तीस वर्षांनंतरही काश्मिरी पंडित विस्थापितांचं आयुष्य जगत आहेत

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


काश्मीरचा विचार केला की डोळ्यांसमोर उभी राहते तिथली नयनरम्य निसर्ग संपन्नता आणि त्याचबरोबर उभी राहते इतिहासाच्या पानांत दडलेली एक भयानक, माणुसकीला काळीमा फासणारी घटना. आज ३० वर्षांनंतरही, काश्मीरी पंडितांचा झालेला नरसंहार कोणताच भारतीय विसरू शकलेला नाही.

संपूर्ण जगाला या हिंसक घटनेतून, समोर आलेल्या मनुष्य जातीच्या क्रूरतेने हादरवून सोडले. वृध्द, बालकं, तरुण कोणालाही त्या नराधमांनी सोडले नाही. हाताला येईल त्याचा खून करायचाच, हे ठरवूनच हा हल्ला घडवून आणला होता. काश्मीरच्या त्या अलगाववादाच्या आगीत कित्येक घरे होरपळून गेली, कित्येक मुलं अनाथ झाली, स्त्रियांवर, मुलींवर सामूहिक बलात्कार घडले, कत्तली घडल्या.

घाटीच्या गल्ल्या, रस्ते पंडितांच्या रक्तानी, किंकाळ्यांनी भरून गेल्या. लहानपणापासूनचे शेजारी असलेले, भाऊ-बंधू म्हणून सोबत वाढलेलेच जेव्हा आपल्या रक्तासाठी हपापतात तेव्हा काय होतं हे काश्मीरी पंडितांपेक्षा दुसरं कोणीही समजू शकणार नाही.

पंडितांच्या बाबतीत या अलगाववादी आणि कट्टरपंथी घटना 1987 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात घडायला सुरुवात झाली. या निवडणुकीत फारूक अब्दुल्ला यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती.

नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? का बालमित्रांनीच आपल्या सवांगड्यांच्या रक्ताचे पाट वाहिले,? या लोकांच्या मनात इतका राग कोणी व का भरवून दिला? याबद्दल थोडे जाणून घेऊया.

१९ सप्टेंबर १९८९ रोजी पंडित आणि राजनैतिक कार्यकर्ते, टीका लाल टपलू यांची, त्यांच्याच राहत्या घरासमोर काही हत्यारबंद इसमांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या केली. कोणाला साधी कल्पनाही नसलेल्या त्या नरसंहाराची हीच पहिली पायरी होती. या नंतर घटितलीघाटीतील परिस्थिती झपाट्याने चिघळत होती. दिवसेंदिवस घाटीतील पंडितांचे जीवन खडतर होत चालले होते.

एक दिवस, जानेवारी महिन्यात घाटीतील मशिदीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमू लागली. मोठमोठाले जत्थे मशिदीमध्ये जमू लागले. मशिदींमध्ये जमलेल्या त्या लोकांना “पंडित हे भारत सरकारचे एजंट आहेत” हे सांगून भडकवण्यात आले. भारताविरूद्ध व निरपराध पंडितांविरूद्ध, घाटीतील मुसलमान रस्त्यांवर उतरले आणि भरपूर नारेबाजी झाली. पण परिस्थिती हाताबाहेर जायला फार वेळ लागला नाही. नाऱ्यांवरून शस्त्रांपर्यंत गोष्टी कधी पुढे गेल्या कोणालाच कळले नाही.

“पंडितांनी धर्मांतर करून आम्हाला साथ द्यावी किंवा घाटी सोडून निघून जावे” अशा शब्दात त्यांना धमकावण्यात आले.

आता आपण इथे राहू शकणार नाही हे लक्षात आल्याने पंडित तिथून पलायन करू लागले. पण घाटी सोडून जाणाऱ्या पंडितांनासुद्धा शांतपणे जाऊ न देता, रक्ताच्या भुकेल्या, दिशाभुल करून दिलेल्या त्या मुस्लिम जमावाने त्यांच्या कत्तली करणे सुरू केले.

जवळपास आठ लाख पंडित आपल्या हक्काच्या घरून पलायन करून, त्यांना सुरक्षित वाटणाऱ्या जम्मू व पंजाब येथे शरणार्थी बनले. काहींनी दिल्लीची निवड केली. आपल्या जीवनभराची मेहनतीने कमावलेली पुंजी, इस्टेट, उभारलेले व्यवसाय सगळ्यांवर पाणी सोडून पंडितांना घाटी सोडण्यास भाग पाडण्यात आले.

कित्येक पंडितांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, हाताला लागलेल्या कित्येक मुली व स्त्रियांवर बर्बरिकपणे सामूहिक बलात्कार करण्यात आले त्या आकड्याची कुठेही नोंद नाही. पण हे अत्याचार घडवून आणणाऱ्या कोणावरही कुठलीच कार्यवाही झाली नाही, साधी केससुद्धा झाली नाही. या हत्याकांडात न्यायाधीश नीलकंठ गंजू, टेलिकॉम इंजीनियर बालकृष्ण गंजू, दूरदर्शन निर्देशक लसा कॉल, सामाजिक नेता टीकालाल टपलू यांसारख्या प्रतिष्ठित लोकांची हत्या केली गेली. जिथे ही मोठी माणसच सुरक्षित राहिली नाही तिथे सामान्य लोकांच्या जीवाचा तर प्रश्नच उरत नाही.

परिस्थिती चिघळलेली पाहता तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांनी भारतीय सेना बोलावून घेतली. सेनेच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे पंडितांना होणारा त्रास थोडा का होईना कमी झाला. नाही तर जे घडले त्याहून विदारक आणि भयानक कृत्य घडले असते. जितके पंडित ह्या अत्याचारातून बचावले तितकेही बचावले नसते. स्त्रियांसाठी व मुलींसाठी परिस्थिती अजुनच जीवघेणी ठरली असती.

त्या मनविषण्ण करणाऱ्या घटनेनंतरसुद्धा काश्मीरी पंडितांचे जीवन सुरळीत झाले असे नाही. ज्या ठिकाणी पंडितांनी असरा घेतला होता तिथे त्यांना भेदभावाला सामोरे जावे लागले.

समाजातून होत असलेल्या टीकेने त्यांचे जीवन जगणे असह्य झाले होते. शाळा, दवाखाने, बँक, सार्वजनिक ठिकाणे सगळीकडेच त्यांना भेदभावाला, मुळ रहिवाशांच्या द्वेषाला सामोरे जावे लागत होते.

विस्थापित झालेल्या पंडितांची ज्या शिबिरांमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती, तिथेही काही खास सुविधा उपलब्ध नव्हती. स्वच्छता, सुरक्षितता यांच्या दृष्टीने ती शिबिरे कमकुवत होती. ५०,००० हून अधिक पंडित तर त्या शिबिरांमध्ये असलेल्या साप व विंचवांच्या दंशाने मरण पावले.

आज त्या घटनेला ३० वर्षे होऊन गेली तरीही प्रत्येक काश्मीरी पंडितांच्या मनात अजूनही त्या जखमा ओल्याच आहेत. परिस्थिती पूर्वापार कधीच होऊ शकणार नाही याची त्यांनी पूर्ण कल्पना आहे. पण जीवन तर सुरूच राहते त्यामुळे त्या कटू आठवणी मागे सोडून पुन्हा जीवनाची गाडी समोर नेण्याचे प्रयत्न करता राहणे मनुष्याचे कर्तव्य आहे या धोरणाला अनुसरून पंडित आपले जीवन व्यतीत करत असून हळूहळू उन्नतीकडे वळत आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!