The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

शीर हातावर घेऊन लढणाऱ्या एका मराठ्याच्या अतुलनीय शौर्याची कहाणी…

by द पोस्टमन टीम
10 January 2021
in इतिहास
Reading Time:1min read
1
Home इतिहास

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

भारतात मराठ्यांचा साम्राज्य विस्तार झपाट्याने होत होता, सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रा पुरते मर्यादित असलेले मराठा साम्राज्य अटकेपार पसरले होते, जिथवर नजर जाईल तिथवरचा मुलुख आपलाच असे ही मराठा सैनिक अभिमानानं सांगायचे.

मराठा सल्तनतीच्या लाखो मर्द मावळ्या सैनिकांनी यासाठी कष्ट घेतले होते, प्राणाची बाजी लावत मराठा साम्राज्याच्या हद्दी वाढवून अखंड भारतावर भगवा फडकावण्याचा प्रण केलेल्या शूरवीर सरदारांपैकी होते श्रीमंत सरदार दत्ताजी शिंदे.

रुबाबदार चेहरा, पिळदार मिश्या, डोक्यावर सरदार पगडी, पहाडी आवाज आणि डोळ्यात दिल्लीच्या तख्तावर फडकणारा भगवा असा राजबिंडा त्यांचा पेहराव होता.

दत्ताजी शिंदे म्हणजे राणोजी शिंद्यांचे धाकटे चिरंजीव तर महादजी शिंद्यांचे सावत्र भाऊ. शिंद्यांचे संपूर्ण कुटुंबच स्वराज्याच्या सेवेत होते. दत्ताजींनाही हा वसा आपल्या कुटुंब कडूनच भेटला.

दत्ताजी तसे बालपणापासून चतुर होते. तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे हा त्यांचा आवडीचा छंद वयात आल्यानंतर आपल्या वडील आणि बांधवांप्रमाणे दत्ताजी मराठा सैन्यात दाखल झाले. मराठा साम्राज्यासाठी आपले प्राण गेले तरी बेहत्तर, पण भगवा अभिमाने डोलत रहायला हवा हा त्यांचा कटाक्ष असायचा.

दत्ताजी तसे रणमर्द गडी, त्यांच्या पराक्रमाची एक ओळख झाली ती कुकडीच्या लढाईत, या लढाई दरम्यान मराठा साम्राज्याच्या ११ असामींनी निजामाच्या हातीवर नियोजन पूर्ण चाल करून त्या हत्तीसह अंबारी खाली पाडली होती. डोलाची अंबारी तीही फक्त ११ जणांनी मिळून पाडली ही खबर जेव्हा पसरली तेव्हा निजाम दरबारी सगळ्यांचा तिळपापड झाला.

त्यानंतर निजाम उपद्रव करू लागला, याला आळा घालण्यासाठी श्रीमंत पेशव्यांनी दत्ताजी शिंदे यांना सेनापती नेमले. आणि विश्वासरावांसह शिन्द्खेड्याला निजामावर चाल करून पाठवले.

हे देखील वाचा

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

पाकिस्तानी सैन्याची पळताभुई करून सोडणारे मेजर आसा राम

आपल्या नेतृत्व व कर्तृत्वाची चुणूक दाखवत दत्त्ताजीने निजामांना पळता भुई थोडी करत त्यांचा पराभव केला. आणि जवळपास २५ लक्षांचा प्रांत आणि नळदुर्गचा किल्ला स्वराज्यात मिळवला.

दत्ताजीचा मोठा भाऊ जयाप्पा शिंदे हे मारवाड प्रांताचा राजा बिजेसिंग याच्यावर चाल करून गेला, अर्थातच दत्ताजी ही त्यांच्या सोबतच होता. या युद्धात जय्याप्पाचा खून झाला पण दत्त्ताजी खचले नाहीत त्यांनी उलट प्रयत्न व वीरतेचा कस लावत बिजेसिंगाला धूळ चारली.

सारा मारवाडवर वर्चस्व स्थापन करत त्याचा तिसरा हिस्सा मराठा साम्राज्यात सामाविष्ट केला. शिवाय ५ कोटींपेक्षाही अधिकची खंडणी वसूल करून मराठ्यांच्या खजिन्यात जमा केली.

