The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंगालच्या गावातील हाताने शटलकॉक्स बनवण्याची कला चीनमुळे धोक्यात आलीये..!

by द पोस्टमन टीम
24 January 2022
in क्रीडा
Reading Time: 1 min read
A A
0
बंगालच्या गावातील हाताने शटलकॉक्स बनवण्याची कला चीनमुळे धोक्यात आलीये..!

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


मानवी जीवनात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी खेळ, विशेषतः मैदानी खेळ, आवश्यक मानले जातात. आजच्या गजबजलेल्या शहरात मोकळी मैदाने आणि मैदानी खेळ हरवले असले तरी त्यांचे फायदे दुर्लक्षित करता येणार नाहीत. या खेळांमधून व्यायाम, सांघिक शिस्त यांसारखे बरेच गुण अंगीकारता येतात.

बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल, कबड्डी, खो-खो असे अनेक खेळ मैदानी खेळ प्रकारात मोडतात. त्यापैकी एक महत्त्वाचा आणि तेवढाच प्रसिद्ध खेळ म्हणजे बॅडमिंटन. बॅडमिंटन हा भारतातील लोकप्रिय खेळ असला तरीही त्याच्याशी संबंधित असलेले जादूरबेरिया हे गावाचे नाव फार कमी लोकांना माहिती असेल. हे गाव हावडा जिल्ह्यात असून ते बॅडमिंटनच्या शटलच्या निर्मितीचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथील लोकांचा हा पिढ्यानपिढ्या चालू असणारा व्यवसाय आहे.

राजधानी कोलकाता पासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर हुगळी नदीच्या काठी उलुबेरिया गावाच्या बाहेर हा व्यवसाय चालतो. सुमारे 5000 कारागिर या ठिकाणी काम करतात. शटल कॉकचे उत्पादन करण्यासाठी येथे 60 ते 70 लहान-मोठी युनिट्स आहेत, आणि रोज येथे 800 पेक्षा जास्त शटल कॉकचे उत्पादन होते. मात्र कामाच्या मानाने या कारागिरांना मिळणारा मेहनताना फारच कमी आहे. आजही ते ज्या प्रकारे दारिद्र्यात जगत आहेत त्यावरून हे दिसून येते.

वास्तविक आपल्याकडे हँडमेड वस्तूंना भरपूर मागणी असते. त्यांच्यासाठी ग्राहक वाट्टेल तेवढे पैसे मोजायला तयार असतात. पण हे कौतुक त्या बिचाऱ्या शटलकॉकच्या नशिबी नाही. ग्राहकांच्या नजरेत या शटलकॉकला फारशी किंमतही नाही. त्याचाच परिणाम त्याच्या निर्मात्यांच्या एकंदर राहणीमानावर झालेला आढळून येतो.

शटलकॉक तयार करणे हे बरेच किचकट, कष्टाचे आणि वेळखाऊ काम आहे. त्यासाठी बदक किंवा हंसाची सारख्या आकाराची आणि समान लांबीची सोळा पिसे वापरली जातात. ही पिसे एकमेकांना ओव्हरलॅप करतील अशाप्रकारे त्यांची रचना केली जाते. त्याआधी ही पिसे साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुतली जातात आणि कडक उन्हात अनेक तास वाळवली जातात. नंतर त्यांची लांबी नऊ सेंटीमीटर होईल आणि आकार वर्तुळाकार होईल अशा बेताने ती कापली जातात.

त्यासाठी खास विशिष्ट आकाराच्या कात्र्या वापरल्या जातात. प्रत्येक पीस तंतोतंत त्याच आकाराचे असावे लागते. त्याच्या आकारात थोडासा फरक पडला तरी ते वापरले जात नाही. नंतर ही पिसे चिकटवून एका धाग्याच्या मदतीने एकत्र बांधली जातात आणि एका अर्धगोलाकार बुचावर बसवली जातात. यंत्राच्या साह्याने प्रत्येक बुचाला सोळा छिद्रे पाडली जातात आणि हाताने ही पिसे त्या छिद्रांमध्ये बसवतात. त्यानंतर ब्रँडचे नाव असलेले स्टिकर कॉकवर चिकटवले जाते. अशाप्रकारे तयार केलेली दहा शटलकॉक्स एका वर्तुळाकार डब्यात ठेवली जातात. त्याला रोल किंवा बॅरल असे म्हणतात.

