The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

अजब कॅलेंडर! अजूनही या देशात २०१३ सालच चालू आहे!

by द पोस्टमन टीम
7 December 2020
in भटकंती, मनोरंजन
Reading Time:1min read
0
Home भटकंती

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

जगभरात अनेक विचित्र गोष्टी अस्तित्वात असतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. जगाच्या पाठीवर असाच एक देश आहे इथिओपिया, जो संपूर्ण जगाच्या तुलनेत आठ वर्षे मागे आहे. आहे की नाही आश्चर्याची गोष्ट! आजच्या युगात जिथे कुणाला मिनिटभरच नव्हे तर सेकंदभरही इतरांच्या मागे राहायला आवडत नाही. जिथे सतत दुसऱ्याला मागे टाकून पुढे धावण्याची चढाओढ सुरु असते तिथे हा संपूर्ण देशच इतर देशाच्या तुलनेत आठ वर्षे मागे का आणि कसा बरं राहिला असेल? जाणून घेऊया इथिओपियाच्या या कालगणनेविषयीची गोष्ट.

इथिओपियाचा हा जगाच्या पाठीवरील एक सुंदर देश आहे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेल्या अनेक ठिकाणात या देशातील ठिकाणाची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये या देशाविषयी खास आकर्षण आहे. परंतु जेंव्हा तुम्ही इथिओपियामध्ये पाउल ठेवता तेंव्हा तुम्हाला अचानक जाणीव होते की तुम्ही जगाच्या तुलनेत आठवर्षे मागे आला आहात. जणू एखाद्या सायन्स फिक्शनमधल्या टाइममशीनमधून उलटा प्रवास करूनच तुम्ही या धरतीवर अवतरला आहात.

आपण सर्वजण जानेवारी महिन्यात नव्या वर्षाची सुरुवात करतो पण, या देशात नव्या वर्षाची सुरुवात ११ सप्टेंबर रोजी होते. इथले कॅलेंडर जगाच्या तुलनेत ७ वर्षे तीन महिने मागे आहे. इथे अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या उर्वरित जगापेक्षा खूपच वेगळ्या आहेत. आपण बारा महिन्यांचे एक वर्ष मानतो तर इथे एका वर्षात तेरा महिने असतात. परंतु, कालगणनेबाबत हा देश असा वेगळा का आहे? यामागचे नेमके कारण काय?

तर, या देशात इतरत्र प्रमाण मानले जाणारे ग्रिगोरीयन कॅलेंडर वापरले जात नाही. तर इथे त्यांचे स्वतःचे कॅलेंडर वापरले जाते. यांच्या कॅलेंडरला इथिओपियन कॅलेंडर म्हटले जाते. खरे तरी ग्रिगोरीयान आणि इथिओपियन या दोन्ही कॅलेंडरची सुरुवात ख्रिस्ताच्या जन्मापासूनच होते. पण, ग्रिगोरीयान कॅलेंडरनुसार ख्रिस्ताचा जन्म पहिल्या शतकात झाला असे मानले जाते तर इथिओपियन कॅलेंडरनुसार ख्रिस्ताचा जन्म इ.स.पू. सातव्या शतकात झाला असे मानले जाते. इथल्या समाजजीवनावर रोमन चर्चचा मोठा प्रभाव होता. म्हणूनच इथली कालगणना इ.स.पू. सातव्या शतकापासून झाली.

या कॅलेंडरनुसार वर्षाचे तेरा महिने असतात आणि यातील १२ महिन्यात तीस दिवस असतात. शेवटच्या महिन्यात फक्त पाच किंवा सहा दिवस असतात. आठवड्याचे वार असो की महिन्यांची नावे इथिओपियन कॅलेंडरवर बायबलचा प्रभाव जास्त दिसतो.

सध्या जगात सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या ग्रिगोरीयान कॅलेंडरची सुरुवात १५८२ मध्ये पोप ग्रिगोरी याने केली. म्हणून त्याच्याच नावाने हे कॅलेंडर ग्रिगोरीयन कॅलेंडर म्हणून वापरले जाते. त्याआधी ज्युलियन कॅलेंडर प्रचलित होते.

ग्रिगोरीयन कॅलेंडरमध्ये पूर्वीच्या ज्युलियन कॅलेंडरमधील ११ दिवस वगळण्यात आले होते. हे कॅलेंडर सर्वत्र स्वीकारण्यापूर्वी अनेक देशातून याला प्रचंड विरोध झाला होता. परंतु हळूहळू हा विरोध मावळत गेला आणि सर्वत्र सर्रासपणे हेच कॅलेंडर रूढ झाले. इथिओपिया हा देश मात्र कोणत्याही वसाहतवादी आणि साम्राज्यवादी शक्तींच्या प्रभावापासून मुक्त होता त्यामुळे त्याला स्वतःचे इथिओपियन कॅलेंडर वापरणे जास्त सोयीचे गेले. अशा प्रकारे कॅलेंडरच्या कालगणनेतच तफावत निर्माण झाल्याने इथिओपिया हा देश इतर देशाच्या तुलनेत सात ते आठ वर्षे मागे आहे. संपूर्ण जग काही दिवसांनी २०२१ मध्ये प्रवेश करेल मात्र इथिओपियामध्ये मात्र २०१३-१४ हेच वर्ष सुरु असेल.

