The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

पहिला ‘आयफोन’ ॲपलने नाही तर सिस्कोने बनवला होता!

by द पोस्टमन टीम
23 March 2022
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


स्मार्टफोनचा बाप म्हणून ‘ॲपल’चा आयफोन ओळखला जातो. ॲपलने आयपॉड आणि आयमॅक ही उपकरणं विकसित केली आणि बाजारपेठेत आणली. त्यामुळे या नावांशी साधर्म्य असलेला आयफोनही बाजारपेठेत सर्वात प्रथम ॲपलनेच आणला असं छातीठोकपणे सांगितलं जातं. ते स्वाभाविकही आहे. मात्र, हे पूर्णतः खरं नाही.

ॲपलचा आयफोन सन २००७मध्ये बाजारपेठेत आला. मात्र, सर्वात पहिला आयफोन त्या पूर्वी १९९८मध्येच बाजारपेठेत आला होता.

कॅलिफोर्नियाच्या इन्फो गिअर नावाच्या कंपनीने पहिला आयफोन जगाच्या बाजारपेठेत उतरवला. अर्थातच, पहिला आयफोन हा स्मार्टफोन नव्हता. मात्र, इंटरनेटचा वापर करता येईल असा तो लँडलाईन फोन होता. विशेष म्हणजे त्याला कृष्ण धवल का होईना, ६४० बाय ४८० पिक्सलचा टच स्क्रीनही होता.

या फोनमध्ये वेबसाईट्स आणि मेल्स वापरण्याची सुविधाही उपलब्ध होती. २ एमबी रॅम क्षमतेच्या या फोनमध्ये २०० इ मेल ऍड्रेसेस साठविण्याची सुविधा होती. या सुविधासुद्धा त्यावेळी उपलब्ध असलेल्या फोन्सपेक्षा खूपच पुढच्या होत्या. हा फोन त्या काळात साधारणपणे ५०० डॉलरमध्ये विकला जायचा. इंटरनेटसाठी स्वतंत्र ९.९५ ते १९.९५ डॉलरची आकारणी केली जायची.

या आयफोनची सुधारित आवृत्ती इन्फो गिअरने सन १९९९ मध्ये बाजारपेठेत आणली. मात्र, पुढच्याच वर्षी कंपनी सध्या जगात नेटवर्कींग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सिस्को सिस्टीम्सने विकत घेतली. त्यामुळे आयफोन या ब्रँड नेमची आणि ट्रेडमार्कची मालकीही सिस्कोकडे आली. सिस्कोने त्यांच्या कॉर्डलेस फोनसाठी लिंकसिस आयफोन हे नाव वापरायला सुरुवात केली.

स्टीव्ह जॉब्सने सन २००७ च्या सुरुवातीला मॅकवर्ल्ड अधिवेशनात ऍपलच्या पहिला आयफोन बाजारात आणण्याची घोषणा केली.

सिस्कोने त्वरीत क्यूपर्टिनो कंपनीवर ट्रेडमार्कचा गैरवापर केल्याचा दावा दाखल केला. मात्र, ॲपलचा आय फोन बाजारात येण्यापूर्वी हा वाद मिटवण्यात आला. सिस्को आणि ॲपलने नेमका काय रकमेचा करार करून या ब्रँडनेमची देवघेव केली याचा तपशील उघड झाला नसला तरीही सिस्कोने आयफोन हे ब्रँडनेम अधिकार बहाल केला.

आज जगभरात वेगवेगळ्या कंपन्यांचे ‘स्मार्टफोन्स’ मोठ्या प्रमाणावर आणि अनेक आकारांमध्ये, अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध असले तरी मोबाईल फोन्सच्या जगात त्यांना ‘स्मार्ट’ बनवण्याचं श्रेय निर्विवादपणे ‘आयफोन’कडेच जातं.

हे देखील वाचा

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

त्याच्या संशोधनाने कोट्यवधी लोकांना अन्न दिले आणि लाखोंना वेदनादायक मृत्यूही!

ADVERTISEMENT

स्टीव्ह जॉब्ज यांच्या ‘ॲपल’ या कंपनीने हा फोन विकसित केला असला तरीही याच्या निर्मितीची कहाणी मोठी रंजक आहे. ॲपलसारख्या मोठ्या कंपनीला आणि जॉब्ज यांच्यासारख्या उद्योगपतीलाही भविष्याचा वेध घेण्यासाठी किती सजग रहावं लागतं आणि यशाची शिखरं गाठण्यासाठी किती जीव तोडून कष्ट करावे लागतात; हेच आयफोनच्या जन्मकथेवरुन दिसून येतं.