हे तयार करणाऱ्या कारागिरांच्या म्हणण्यानुसार शटलकॉक तयार करताना इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ ते हवेमध्ये कसेही फिरले तरी त्याची दिशा त्याच्या तळाशी असलेल्या कॉर्कनुसार ठरते. हे कॉर्क कॉर्कच्या सालीपासून तयार करतात आणि त्याचे वजन साधारण चार ते पाच ग्रॅम असते. शटलकॉकला रॅकेटच्या साह्याने टॉस केले जाते. त्यामुळे हे तडाखे सहन करण्यासाठी त्याला नैसर्गिकरीत्याच मजबूत बनवले जाते.

हे देखील वाचा

पाकिस्तानमध्ये त्यांच्याच विरोधात वीरू पाजीनं भारताचं कसोटीतील पहिलं त्रिशतक ठोकलं होतं!

टेस्ट क्रिकेटची बादशहा असलेली न्यूझीलंडची टीम २६ धावांवर ऑल आऊट झाली होती

ICC नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम आजही इंग्लंडचा हा क्लब बनवतो..!

एवढ्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून बॅरलमध्ये भरलेली शटलकॉक्स त्यानंतर जादूरबेरियापासून महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू अशा विविध राज्यांमध्ये पाठवली जातात. उलुबेरियामधील उत्पादक यासाठी लागणारी पिसे बांगलादेशमधून आयात करतात, आणि कॉर्क मुख्यतः स्पेन आणि पोर्तुगाल येथून पंजाबमधील व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आणले जाते. 

जादूरबेरिया येथे सध्या १५ कंपन्या काम करत आहेत. त्यापैकी पंडित आणि नियोगी यांच्या कंपन्या अग्रणी मानल्या जातात. या गावाचा शटलकॉकशी असलेला संबंध बराच जुना आहे. १९२० मध्ये गणेंद्रनाथ बोस नावाच्या माणसाने गावकऱ्यांना ते बनवण्याची कला शिकवली. ते स्वतः ही कला काही व्यापाऱ्यांकडून शिकले होते. 

हे व्यापारी त्या काळी कलकत्त्यातील काही प्रतिष्ठित क्लबना शटलकॉक्सचा पुरवठा करत. मोठमोठे ब्रिटिश अधिकारी या क्लबमध्ये बॅडमिंटन खेळण्यासाठी येत असत. गणेंद्रनाथ बोस यांच्या हाताखाली काही गावकरी या कलेत प्रवीण झाले. त्यांच्यापैकी एक म्हणजे धनंजय पंडित. या निरक्षर माणसाने स्वतः प्रयोग करून शटलकॉक्स बनवण्याच्या तंत्रात सुधारणा केल्या आणि या व्यवसायात बरीच प्रगती केली. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांची मुलगी हिरा पंडित हिने तो पुढे नेला आहे. शटलकॉक तयार करणे हा आज येथील अनेक कुटुंबांचा घरगुती व्यवसायही बनला आहे. हे लोक थेट ग्राहकांना आपला माल विकतात.

गेल्या दशकभरात मात्र या व्यवसायाची समीकरणे बरीच बदलली आहेत. हे गावकरी आपल्या अस्तित्वासाठीची लढाई लढत आहेत. याचे कारण बाजारात आलेली मशीन मेड उत्पादने. जास्त करून चायनीज आणि तैवानीज कंपन्यांचे यामध्ये प्राबल्य असून त्यांनी डोमेस्टिक मार्केटचा बराच मोठा हिस्सा काबीज केला आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने हाताने शटलकॉक तयार करणाऱ्या उत्पादकांवर बेरोजगारीचे संकट ओढवू पाहत आहे. त्यामुळे त्यांची पुढची पिढी हे काम करण्यास फारशी उत्सुक नाही. त्यातून एका कलेचा आणि एका परंपरेचा अस्त होऊ पहात आहे.

