पाश्चात्यांवर गांधीजींच्या विचारांइतकाच प्रभाव त्यांच्या चष्म्यानेही पाडला आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


स्वच्छ भारत अभियानाचे बोधचिन्ह असलेला गांधीजींचा चष्मा हा आपल्याला अनेक प्रकारे गांधीजींच्या संपूर्ण चरित्राचा एक परिचयात्मक आरसा भासत असतो. गांधीजी त्यांनी समाजाला दिलेली मूल्ये, दृष्टी, विचार या सर्वांचे प्रतीक त्या चष्म्यात दडले आहे. या गांधीजींच्या चष्म्याकडे बघण्याची आपली एक दृष्टी आहे.

पण त्या दृष्टपल्याड गांधीजींच्या या चष्म्याच्या मागे एक रंजक कथा देखील आहे, जी गांधींच्या परोपकारी भावनेशी निगडित आहे. त्याच कथेवर प्रकाश टाकण्यासाठी हा लेखन प्रपंच!

“या चष्म्याने मला स्वतंत्र भारताकडे बघण्याची दृष्टी प्रदान केली” असं गांधीजी नेहमी आपल्या आयकॉनिक चष्म्याबद्दल बोलत असत. १९३० साली त्यांनी हा चष्मा कर्नल एच एस श्रीदिवाण यांना देऊ केला होता. कर्नलने महात्मा गांधींकडे एका अशा गोष्टीची मागणी केली होती जी त्यांना सतत प्रेरणा देते त्यावेळी त्यांच्याकडे गांधींनी आपला चष्मा दिला होता.

गांधींचा हा चष्मा कसा तयार झाला? हा चष्मा एक स्टाईल म्हणून जगभरातील लोकांनी कधीपासून घालायला सुरुवात केली? हे जाणून घेऊयात..

कधी घेतला चष्मा?

गोलाकार लेन्स असलेला भिंगाचा चष्मा गांधीजींनी सर्वप्रथम लंडनमध्ये वकिलीचे शिक्षण घेताना विकत घेतला होता. डेली मेलच्या रिपोर्टनुसार हा चष्मा फार चांगल्या किंमतीत विक्रीस गेला होता. मोठा लिलाव झाला होता.

या चष्म्याच्या कव्हरचा फोटोदेखील डेली मेलने छापला होता. ज्यात ग्लोसेटर नामक एका चष्मे विक्रेत्याची छाप दिसून येते.

गांधीजींनी गोल भिंगाचा चष्मा घालायला का सुरुवात केली, याचा ऐतिहासिक संदर्भ नसला तरी सभ्यता आणि साधेपणाचे लक्षण तो चष्मा बनला होता.

लंडनमध्ये घेतलेला तो चष्मा अखेरच्या काळापर्यंत गांधींसोबत नव्हता. त्यांनी कर्नल नवाबाला आपला चष्मा दिल्यावर त्यांनी त्यांच्यासारखाच एक हुबेहूब चष्मा बनवून घेतला होता.

खरंतर गांधीजी त्या काळात स्वदेशी आंदोलनाचे नेतृत्व करत होते त्यामुळे त्यांनी आपल्या जुन्या चष्म्याप्रमाणे अगदी सारखाच नवा चष्मा बनवला होता. त्याची डिझाइन सारखीच होती. अनेकांच्या मते हा तोच चष्मा होता, जो गांधी आधीपासूनच वापरत होते. 

परंतु गांधीजींच्या सहकारी राजकुमारी अमृत कौर यांनी लिहिलेल्या एका पत्रात गांधीजी नवा चष्मा घालत असून त्यापासून त्यांना काही त्रास नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे गांधीजींनी नवीन चष्मा घेतला होता हे सिद्ध झाले होते.

दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्याचा काळात आणि भारतात परतल्यावर पुढील अनेक वर्षे महात्मा गांधी नियमितपणे चष्म्याचा वापर करत नव्हते. १९२० सालातील त्यांचे जे चित्र उपलब्ध आहे. त्यात मात्र त्यांनी चष्मा घातलेला आढळून येतो आहे. त्यांचे आंदोलन, विचार यांच्या लोकप्रियतेचे प्रतीक हा चष्मा बनला होता.

इतकेच नाहीतर त्यांच्या बौद्धिक चिंतनाचे आणि सहिष्णुतेचे बोधचिन्ह हा चष्मा बनला होता. अनेक ठिकाणी महात्मा गांधींचे प्रतीक म्हणून या चष्म्याचा वापर केला जातो

गांधीजींच्या चष्म्याचा ट्रेंड

चष्म्या विक्री करणाऱ्या एका पोर्टलवर गांधी स्टाईल गोल भिंगाचे चष्मे विकत घेण्याचा ट्रेंड जगभरात असल्याचे म्हटले गेले आहे. लोक या गोल भिंग्याचा आणि बारीक दांडीच्या चष्म्याच्या खरेदीसाठी फार उत्सुक असते असं मत या पोर्टलच्या मालकाने व्यक्त केले आहे. हॅरी पॉटर आणि वेलमा या काल्पनिक पात्रांनी देखील गांधींचा चष्म्याला मिळवून दिली.

गांधी चष्म्याचा वापर करणारे सेलिब्रिटी

बीटल्स या समूहाचे एक गायक जॉन लेनन, हे महात्मा गांधींचे एक चाहते होते. त्यांनी सत्याग्रह व अहिंसावादी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. लेनन यांनी बरीच वर्षे हा गांधी चष्मा वापरला इतकेच नाहीतर हा चष्मा प्रसिद्ध देखील केला.

प्रसिध्द उद्योगपती आणि तंत्रज्ञ स्टीव्ह जॉब्स यांनी देखील गांधी चष्मा वापरला होता. त्यांनी गांधींना आपला हिरो आणि आदर्श मानून त्यांच्या सिध्दांतांवर अतूट श्रद्धा ठेवली होती.

गांधींच्या चष्म्यावर आधारलेला अनोखा प्रयोग

गांधींच्या चष्म्याची क्रेझ आजच नाहीतर भविष्यात देखील असणार आहे. गांधींच्या चष्म्यावर आधारलेल्या एका देवनागरी स्क्रिप्टची रचना बेनेट कंपनीकडून करण्यात आली असून लवकरच ती वापरासाठी उपलब्ध होणार आहे.

गांधीजींचा चष्मा हा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा एक उत्तम दर्शकच नाहीतर एक हाडामाणसाचा संत पुरुष या पृथ्वीवर वावरला होता याची एक आठवण आहे. डोळ्याला डोळा फोडण्याचा न्याय वापरला तर सारे जग आंधळे होईल या गांधी तत्वज्ञानाचा प्रसार या गांधींच्या चष्म्याने केला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!