The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

जगण्यासाठी आवश्यक बनलेल्या वायफायचा शोध हॉलीवूडच्या या अभिनेत्रीने लावलाय

by द पोस्टमन टीम
3 January 2021
in मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time:1min read
0
Home मनोरंजन

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब

बुद्धी आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीत असणे जरा कठीणच. पण जेव्हा या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्य साधता येतो तेव्हा ती व्यक्ती कितीतरी पटीने अधिक आकर्षक वाटू लागते. आपल्या बुद्धी आणि सौंदर्याने २० व्या दशकात धुमाकुळ घातलेल्या अशाच एका महिलेबद्दल आज आपण जाणुन घेणार आहोत. चित्रपटात अभिनेत्री असलेल्या हेडी लामार हिच्याबद्दल आज आपण जाणुन घेणार आहोत.

स्त्रियांच्या हक्कांना एवढे महत्त्व नसलेल्या काळातही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवण्यात लामार कशी यशस्वी झाली हे बघणे रंजक आहे.

हेडी लामार हिचा जन्म व्हिएन्नामध्ये १९१४ साली झाला. तिचे जन्मनाव हेडविग किजलर असे होते. एकुलती एक असलेली हेडविग तिच्या वडिलांना खुप प्रिय होती. तिचे वडील स्वत: एक उत्साही अभ्यासक होते. संध्याकाळी फिरण्यासाठी जात असताना तिच्या वडिलांनी तिला अनेक छोट्या छोट्या यंत्रांची अंतर्गत माहिती दिली. या संवादांमुळे हेडविगला यंत्रांबद्दल आकर्षण निर्माण झाले. म्हणुनच की काय अगदी ५ वर्षाची असताना ती घरातील खराब यंत्रांना दुरुस्त करत असे. तिची आई एक पियानिस्ट होती. आईनेच तिला कला,नाटक, चित्रपट यांची ओळख करून दिली. आई-वडिलांचा हा वारसा तिने पुढे अगदी जोमाने चालवला.

१९३७ मध्ये ‘एमजीएम’ या प्रसिद्ध सिनेमा स्टुडिओशी करारबद्ध झाल्यावर तिला तिचे नवीन नाव मिळाले. १९३३ मध्ये ‘इकस्टसी’ नावाच्या चित्रपटात तिने एका तरुण पुरुषाच्या प्रेमात असलेल्या परंतु विवाहित असलेल्या स्त्रीचे पात्र साकारले होते. या चित्रपटात तिने पुर्णपणे नग्नावस्थेत असलेले काही सीन चित्रीत केले होते. तत्कालीन प्रेक्षकांना हे रुचले नाही आणि परिणामी तो सिनेमा अमेरिकेत प्रदर्शितच केला गेला नाही.

अवैधरीत्या तो चित्रपट अमेरिकेत बघितला गेला. पुढे अनेक हिट सिनेमे देऊनही लामारला सगळे ‘इकस्टसी गर्ल’ म्हणुनच ओळखतात.

या अभिनय कौशल्याबरोबरच लामारकडे अजुन एक कौशल्य होते आणि ते म्हणजे संशोधन वृत्ती. आपल्या मोकळ्या वेळेत ती स्वत:ला संशोधन कार्यात मग्न ठेवत असे. ‘बॉंम्बशेल’ या तिच्यावर आधारित जिवनपटात याबद्दल सांगताना ती म्हणते, “मला संशोधनासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत, मला ते आपोआप जमतं.”

लामारला संशोधनात मदत केली ती हॉवर्ड ह्युज याने. स्वत:ची विमान कंपनी असणाऱ्या हॉवर्ड ह्युजने लामारला एक छोटीसी यंत्रशाळाच खोलून दिली. त्याच दरम्यान अमेरिकन सैन्याला पुरवता येतील असे वेगवान विमाने बनवण्याचे आपले ध्येय त्याने लामारला बोलून दाखवले. लामारने मासे आणि पक्षांची पुस्तके वाचुन काढली. त्यांच्या वेगाने पोहण्याच्या आणि उडण्याच्या तंत्राचा अभ्यास केला. यावर अवलंबून असलेली एक यंत्रणा बनवून ती ह्युजला दाखवली. पुढे ह्युजने याच तंत्राचा वापर करुन वेगवान जहाजे बनवली.

हे देखील वाचा

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

विन्सेट वॅन गॉग – कॅनव्हासवर वेदना जिवंत करणारा कलाकार

ADVERTISEMENT

लामारचा सगळ्यात मोठा शोध होता- ‘गुप्त संवाद प्रणाली’. ‘फ्रीक्वेंसी हॉपिंग’ या प्रणालीचा वापर करुन तिने हा शोध लावला. याच तंत्राचा वापर करुन अमेरिकन नौदलाने दुसऱ्या महायुद्धात मोठे यश मिळवले. आता याच प्रणालीचा वापर करुन आधुनिक वाय-फायचा शोध लागला आहे.१९४२ मध्ये तिला तिच्या या शोधासाठी पेटंटही भेटले.

