The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

‘हॅप्पी बर्थडे’ गाण्याची मालकी सांगून वॉर्नर म्युझिकने रग्गड पैसे छापले होते, पण…

by द पोस्टमन टीम
14 April 2022
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस. विशेषतः लहान मुलांच्या फुलपंखी दुनियेत तर या दिवसाचे महत्त्व खासच. एकत्र जमायचे, केक कापायचा, फुंकर मारून मेणबत्त्या विझवायच्या, गाणी म्हणायची आणि मग हसत-खिदळत केक खाणे, गिफ्टची देवाण-घेवाण आणि नंतरची पार्टी या गोष्टींचा आनंद लुटायचा.

त्याअनुषंगाने आठवते ती ‘हॅपी बर्थडे टू यू’ ही गाण्याची लोकप्रिय धून. इंग्रजीतील हे सर्वात लोकप्रिय गाणे. मात्र हेच गाणे काही वर्षांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकले. त्याचाच हा किस्सा खास पोस्टमनच्या वाचकांसाठी.

नेमके वर्ष सांगायचे तर 2016. या गाण्याचे प्रकाशक असलेल्या वॉर्नर/चॅपेल यांच्यावर गाण्याला आव्हान देणारी केस मिटवण्यासाठी 14 दशलक्ष डॉलर्स एवढी भरभक्कम रक्कम मोजण्याची वेळ आली. 

त्यानंतर या गाण्यावरचा वॉर्नर/ चॅपेल यांचा हक्क संपुष्टात आला आणि हे गाणे ‘पब्लिक डोमेन’मध्ये आले. म्हणजेच हे गाणे त्यानंतर सार्वजनिक मालकीचे झाले. त्यावर कुण्या एकाची मालकी उरली नाही. अमेरिकेच्या इतिहासात या निर्णयाकडे ऐतिहासिक निर्णय म्हणून बघितले जाते. युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट जज जॉर्ज किंग यांनी वॉर्नर/ चॅपेल यांचा हॅपी बर्थडे या गाण्यावरील हक्क अवैध असल्याचा निर्णय दिला.

याआधी या गाण्याची मालकी प्राप्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला होता. त्यातूनच त्याची मालकी अनेकदा एकाकडून दुसऱ्याकडे गेली होती. 1988 मध्ये या गाण्याची मालकी वॉर्नर चॅपेल यांच्याकडे आली आणि त्यानंतर या प्रकाशकांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. या गाण्याचा टीव्ही शो किंवा चित्रपटांमध्ये वापर करू देण्यासाठी आता ते चांगली भरभक्कम रॉयल्टी आकारायला लागले. या सगळ्याला या निर्णयामुळे चाप बसला.

न्यायमूर्ती किंग यांच्या म्हणण्यानुसार या गाण्याचा 1935 मधील मूळ कॉपीराइट केवळ विशिष्ट पियानो सुरावटीसाठीच लागू आहे. शिवाय या गाण्याची चाल 1893 च्या ‘गुड मॉर्निंग टू ऑल’ या चालीवरून घेतलेली आहे. विशेष म्हणजे गुड मॉर्निंग टू ऑल बऱ्याच कालावधीपासून सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध आहे.

सुरुवातीला किंग यांनी हॅपी बर्थडे हे गाणे सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करायचे नाकारले होते. तेव्हा वॉर्नर/ चॅपेल हे सरकारला आव्हान देण्याचा विचार करत होते. त्याच दरम्यान पॅटी स्मिथ हिल आणि मिल्ड्रेड हिल या दोघी बहिणींनी हे गाणे कोणाचे, त्यावर हक्क कोणाचा याचा शोध घेतला होता. या प्रकरणाची ट्रायल डिसेंबरमध्ये सुरू होणार होती. याच काळात दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला.

हे देखील वाचा

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

वॉर्नर्सना 2030 पर्यंत हॅपी बर्थडे गाण्याचे कॉपीराइट्स त्यांच्याकडे राहतील अशी अपेक्षा होती. अंदाजानुसार 2030 पर्यंत या गाण्याच्या माध्यमातून 14 दशलक्ष डॉलर्स ते 16.5 दशलक्ष डॉलर्स इतकी कमाई होऊ शकली असती.