स्मार्टफोन ही संकल्पना आपण आता सर्रास वापरतो. मात्र, स्मार्टफोनच्या उगमापर्यंत जाण्यासाठी स्मार्ट फोन म्हणजे नेमकं काय, हे जाणून घेणं आवश्यकच आहे. स्मार्टफोनचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ‘टच स्क्रीन!’

टच स्क्रीनचे मोबाईल मोठ्या प्रमाणात बॅटरी खूपच वेगाने संपवतात, हे आता आपल्या सर्वांना माहित झालं आहे. त्यामुळे स्मार्ट फोन विकसित करताना त्याच्याला वापरण्या योग्य बनवण्यासाठी दीर्घ काळ टिकणारी ‘लिथियम बॅटरी’ ही देखील गरजेची! या शिवाय इंटरनेट जोडणी आणि ते वापरण्याचे माध्यम म्हणून जगभरात पसरलेले जाळे अर्थात, ‘वर्ल्ड वाईड वेब’ या सगळ्याचा शोध लावणाऱ्यांना स्मार्ट फोन तयार होण्याचे आपापले श्रेय देणं हे ओघानंच येतं.

साधारणपणे सन २००५ च्या काळामध्ये ‘आयपॉड’ हे टेकसॅव्ही लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारं साधन होतं. आयपॉडने या प्रकारच्या उपकरणांची अख्खी बाजारपेठ काबीज करून ‘ॲपल’ने स्वतःची मक्तेदारी निर्माण केली होती. आयपॉडच्या विक्रीचे आकडे दिवसेंदिवस गगनाकडे झेपावत होत्या. कंपनीच्या महसुलामध्ये खोऱ्याने भर पडत होती. मात्र, हे सगळं असूनही एक माणूस अत्यंत अस्वस्थ होता. ते म्हणजे ‘ॲपल’चे द्रष्टे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज!

मुठीत मावणारे मोबाईल फोन कालांतराने ‘स्मार्ट’ होणार आणि आयपॉडची मक्तेदारी मोडीत काढणार हे जॉब्ज यांच्यातल्या द्रष्ट्या तंत्रव्यवसायिकाने ओळखलं होतं. मोबाईल तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत होतं, नव्या पिढीच्या स्मार्ट फोन्समध्ये नुसत्या फोन करण्या आणि ऐकण्याबरोबरच आणखी अनेक करमणुकीची साधनं असणार. त्यात संगीत ऐकता येणार. चित्रपट बघता येणार. कॅमेऱ्यामध्ये फोटो आणि व्हिडीओ घेता येणार. पुस्तकही वाचता येणार.

इंटरनेटच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचण्याची खिडकी खुली होणार. अर्थातच या स्मार्ट फोन्ससाठी जगभर अफाट बाजारपेठ खुली होणार; हे सगळं जॉब्ज यांना दिसत होतं. मग बाकीचे स्पर्धक उभे राहण्यापूर्वीच आपणच आयपॉडला स्मार्टफोनचा सोपा पर्याय का उभा करू नये; या विचाराने त्यांना पछाडलं.

स्मार्टफोन बनवण्यासाठी ॲपल जंग जंग पछाडत असताना सॅमसंग आणि ब्लॅक बेरी यांचेही प्रयत्न सुरूच होते. त्याच वेळी अनेक छोटे छोटे संशोधकांचे गटही स्मार्ट फोन विकसित करण्याच्या प्रयत्नात होते. अनेकांनी त्याचे प्रारूप तयारही करून ठेवले होते. त्यापैकी काहींचं डिझाईन आणि काहींचं तंत्रज्ञान जॉब्ज यांना अवडलंही होतं. मात्र, त्या बाबत जॉब्ज यांची मतं आणि त्यांच्या इंजिनिअर्स टीमची मतं जुळली नाहीत.