हा व्यवसाय उतरणीला लागण्यामागे अजून एक घटक कारणीभूत आहे. तो म्हणजे या व्यवसायाकडे गांभीर्याने न बघणारे आणि झटपट श्रीमंत होण्याच्या अपेक्षेने कमी दर्जाचा माल तयार करणारे उत्पादक. याचाच परिणाम म्हणून आज पिढ्यानपिढ्या या व्यवसायात असलेले लोकही आपली विश्वासार्हता गमावण्याच्या भीतीने त्रस्त झाले आहेत.

या व्यवसायात मशीनचा प्रवेश झाल्यापासून हाताने काम करणाऱ्या कारागिरांकडून असलेल्या अपेक्षाही वाढल्या आहेत. परंतु कितीही झाले तरी या कारागिरांचा वेग यंत्राच्या वेगाशी जुळणारा नाही. त्यातून अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत.

आता त्यांच्यासाठी एकच आशेचा किरण आहे : सरकारी मदत. एक लोप पावण्याच्या मार्गावर असलेली कला टिकवायची असेल तर त्याला मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे मदत मिळावी अशी अपेक्षा हे कारागीर व्यक्त करत आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

खचाखच भरलेल्या मैदानावर एक मोठं विमान येऊन थांबलं आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला

Next Post

एका हॉलिवूड चित्रपटातल्या पात्रावरून एक धर्म अस्तित्वात आलाय त्याचं नाव ड्युडेइझम

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

पाकिस्तानमध्ये त्यांच्याच विरोधात वीरू पाजीनं भारताचं कसोटीतील पहिलं त्रिशतक ठोकलं होतं!
क्रीडा

पाकिस्तानमध्ये त्यांच्याच विरोधात वीरू पाजीनं भारताचं कसोटीतील पहिलं त्रिशतक ठोकलं होतं!

16 April 2022
टेस्ट क्रिकेटची बादशहा असलेली न्यूझीलंडची टीम २६ धावांवर ऑल आऊट झाली होती
क्रीडा

टेस्ट क्रिकेटची बादशहा असलेली न्यूझीलंडची टीम २६ धावांवर ऑल आऊट झाली होती

15 April 2022
ICC नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम आजही इंग्लंडचा हा क्लब बनवतो..!
क्रीडा

ICC नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम आजही इंग्लंडचा हा क्लब बनवतो..!

15 April 2022
रस्त्यावर भाजी विकणारा १८ वर्षांचा तिरंदाज भारतासाठी विश्वचषकाचं ‘लक्ष्य’ गाठणार आहे!
क्रीडा

रस्त्यावर भाजी विकणारा १८ वर्षांचा तिरंदाज भारतासाठी विश्वचषकाचं ‘लक्ष्य’ गाठणार आहे!

14 April 2022
तब्बल १६ तास ६७३ चेंडूंचा सामना करत या पठ्ठ्यानं ब्रायन लाराचा विक्रम मोडून काढलाय!
क्रीडा

तब्बल १६ तास ६७३ चेंडूंचा सामना करत या पठ्ठ्यानं ब्रायन लाराचा विक्रम मोडून काढलाय!

13 April 2022
आपल्या मित्राच्या अस्थि विसर्जित करायला स्टीव्ह वॉ चक्क वाराणसीत आला होता!
क्रीडा

आपल्या मित्राच्या अस्थि विसर्जित करायला स्टीव्ह वॉ चक्क वाराणसीत आला होता!

13 April 2022
Next Post
एका हॉलिवूड चित्रपटातल्या पात्रावरून एक धर्म अस्तित्वात आलाय त्याचं नाव ड्युडेइझम

एका हॉलिवूड चित्रपटातल्या पात्रावरून एक धर्म अस्तित्वात आलाय त्याचं नाव ड्युडेइझम

ही आहेत दुसऱ्या महायुद्धातील फारशी प्रसिद्ध नसलेली स्पेशल ऑपरेशन्स..!

ही आहेत दुसऱ्या महायुद्धातील फारशी प्रसिद्ध नसलेली स्पेशल ऑपरेशन्स..!

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!