मराठा साम्राज्याच्या विस्तार हा पेशव्यांच्या काळात झाला पण पेशव्यांनी आपली निष्ठा कायम राखत राजधानी सातारलाच स्वामी मानले. पेशव्यांनी मराठा साम्राज्यासाठी अनेक शूरवीर सरदार नेमले ज्यात महादजी शिंदे, मल्हारराव होळकर असे एक ना अनेक वीर होते.

सेनापती म्हणून नेमलेल्या दत्ताजी शिंद्यांवर पेशव्यांना अतीव विश्वास होता.अर्थात दत्ताजीही पेशव्यांनी दाखवलेला विश्वास आपल्या कर्तव्यातून सार्थकी लावत होते. पेशव्यांचा ‘दत्ताजी चित्तावर धरील ते करील’ असा भरवसा होता.

याच विश्वासामुळे पेशव्यांनी पानिपतच्या युद्धाची जबाबदारीही दत्ताजीच्या खांद्यावर दिली होती. स्वामींनी दिलेला आदेश शिरसावंद्य मानत दत्ताजी, विश्वासराव व सदाशिवराव भाऊ पानिपतकडे आगेकूच करत होते.

दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात आहे तोपर्यंत इस्लामी राजवटीचा विस्तार होणे शक्य नाही हे जवळपास सर्वच मुस्लिम राजांना उमगले होते. अखेर मराठ्यांचा कायमचा बंदोबस्त करायचा या उद्देशाने नजीब व त्याच्या सहकारी मुस्लीम सरदारांनी अब्दालीला हा विषय कळवला.

अब्दाली येई पर्यंत मराठ्यांना खेळत ठेऊन ऐनवेळी त्यांच्यावर हल्ला करण्याचा बेत मुस्लिम सरदार आखत होते. पण नजीब कडून येणारा संदेश त्यात वारंवार होणारा बदल व वाढत जाणारा वेळ यामुळे नजीबच्या मनात काहीतरी काळबेरं आहे हे दत्ताजींनी ओळखले.

नजीबचा बंदोबस्त करायचा हे मनाशी ठरवून दत्ताजींनी नजीबर चाल करून जाण्याचे ठरवले. आणि यशस्वीपणे चाल करत नजीबला शुक्रतालाहून गंगेच्या तटापर्यंत रेटले. बराच मराठा सैनिक जखमी झाले पण मराठ्यांनी प्राण हरले नाहीत.

मुस्लिम सरदार नजीब व शुजा यांनी ठरल्याप्रमाणे दत्ताजींंच्या मराठा सैन्याला अब्दाली येईपर्यंत अडकवून ठेवले.

समोर नजीब आणि मागे अब्दालीचे सैन्य अश्या कात्रीत दत्ताजींंची तुकडी सापडली. मराठा सैन्य डगमगले नाही त्यांनी शत्रुवर तुटून पडत अस्मान दाखवण्याचा पण केला. मराठा सैनिक तुटून पडले पण आपल्या सैन्याकडे केवळ तलवारी होत्या, आणि समोरच्या अफगाणी सैन्याकडे बंदुकी त्यामुळे त्यांचे भेदक मरे मराठा सैन्यावर होत होते.

अखेर जीवाची बाजी लावत सेनापती दत्ताजी मैदानात उतरले. आपल्या घोड्यावर स्वार होऊन कात्रीने कापड कापावे तसा तलवारीच्यापातीने एक एक शत्रू कापत पुढे जात होते. पण पराभवाचे भय असल्याने नजीब व कुतुबशाहने दत्ताजींंच्या पाठीवर मोठा दगडी गोळा डागला.

एखादा पहाडी हत्ती कोसळावा तसा दत्ताजी खाली कोसळला. रक्तबंबाळ झालेल्या दत्त्ताजींंच्या जवळ जाण्याची हिम्मत अजूनही नजीब व कुतुबशाह मध्ये नव्हती. अखेर दताजी जखमी झाला आहे हे पाहून कुतूब त्याच्या जवळ गेला.

नंतर दत्ताजींच्या डोक्यावरील पगडी हटवून त्याच्या केसांना पकडून दत्ताजींच्या डोळ्यासमोर भाला रोखत विचारलं “क्यू पाटील और लढोगे?” मराठा सल्तनतीचं स्वप्न त्या वीराच्या मनात तेवत होतं. त्याने तेवढ्याच रुबाबात उत्तर दिले,

क्यूँ नहीँ, बचेंगे तो और भी लढेंगे.

