग्राफ प्रसिद्ध केले, ज्यातून तो एक काळजी घेणारा नेता असल्याची प्रतिमा दृढ झाली. या काळात ती जगातील सर्वांत श्रीमंत स्त्रियांमध्ये गणली जायची.
२९ एप्रिल १९४५ रोजी हि*टल*र आणि इव्हा विवाहबंधनात अडकले. निवडक ना*झी निष्ठावंत व्यक्तींच्या साक्षीने एका भुयारी बंकरमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर हि*टल*र आपली शेवटही इच्छा आणि मृत्युपत्र लिहिण्यासाठी निघून गेला. यु*द्धात हि*टल*रचा पराभव स्पष्ट दिसत होता. कैदी बनून अपमानित होण्यापेक्षा त्याने आत्मह*त्या करण्याचा मार्ग स्वीकारला. इव्हाने याही वेळी त्याच्या योजनेला साथ देत त्याच्यासोबत मृत्यूचा पर्याय स्वीकारला.
३० एप्रिलच्या रात्री दोघांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर इव्हाने हि*टल*रचा आवडता पोशाख परिधान केला आणि दोघांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. त्याने स्वतःला गोळ्या झाडून घेण्याचे ठरवले. तर इव्हाने विषाची निवड केली.
हि*टल*र हाच जर्मनीचा तारणहार आहे, याबद्दल इव्हाला पक्की खात्री होती. पण, त्याने घेतलेल्या निर्णयांना किंवा निवडलेल्या मार्गाला तिने कधीच विरोध केला नाही. तिला खलनायिका म्हणावे की स्वतःच्या दोषांचा बळी म्हणावे हेच एक कोडे आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.