पुढे जाउन तिने आधुनिक स्पॉटलाईट, सोड्याचं रुपांतर कोका-कोलामध्ये करु शकेल अशी एक विरघळणारी गोळी यांचा शोध लावला.

अमेरिकन सैन्याने लामारच्या संकल्पनेचा वापर केला असला तरी तिला मात्र फक्त एक मनोरंजनाचे साधन म्हणूनच वापरले. सैन्याचे मनोरंजन करणे एवढे एकच काम तिला सोपवण्यात आले.

हॉलीवुडमध्ये मोठमोठे चित्रपट करत असताना वर्तमानपत्रात लामारच्या प्रेमजीवनाविषयी विविध लेख लिहिले जात होते. सहा लग्न आणि सहा घटस्फोट असं वादग्रस्त वैवाहिक जीवन वर्तमानपत्रात अजुन रंगून दाखवलं जात होतं. हे सगळं होत असताना तिच्या वैज्ञानिक संशोधनाबद्दल मात्र कुठेही तिचा उल्लेख केला जात नव्हता.

एलए टाईम्सने १९४१ साली तिच्या संशोधनाबद्दल बातमी पसरवली खरी परंतु १९४४ पर्यंत सगळेच या बातमीला विसरले होते. वय वाढत गेले तसे लामार फक्त एक विनोद बनत चालली होती. तिचे जीवनचरित्र लिहिणाऱ्या लेखकाने सुद्धा तिच्या कार्याची दखल घेतली नाही, एक विनोद म्हणूनच पुस्तकातून तिचे चित्र उभे केले. यासाठी तिने प्रकाशकांवर गुन्हा दाखल केला होता.

तिचे शोध प्रसिद्ध होण्यासाठी तिला १९९० च्या दशकापर्यंत वाट बघावी लागली. तिच्या मृत्यूनंतर तिने लिहिलेले काही लेख जेव्हा प्रसिद्ध झाले तेव्हा तिला अजुन प्रसिद्धी मिळाली. आता तिला विज्ञानात स्त्रियांच्या योगदानाचे प्रतीक समजले जाते. गुगलने तिच्या सन्मानार्थ डूडलसुद्धा प्रदर्शित केले होते.

लामारने केलेल्या प्रसिद्ध चित्रपटात तिने साकारलेल्या अनेक भूमिका या फक्त दिखाव्याची गोष्ट होत्या. सुंदर आणि आकर्षक बाहुलीसारखे तिला चित्रपटात फक्त पुरुषांना भुरळ घालण्यासाठी दाखवले जात असे. आपली वैज्ञानिक क्षमता जगाला दाखवणे त्यावेळी ‘एमजीएम’च्या व्यवसायास धक्का पोहोचवणारा ठरू शकला असता हे लामारलाही आपल्या उत्तरार्धात कळून चुकलं होतं.

बुद्धीचातुर्य असुनही हेडी लामार हिला योग्य असं स्थान मिळालं नाही. पुरुषप्रधान संस्कृतीत वावरणाऱ्या कित्येक स्त्रियांना असे अनुभव आजही येतात. एवढं सगळं असतानाही लामारने स्वत:तील वैज्ञानिकाला जपण्याचं अवघड असं काम आयुष्यभर सुरूच ठेवलं. आजच्या स्त्रियांसाठी म्हणुनच लामार एक प्रेरणास्थान आहे.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

इंदिरा गांधींवर नाराज होऊन राजकारण सोडलेला हा नेता बिनविरोध राष्ट्रपती बनला होता

Next Post

सत्याग्रहाची आयडिया गांधीजींच्या या नातेवाईकाच्या डोक्यातून निघाली होती

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!
मनोरंजन

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021
इतिहास

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

4 January 2021
मनोरंजन

विन्सेट वॅन गॉग – कॅनव्हासवर वेदना जिवंत करणारा कलाकार

30 December 2020
राजदूत म्हणजे ८०च्या दशकातील तरुणांचा जीव की प्राण!
भटकंती

राजदूत म्हणजे ८०च्या दशकातील तरुणांचा जीव की प्राण!

11 December 2020
फुकट आहे म्हणून हॉटेलातून खिशात भरून आणतो त्या टूथपिकला पण स्वतःचा इतिहास आहे..
इतिहास

फुकट आहे म्हणून हॉटेलातून खिशात भरून आणतो त्या टूथपिकला पण स्वतःचा इतिहास आहे..

10 December 2020
अजब कॅलेंडर! अजूनही या देशात २०१३ सालच चालू आहे!
भटकंती

अजब कॅलेंडर! अजूनही या देशात २०१३ सालच चालू आहे!

7 December 2020
Next Post

सत्याग्रहाची आयडिया गांधीजींच्या या नातेवाईकाच्या डोक्यातून निघाली होती

पाकिस्तानी सैन्याची पळताभुई करून सोडणारे मेजर आसा राम

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

21 April 2020
शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

20 June 2020
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

अफगाणी सैनिकांसाठी युद्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

16 January 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!