कुतुबशाहला राग अनावर झाला त्याने दत्ताजींवर गोळी झाडली आणि त्यांच्या छातीवर बसून तलवारीचे वार करत, त्यांचा गळा कापला. आणि शीर घेऊन ते नाचवत अब्दाली कडे गेला.

मराठा सैन्याचं खच्चीकरण होऊ नये यासाठी काही मराठा सैनिकांनी यांचे धड लपवून ठेवले. रात्रीच्या अंधारात जखमी झालेले व प्राण वाचवून बसलेले मराठा सैनिक बाहेर आले त्यांनी मोडकळीस आलेल्या तोफांचे अवशेष एकत्र करून सरण रचले व कफन म्हणून दत्ताजींच्या अंगावर झाकण्यासाठी स्वतःची धोतर दिली. रात्रीचा अंधार आणि समोर धरर्तीर्थी पडलेला आपल्या सेनापतीचा मृतदेह डोळ्यात अश्रू घेऊन, मराठा सैनिकांनी दत्त्ताजींचे अंत्यसंस्कार केले.

पुढे पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. अनेकांनी या युद्धाचे वर्णन मराठ्यांच्या पराजयातील असामान्य विजय असेही वर्णन केले. मराठा साम्राज्याची कधी न भरून निघणारी हानी झाली. अनेक शूरवीर सरदार यात मारले गेले.

पानिपतानंतर मराठा साम्राज्याला जणू ग्रहणच लागले. या युद्धात तरुण तडफदार पेशवे विश्वासराव कामी आले. पुण्यासह मराठा साम्राज्यावर शोककळा पसरली. दत्ताजी शिन्द्यांसह तुकोजी शिंदे, जानकोजी शिंदे, येसाजी शिंदे, संभाजी शिंदे, मानाजी शिंदे, रवलोजी शिंदे असे शिंदे घराण्यातील वीर शहीद झाले होते. एकमेव महादजी शिंदे तेवढे वाचले होते. त्यांनीच पुढे नजीबची कबर फोडून त्याची हाड इतरत्र फेकून आज दत्ताजींचा आत्मा समाधानी झाला असेल असे उद्गार काढले.

ADVERTISEMENT

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कान्हेर्खेद येथे या सर्व शिंद्यांचे एक स्मारक १६ खंबी आजही पहावयास मिळते. मराठा साम्राज्याचे सेनापती बाजिंदा लढवय्या दत्त्ताजी शिंदे याचं कर्तृत्व अजरामर आहे.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

Tags: Battle Of Panipat
ShareTweetShare
Previous Post

रायगडाची भ्रमणगाथा: मराठा साम्राज्याच्या राजधानीची रंजक सफर

Next Post

सिनेसृष्टीचं रामायण: चित्रपटातूनच चितारलेल्या रामगाथेचा इतिहास

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

इतिहास

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021
इतिहास

आणि म्हणून सुभेदार पान सिंह तोमर डाकू बनला..

4 January 2021
इतिहास

पाकिस्तानी सैन्याची पळताभुई करून सोडणारे मेजर आसा राम

3 January 2021
इतिहास

सत्याग्रहाची आयडिया गांधीजींच्या या नातेवाईकाच्या डोक्यातून निघाली होती

3 January 2021
लेडी डायनाच्या आयुष्यातील रहस्य अजूनही उलगडले नाहीत
इतिहास

लेडी डायनाच्या आयुष्यातील रहस्य अजूनही उलगडले नाहीत

3 January 2021
इतिहास

अफगाणी सैनिकांसाठी युद्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

16 January 2021
Next Post
सिनेसृष्टीचं रामायण: चित्रपटातूनच चितारलेल्या रामगाथेचा इतिहास

सिनेसृष्टीचं रामायण: चित्रपटातूनच चितारलेल्या रामगाथेचा इतिहास

iran missiles the postman

अमेरिकेशी युद्ध झाल्यास इराण किती शस्त्रसज्ज?

Comments 1

  1. bhuvneshwar sankhe says:
    9 months ago

    अक्षरशः पानिपतच्या युध्दात मराठ्यांच्या विश्वासघात झाला.

    Reply

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

21 April 2020
शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

20 June 2020
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

अफगाणी सैनिकांसाठी युद्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

16 January 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!