The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

गुडइयरचा हिशोब चुकला, नाहीतर आपल्या गाड्यांना अंधारात चमकणारे टायर्स दिसले असते

by द पोस्टमन टीम
16 July 2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


गावी आजी-आजोबांच्या शेतीपासून जवळच असलेल्या माळरानावर ॲलेक्स नावाच्या व्यक्तीचं फार्म हाऊस आहे. मूळचा अमेरिकन असलेला ॲलेक्स स्वातंत्र्यापूर्वी भारतात आला होता. त्याचे वडील ब्रिटिशांचे डॉक्टर होते. भारताला स्वातंत्र्य मिळालं, ब्रिटिश त्यांच्या देशात परत गेले मात्र, ॲलेक्स आणि त्याचं कुटुंब इथेचं रमलं. आजीच्या गावात त्यांनी शेती सुरू केली. दर शनिवारी-रविवारी जेव्हा आम्ही आजीच्या मळ्यात जायचो तेव्हा अ‌ॅलेक्सकडं हमखास एक चक्कर टाकत असू त्याला कारणही तसंच होतं. त्याच्याकडे असलेली शेवरोले बेल एअर कर्न्वटेबल गाडी! हो, त्याच्याकडे त्याच्या वडिलांची एक क्लासिक कार आहे. तिचा कलर आणि मॉडेल मला जाम आवडायचं.

क्लासिक कार्समध्ये अशा अनेक खास गोष्टी असतात, ज्या आपल्याला कंटेम्पररी मॉडेल्समध्ये दिसत नाहीत. चमकणाऱ्या चाकांच्या गाड्यांचा अशाच क्लासिक्स गाड्यांमध्ये समावेश होतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल चमकणाऱ्या चाकांच्या गाड्या म्हणजे काय?

१९६१ मध्ये गुडइयर कंपनीनं चमकणाऱ्या चाकांची निर्मिती केली होती. मात्र, काही अडचणींमुळे त्यांना हा प्रयोग पुढे सुरू ठेवता आला नाही. कशी होती ही चमकणारी चाके आणि त्यांची निर्मिती कशी झाली हे जाणून घेण्याअगोदर आपण ‘गुडइयर कंपनी’बाबत जाणून घेऊया.

‘गुडइयर टायर अँड रबर कंपनी’ ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय टायर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. १८९८मध्ये फ्रँक सेबर्लिंग यांनी तिची स्थापना केली होती. व्हल्कनाइज्ड रबरचा शोध लावणाऱ्या चार्ल्स गुडइयर यांच्या नावावरून कंपनीला नाव दिलं गेलंय. 

ओहायो प्रांतातील अक्रॉन येथे तिचं मुख्यालय आहे. गुडइयर ऑटोमोबाईल्स कंपनी कमर्शियल ट्रक, हलक्या ट्रक, मोटारसायकली, एसयूव्ही, रेस कार, विमान, शेतीची उपकरणे आणि इतर अवजड यंत्रसामग्रींसाठी टायर निर्मिती करते. काही दिवस त्यांनी सायकलच्या टायर्सची देखील निर्मिती केली. ब्रिजस्टोन (जपान), मिशिलिन (फ्रान्स) आणि कॉन्टिनेन्टल (जर्मनी) यांच्यासह गुडइयर ही पहिल्या चार टायर उत्पादकांमध्ये येते.

गुडइयर ही फॉर्म्युला वनच्या इतिहासातील सर्वात जास्त टायर पुरवणारी करणारी कंपनी आहे.

१९५० आणि ६० च्या दशकात अनेक पाश्चात्य गोष्टींचं जगभरातील लोकांना आकर्षण होतं. फास्ट फूड, रॉक म्युजिक आणि यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाड्या! अमेरिकन लोकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विस्तार म्हणून ऑटोमोबाईलमध्ये रस घेतला. त्यांनी अधिक आकर्षक व आधुनिक गाड्या तयार करण्यास सुरुवात केली. म्हणून जेव्हा ओहायोस्थित ‘गुडइयर टायर अँड रबर कंपनी’नं टायर निर्मितीमध्ये प्रयोग करण्यास सुरुवात केली तेव्हा सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली.

हे देखील वाचा

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

या बयेनी नवऱ्याला तुरुंगातून पळवण्यासाठी चक्क पायलटचं लायसन्स मिळवलं होतं

‘त्या’ दिवशी उडती तबकडी बघून लंडनवासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता, पण…

गुडइयरचे केमिस्ट विल्यम लार्सन यांनी कर्मचारी अँथोनी फिनेली यांच्याबरोबर मिळून ‘नियोथेन’ नावाचं पॉलीयुरेथेन कंपाऊंड तयार केलं. ज्यामुळे गुडिइरला ट्यूबलेस आणि कॉर्डलेस टायर तयार करणं शक्य होणार होतं. त्या टायर्समध्ये भरपूर प्रमाणात रंगद्रव्ये दिसत होती.

ADVERTISEMENT

गुडइयरचे हे अर्धपारदर्शक टायर कोणत्याही रंगात तयार करणे शक्य होते. या टायर्समधून प्रकाश आरपार जाऊ शकत होता आणि हिच गोष्ट त्यांना वैशिष्ट्यपूर्ण बनवत होती. इंजिनिअर्सनी चाकाच्या मध्यभागी १८ बल्बसही बसवले. त्या बल्बचा प्रकाश अर्धपारदर्शक टायर्समधून बाहेर येत असे.