हे देखील वाचा

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

जगण्यासाठी आवश्यक बनलेल्या वायफायचा शोध हॉलीवूडच्या या अभिनेत्रीने लावलाय

ADVERTISEMENT

या कॅलेंडरनुसार त्यांचे सणही वेगवेगळ्या दिवशीच साजरे केले जातात. ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्याची तारीखही वेगळी असते. इथिओपियन नागरिकांसाठी ही कालगणना अजिबात चुकीची किंवा विचित्र वाटत नाही. मात्र बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी मात्र हे थोडेसे गैरसोयीचे ठरते. कालगणनेतील या तफावतीमुळे पर्यटकांचा गोंधळ होतो, जसे की हॉटेलचे प्री-बुकिंग करणे, किंवा हॉटेलमधून चेक-आउट करणे. याव्यतिरिक्त इतरही काही बाबतीत असाच गोंधळ उडतो.

इथिओपियन कॅलेंडरमधील १३ व्या महिन्याला पागुमे म्हटले जाते. पागुमेचा अर्थ होतो, ‘वर्षभराच्या एकूण दिवसातील मोजायचे राहून गेलेले दिवस.’

इथिओपियन कॅलेंडरनुसार एका वर्षात ३६५ दिवस, सहा तास, दोन मिनिट आणि २४ सेकंद असतात. दर चार वर्षांनी त्यांचेही लीप वर्ष असते. तिथल्या कॅलेंडरनुसार दर ६०० वर्षांच्या गॅपनंतर २ मिनिट, २४ सेकंद वाढवले जातात त्यामुळे दर सहाशे वर्षांनी तिथे एक जास्तीचा सातवा दिवस येतो. या घटनेला ते रेना मिल्ट आणि रेना लेलीट म्हणतात. दर सहाशे वर्षांनी ऍक्वेड नावाचा तारा सूर्याला झाकोळून टाकतो आणि त्यामुळे एक संपूर्ण सूर्यग्रहण होते असे या कॅलेंडरमध्ये नमूद करण्यात आले आहे. इथिओपियाच्या अनेक प्राचीन ग्रंथात या ग्राहणाविषयीची माहिती मिळते. आधुनिक काळातही शास्त्रज्ञांना सुर्यग्रहणाचा हा शोध अगदी अलीकडे लागला आहे, तिथे इथिओपियाच्या पूर्वजांना मात्र सूर्यग्रहणाची आधीच माहिती होती असे दिसते.

सध्या इथिओपियन लोक ग्रिगोरीयान आणि इथिओपियन असे दोन्ही कॅलेंडर वापरतात. ज्यामुळे पर्यटकांची गैरसोय टाळली जाते.

संपूर्ण जगाच्या तुलनेत आठ वर्षे मागे असणाऱ्या या देशाची आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सर्वात जास्त ठिकाणे याच देशातील आहेत. जगातील सर्वात मोठी आणि लांब गुफा, जगातील सर्वात उष्ण ठिकाण, यासारखी ठिकाणे इथेच पाहायला मिळतात. शिवाय, निसर्गाने इथे आपल्या खजिन्याची मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. म्हणूनच दरवर्षी इथे लाखो पर्यटक भेट देण्यासाठी येतात. दरवर्षी ११ सप्टेंबरला इथे जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले जाते. इथिओपियातील हा नववर्षाचा जल्लोषही पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

मराठवाडी नेते, जनता अन् पंजाबचे शेतकरी…!

Next Post

खांडवप्रस्थ ते ‘न्यु दिल्ली’ : भारताच्या राजधानीचा वैभवशाली इतिहास

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!
मनोरंजन

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021
इतिहास

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

4 January 2021
मनोरंजन

जगण्यासाठी आवश्यक बनलेल्या वायफायचा शोध हॉलीवूडच्या या अभिनेत्रीने लावलाय

3 January 2021
मनोरंजन

विन्सेट वॅन गॉग – कॅनव्हासवर वेदना जिवंत करणारा कलाकार

30 December 2020
राजदूत म्हणजे ८०च्या दशकातील तरुणांचा जीव की प्राण!
भटकंती

राजदूत म्हणजे ८०च्या दशकातील तरुणांचा जीव की प्राण!

11 December 2020
फुकट आहे म्हणून हॉटेलातून खिशात भरून आणतो त्या टूथपिकला पण स्वतःचा इतिहास आहे..
इतिहास

फुकट आहे म्हणून हॉटेलातून खिशात भरून आणतो त्या टूथपिकला पण स्वतःचा इतिहास आहे..

10 December 2020
Next Post
खांडवप्रस्थ ते ‘न्यु दिल्ली’ : भारताच्या राजधानीचा वैभवशाली इतिहास

खांडवप्रस्थ ते 'न्यु दिल्ली' : भारताच्या राजधानीचा वैभवशाली इतिहास

चोर, फकीर की आध्यात्मिक गुरू? ग्रिगोरी रास्पुतिन नेमकं काय रसायन होतं..?

चोर, फकीर की आध्यात्मिक गुरू? ग्रिगोरी रास्पुतिन नेमकं काय रसायन होतं..?

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

21 April 2020
शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

20 June 2020
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

अफगाणी सैनिकांसाठी युद्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

16 January 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!