मोटारोलाच्या साथीने ROKR E1 हा स्मार्टफोन तयार करण्याची तयारीही जॉब्ज यांनी केली. मात्र, प्रत्यक्षात त्यांना हा मोबाईल पसंत पडला नाही. मात्र, ॲपल आणि जॉब्ज यांनी हार मानली नाही. जॉब्ज यांनी जॉब्सने ९ जानेवारी २००७ रोजी ‘मॅकवर्ल्ड कॉन्फरन्स’च्या मंचावर आयफोनची घोषणा केली. वास्तविक, असं म्हटलं जातं की, ज्या पहिल्या वहिल्या आयफोन मोबाईल हँडसेटची माहिती सांगण्यात जॉब्ज यांनी या कार्यक्रमात तब्बल एक तास घालवला, त्यामध्ये काहीच दम नव्हता. तो धड चालतही नव्हता. त्यामुळेच घोषणा झाल्यानंतर तब्बल सहा महिने हा मोबाईल बाजारात आलाच नाही.

त्यानंतर मात्र, जॉब्ज आणि त्यांच्या टीमने आयफोन साकारण्यासाठी अक्षरश: जीवापाड ,मेहानत घेतली. जगभरातल्या त्यांच्या उत्पादन भागीदारांना दिवसरात्र कामाला लावलं. छोटे छोटे सुटे भाग बनवणाऱ्यांना कामाला लावलं. अंतिम उत्पादनाचं परीक्षण मात्र ॲपलच्या मुख्यालयात करण्यात येत होतं.

जॉब्ज यांनी लॉन्चिंगच्या घोषणेच्यावेळी ग्राहकांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या होत्या आणि त्या अपेक्षांचा भंग त्यांना होऊ द्यायचा नव्हता. ॲपलच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. अखेर २९ जून २००७ मध्ये पहिला आयफोन काही देशांच्या बाजारात आला. या मोबाईलच्या आधीही काही मोटोरोलासह काही स्मार्टफोन बाजारपेठेत होते. मात्र, मोठा स्क्रीन, संगीत ऐकण्याची सुविधा आणि इंटरनेट वापरण्याची २ जी सुविधा ही आयफोनची वैशिष्ट्य होती. विक्री सुरु झाल्यापासून एक आठवड्यातच तब्बल ७ लाख आयफोन विकले गेले.

त्यानंतर ॲपलपल आयफोनच्या तब्बल १३ आवृत्त्या बाजारपेठेत आल्या आहेत. आयफोनची किंमत इतर स्मार्टफोनपेक्षा तुलनेने कितीतरी जास्त असली तरी आयफोन वापराने हे एक स्टेटस सिंबॉल बनून गेले.

आयफोनची आणखी एक मजेशीर बाब म्हणजे आयफोन १३ ची एक विशेष आवृत्ती (स्पेशल एडिशन) काढण्यात आली आहे. या एडिशनमधल्या फोनमध्ये वापरलेले सुटे भाग सध्या जगभरात चर्चेत असलेल्या ‘टेस्ला’च्या सुट्या भागांना वितळवून बनवले आहेत. इतकच नाही तर या एडिशनच्या फोन्समध्ये एलॉन मस्क यांचे डेस्कटॉप पिक्चरही उपलब्ध करून दिले आहे.

तुमच्याकडेही आयफोन असेल तर ‘आयफोन’च्या नावाच्या जन्माची कहाणी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweetShare
Previous Post

या दुर्मिळ नोटेच्या बदल्यात कमावू शकाल लाखो रुपये! पण जपून, कारण…

Next Post

या चोऱ्यांच्या पुढे मनी हाईस्ट पण फिकं पडेल!

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

मनोरंजन

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

28 December 2022
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

22 April 2022
इतिहास

त्याच्या संशोधनाने कोट्यवधी लोकांना अन्न दिले आणि लाखोंना वेदनादायक मृत्यूही!

18 April 2022
विज्ञान तंत्रज्ञान

जगातले सगळे डास नष्ट झाले तर..?

13 April 2022
विज्ञान तंत्रज्ञान

गुगल ड्राईव्हवर फुकट होणाऱ्या व्हॉट्सॲप बॅकअपला आता पैसे मोजावे लागू शकतात!

17 March 2022
विज्ञान तंत्रज्ञान

आईनस्टाईनने १०० वर्ष आधीच गुरुत्वाकर्षण लहरींच्या अस्तित्वाचे भाकीत केले होते

17 March 2022
Next Post

या चोऱ्यांच्या पुढे मनी हाईस्ट पण फिकं पडेल!

हा एकमेव खेळाडू आहे जो भारत आणि इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळलाय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)