या टायर्सची निर्मिती केल्यानंतर गुडइयरनं लोकांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला. ‘डॉज पोलारा’ या गाडीला लाल रंगाचे टायर्स लावून त्यांनी ती गाडी संपूर्ण मायामी शहरात फिरवली. मॅनहॅटनमध्ये देखील चमकणाऱ्या चाक लावलेली क्रिस्लर सिल्व्हर ३०० ही गाडी फिरवण्यात आली. चमकाणाऱ्या चाकांच्या रॉकफेलरनं जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमध्ये नागरिकांना गोंधळात टाकलं. कारण ६० च्या दशकात चमकणाऱ्या चाकांच्या गाड्या ही नक्कीच आश्चर्याची गोष्ट होती.

पण, गुडइयरचे हे टायर अधिकृतपणे कधीच विक्रीसाठी उपलब्ध झाले नाहीत. त्याऐवजी त्यांनी ते स्थानिक कस्टम कार बिल्डर जिम स्कान्झाक्सला दिले. जिमनं त्या टायर्सचा वापर करून ७५ हजार डॉलर्स किंमतीच्या ‘गोल्डन सहारा II’ या कारची निर्मिती केली. लोकांना ही कार खूप आवडली. चमकदार टायर्स त्याकाळातील चमकदार स्टाईलसाठी अतिशय परफेक्ट वाटत होते. शिवाय गाडीला स्वयंचलित ब्रेक होते! त्यामुळे सहारा अगदी एखाद्या चित्रपटातील गाडीप्रमाणं दिसे.

१९६०मध्ये आलेल्या ‘सिंडरफेला’ या विनोदी चित्रपटामध्ये चमकणाऱ्या पांढऱ्या चाकांसह गोल्डन सहारा II दिसली होती. काळाच्या ओघात कारचा रंग फिकट झाला. जेव्हा ऑटोमोटिव्ह संग्रहालय, क्लेरमोंट कोलेक्शनच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांनी दुर्मिळ कार मेकम येथे लिलावासाठी ठेवली. तिला ३ लाख ५० हजार डॉलर्स इतकी किंमत मिळाली. त्यानंतर ही कार ‘स्पाइकेसी कस्टम’मध्ये रिस्टोर करण्यासाठी पाठवण्यात आली. रिस्टोरेशनसाठी नवीन टायर्सची देखील आवश्यकता होती. गुडइयरने नवीन चार टायर्स देण्याची तयारी दर्शवली आणि त्यानंतर २०१९च्या ‘जिनिव्हा इंटरनॅशनल मोटर शो’मध्ये ही गाडी पुन्हा दिसली.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या टायर्सचे काय झाले? जर ते इतके आकर्षक आणि चांगले होते तर वाहनांवर का दिसले नाहीत? याची अनेक कारणं आहेत. 

खर्च हा सर्वात मोठा अडथळा होता. शिवाय व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर ते जास्त उपयुक्त नव्हते. काही मैलांचा प्रवास केल्यानंतर रस्त्याची धूळ टायरवर बसून त्यातून येणारा प्रकाश लुप्त होत असे. याशिवाय सुरक्षेचाही प्रश्न होता. टायरमध्ये वापरल्या जाणाऱ्या कंपाऊंडमध्ये पावसाळी हवामानात पुरेशी पकड नसायची, त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण नक्कीच वाढले असते. त्यामुळे दहावर्ष काम करूनही गुडइयरला हा प्रयोग मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात उतरवता आला नाही.

बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार ऑटोमोबाईल क्षेत्रानं प्रचंड प्रगती केली आहे. मात्र, अर्ध्या शतकापूर्वी गुडइअरनं केलेल्या टायरनिर्मितीच्या धाडसाची अद्याप तरी कुणी बरोबरी केलेली नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweetShare
Previous Post

‘रेड बुल’ पिऊनही पंख फुटले नाहीत म्हणून एका कार्यकर्त्याने कंपनीला कोर्टात खेचलं होतं

Next Post

हॉंगकाँगमधील या ‘कॉफिन होम्स’मध्ये माणसं अगदी किड्यामुंगीसारखं जगतायत

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

मनोरंजन

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

4 June 2022
मनोरंजन

या बयेनी नवऱ्याला तुरुंगातून पळवण्यासाठी चक्क पायलटचं लायसन्स मिळवलं होतं

22 April 2022
मनोरंजन

‘त्या’ दिवशी उडती तबकडी बघून लंडनवासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता, पण…

20 April 2022
मनोरंजन

‘हॅप्पी बर्थडे’ गाण्याची मालकी सांगून वॉर्नर म्युझिकने रग्गड पैसे छापले होते, पण…

14 April 2022
मनोरंजन

बॅटमॅन तयार केला एकाने आणि श्रेय लाटलं भलत्यानेच!

8 April 2022
मनोरंजन

ही हरवलेली महिला स्वतःलाच शोधण्यासाठी पथकाबरोबर रात्रभर फिरली

8 April 2022
Next Post

हॉंगकाँगमधील या 'कॉफिन होम्स'मध्ये माणसं अगदी किड्यामुंगीसारखं जगतायत

'टोयोटा वॉर' या युद्धात सैन्याने चक्क टोयोटा लँड क्रूझर आणि पीकप वापरले होते

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!