आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
युरोपमध्ये पूर्वीपासूनच लोकांना फुटबॉलचं वेड आहे. ज्याप्रमाणे भारतात क्रिकेटची क्रेझ असते तशीच फूटबॉलची क्रेझ युरोपात असल्याने तेथे फुटबॉलच्या अनेक मॅचेस होतात. २०१७ सालीही एप्रिल महिन्यात यु.इ.एफ.ए. चॅम्पियन्स लीग सुरु होती.
युरोपातील बुंडेस लीगमध्ये खेळणारा बोरुसिया डॉर्टमण्ड हा एकमेव असा संघ होता जो स्टॉक एक्सचेन्जवर २००० साली एनलिस्ट झाला.
२०१६-१७ च्या यु.इ.एफ.ए. चॅम्पियन्स लीगमध्ये जर्मन फुटबॉल टीम बोरुसिया डॉर्टमण्ड या टीमने क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली होती. क्वार्टर फायनलची पहिली मॅच मोनॅको संघविरोधात खेळण्यासाठी जर्मनीची बोरुसिया डॉर्टमण्ड टीम ११ एप्रिल २०१७ रोजी आपल्या मुक्कामाच्या हॉटेलमधून एका बसद्वारे बाहेर पडली. त्यादिवशीची मॅच ही निर्धारित वेळेनुसार वेस्टफॅलेंस्टेडिअन या मैदानावर होणार होती.
पण बस बाहेर पडताच काही अंतरावर तीन बॉ*म्बस्फो*ट झाले. संघातील खेळाडूंपैकी एक आणि एक पोलीस या ह*ल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाले. बसच्या मजबुतीमुळे त्यावेळी मोठी जीवितहानी टळली. बोरुसिया डॉर्टमण्डच्या बसवर घरात बनावता येणाऱ्या तीन पाईप-बॉ*म्ब्सच्या सहाय्याने ह*ल्ला करण्यात आला. हे बॉ*म्ब्स रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडा-झुडपांमध्ये लपवण्यात आले होते. त्यांची रेंज सुमारे १०० मीटर इतकी होती. तर हा बॉ*म्बस्फो*ट रिमोटकंट्रोलद्वारे करण्यात आला होता.
बॉ*म्ब्सचा प्रकार पाहता या ह*ल्ल्यामागे द*हश*तवादी संघटनांचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज जर्मन पोलिसांनी वर्तवला. बोरुसिया डॉर्टमण्डचाच सदस्य स्पॅनिश फुटबॉलपटू मार्क बर्ट्राला काचा लागून उजव्या मनगटावर दुखापत झाली होती तर संरक्षणासाठी बसच्या पुढे मोटरसायकलवर स्वार असलेल्या पोलिसाला गंभीर दुखापत झाली होती.
जर्मन पोलीस आणि वकिलांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा जाणीवपूर्वकरीत्या केला गेलेला ह*त्येचा प्रयत्न होता. काही वेळात ह*ल्ल्याचे तीन उद्दिष्ट समोर आले. बॉ*म्बस्फो*टाच्या जागी मिळालेल्या पत्रामुळे इ*स्लामी द*हश*तवादामुळे हा ह*ल्ला केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. दुसरं म्हणजे ह*ल्ल्यानंतर काही वेळात हा ‘अँटी-फॅ*सिस्ट’ हेतू असल्याचं इंटरनेटवरून सांगण्यात आलं, पण हा दावा खोटा साबित झाला. तर तिसरी शक्यता अति-उजव्या विचारसरणीच्या लोकांनी हा बॉ*म्बस्फो*ट केला असावा अशी होती. त्यानंतर सरकारच्या वतीने खटला चालवणाऱ्या वकीलाने या ह*ल्ल्याला संभाव्य धर्मांध इ*स्लामी सहभागामुळे द*हश*तवादी कृत्य म्हणून घोषित केलं.
या ह*ल्ल्यामागे नक्की धर्मांध इस्ला*मी द*हश*तवादाचा हात आहे की अति-उजव्या राजकीय विचाराचा हात आहे की अति-डाव्या राजकीय विचाराचा हात आहे हे पोलिसांनी शोधून काढलं. पण वास्तविकता काही वेगळीच होती!
ह*ल्ल्याच्या जागी काही पत्रं मिळाली, ज्यात आय.एस.आय.एस या द*हश*तवादी संघटनेने ह*ल्ल्याची जबाबदारी स्वीकारून काही धमक्या दिल्या होत्या. तर दुसरा संशय होता तो अति-डावी विचारसरणी असलेल्या इंडिमेडीया या मुक्त संकेतस्थळावर. त्यांच्या मते डॉर्टमण्ड टीममध्ये काही लोक ना*झी विचारसरणीला पाठिंबा देणारे होते. पण हा संशय पूर्णपणे खोटा असल्याचं जर्मन पोलिसांनी जाहीर केलं.