ADVERTISEMENT

मात्र या करारामुळे वॉर्नर/चॅपेल यांचा एक फायदा झाला. अंदाजानुसार त्यांनी परवाना शुल्काच्या माध्यमातून पंचवीस वर्षांच्या कालावधीत 50 दशलक्ष डॉलर पेक्षा जास्त महसूल गोळा केला होता. अशाप्रकारे महसूल गोळा केल्याबद्दल त्यांना दंड केला जावा की नाही याबद्दलची सुनावणी होणार होती. ती या समझोत्यामुळे टळली.

त्याआधी जेनिफर नेल्सन नावाच्या निर्मातीने वॉर्नर/ चॅपेल यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. ही निर्माती हॅपी बर्थडे गाण्याबद्दलच्या एका माहितीपटाची निर्मिती करत होती, तेव्हा तिच्याकडून हे गाणे वापरण्यासाठी परवाना शुल्क म्हणून दीड हजार डॉलर्स आकारले गेले होते. भविष्यात इतर निर्मात्यांना किंवा इतर कुणालाही वॉर्नर/ चॅपेल यांना अशाप्रकारे पैसे द्यायला लागू नये म्हणून तिने हा दावा ठोकला. फिर्यादीच्या दाव्यानुसार विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हे गाणे मुलांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये दिसायचे. त्यामुळे ते आतादेखील सार्वजनिक असणेच योग्य होते.

फिर्यादींचे प्रतिनिधित्व मार्क रिफकिन यांच्या नेतृत्वाखालील वकिलांनी केले. कराराच्या अटींप्रमाणे त्यांनी समझोत्याच्या रकमेच्या एक तृतीयांश म्हणजे 4.62 दशलक्ष डॉलर्स एवढी फी आकारली. उरलेली रक्कम ज्यांनी ‘हॅपी बर्थडे’च्या परवान्यासाठी पैसे दिले होते आणि इतर सर्व अटी पूर्ण केलेल्या होत्या, त्यांना वाटून दिली गेली.

दुसरीकडे कंपनीचे तिमाहीचे नफ्यातोट्याचे आकडे जाहीर करताना वॉर्नर म्युझिक ग्रुपने हॅपी बर्थडे गाण्याच्या तडजोडीसाठी खर्च कराव्या लागलेल्या ऑपरेटिंग लॉसेसवर ठपका ठेवला!

पण काही का असेना, केवळ अमुक एक धून किंवा संगीतरचना आपल्या मालकीची म्हणून तिच्या वापरासाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेणाऱ्या एका बलाढ्य आणि मातब्बर कंपनीला न्यायालयाने हिसका दाखवला आणि ती गोष्ट सार्वजनिक वापरासाठी खुली करून दिली, ही बाब अनोखीच म्हणावी लागेल. निदान अमेरिकेत तरी.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

रस्त्यावर भाजी विकणारा १८ वर्षांचा तिरंदाज भारतासाठी विश्वचषकाचं ‘लक्ष्य’ गाठणार आहे!

Next Post

दुसऱ्या महायुद्धादरम्यान फिनलंडमधून ८०००० मुलांना असं बाहेर काढण्यात आले!

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

मनोरंजन

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

28 December 2022
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

7 September 2022
मनोरंजन

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

4 June 2022
मनोरंजन

या बयेनी नवऱ्याला तुरुंगातून पळवण्यासाठी चक्क पायलटचं लायसन्स मिळवलं होतं

22 April 2022
मनोरंजन

‘त्या’ दिवशी उडती तबकडी बघून लंडनवासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता, पण…

20 April 2022
मनोरंजन

बॅटमॅन तयार केला एकाने आणि श्रेय लाटलं भलत्यानेच!

8 April 2022
Next Post

दुसऱ्या महायुद्धादरम्यान फिनलंडमधून ८०००० मुलांना असं बाहेर काढण्यात आले!

ICC नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व नियम आजही इंग्लंडचा हा क्लब बनवतो..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)