यावरून प्रथमदर्शनी संशय आपसूकच आय.एस.आय.एस.वर जातो. या पात्राच्या आशयाप्रमाणे हा ह*ल्ला जर्मनीने इराक आणि सीरियामध्ये आय.एस.आय.एस.वर केलेल्या ह*ल्ल्यांना प्रत्युत्तर होता. तसेच त्या पात्रात रॅमस्टेन येथील अमेरिकेच्या हवाई दलाचा तळ बंद करण्याची मागणी तसेच सीरियामधून जर्मनीचे टोर्नेडो जेट्स मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. या मागण्या मान्य न झाल्यास जर्मनीतील नामांकित व्यक्तींना जीवे मारण्याची धमकीही या पत्रातून देण्यात आली होती. पण या पत्रावर कुठेही आय.एस.आय.एस.चं चिन्ह किंवा स्वाक्षरी नव्हती.
दुसरा संशय जात होता तो राजकीय डाव्या विचारसरणीच्या इंडोमेडीया या मुक्त वेबसाईटवर! ना*झींप्रती सहानुभूती असलेले काही लोक या संघात आहेत असं काही दिवसापूर्वी म्हटलं जात होतं. पण हा संशयही खोटा असल्याचं जर्मन पोलिसांनी जाहीर केलं. काही दिवसांनी संशयाची सुई अति-उजवी राजकीय विचारसरणी ठेवणाऱ्या ‘दर टगेस्पिगेल’ या वर्तमानपत्राकडे गेली. पण तो संशयही चुकीचा ठरला.
तपासाच्या सुरुवातीलाच इराकहून आलेल्या दोन निर्वासितांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्यापैकी एक धर्मांध इ*स्लामी द*हश*तवादावर विश्वास ठेवणारा आहे आणि जर्मनीमधील आय.एस.आय.एसच्या युनिटच नेतृत्व करणारा आहे, असा संशय पोलिसांना होता, पण त्यांच्यावरचे आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
मग नेमकं घडलं काय होतं? सगळ्यांच्याच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं! अद्यापही बॉम्ब*स्फो*टाच्या मागचं खरं कारण कळालं नव्हतं. अचानक २१ एप्रिल २०१७ या दिवशी सरकारी वकिलांनी एका २८ वर्षीय तरुणाला अटक केल्याचं स्पष्ट केलं. कोणतंही गुन्हेगारी रेकॉर्ड आणि फुटबॉलमध्ये अजिबात रस नसलेला सेर्गेज विनरगोल्ड हा जर्मन-रशियन नागरिकआणि पेशाने इलेक्ट्रिशियन होता. याच तरुणाने हा बॉ*म्बस्फो*ट घडवून आणला होता, आणि त्यानेच ती खोटी पत्रंही ठेवली होती .टीमच्या हॉटेलमध्येच रस्त्याच्या बाजूला खिडकी असलेलीच खोली त्याने घेतली होती, आणि तिथूनच रिमोटच्या साहाय्याने त्याने हा स्फोट घडवून आणला होता.
आधीच सांगितल्याप्रमाणे बोरुसिया डॉर्टमण्ड हा एकमेव स्टॉक एक्सचेंजवर एनलिस्टेड असणारा फुटबॉल संघ होता. २०१७ पर्यंत या संघाला स्टॉक एक्सचेंजवर असल्याने १५.२ करोड डॉलर्सचा फायदा झाला होता.
ह*ल्ल्याच्या दिवशीच विनरगोल्डने ६०,००० पुट ऑप्शन्स खरेदी केले. या प्रकारचे स्टॉक्स म्हणजे कम्पनीच्या विरुद्ध खेळलेला जुगार असतो, म्हणजे तुम्ही कम्पनीच्या शेअरची किंमत कमी होईल याचा अंदाज आधीच लावून सट्टेबाजी करता.
डॉर्टमण्डचे ६०,००० पुट ऑप्शन्स खरेदी केले गेले आहेत हे एका ऑस्ट्रियन गुंतवणूकदार आणि डॉर्टमण्डच्या चाहत्याला लक्षात आलं आणि त्याने तसं त्या क्लबला कळवंलही! द*हश*तवादी ह*ल्ल्यासारखं काहीतरी अनपेक्षित घडल्याशिवाय प्राईज इतकी खाली जाणारच नाही. ह*ल्ल्यानंतर जर ती किंमत शून्यावर आली असती तर विनरगोल्डला ६ लाखाचा फायदा झाला असता. संध्याकाळी ७ वाजता ह*ल्ला केल्याने विनरगोल्डला पुढच्या दिवशी मार्केट उघडल्यानंतर मोठ्या फायद्याची अपेक्षा होती, पण तस घडलंच नाही, आणि डॉर्टमण्ड टीमच्या शेअरची प्राईज फक्त २ टक्क्यांनी खाली आली होती, जी लवकरच सुस्थितीला आली.
विनरगोल्डचा अंदाज चुकीचा ठरला, शिवाय त्याला २० ह*त्यांचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली १४ वर्षे कारावासाची शिक्षा झाली. सुदैवाने या ह*ल्ल्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही, पण त्या दिवशी ठरलेली मॅच पुढे ढकलण्यात आली, शिवाय डॉर्टमण्डच्या प्लेयर्सवर त्या ह*ल्ल्याचे परिणाम झाले.
मार्क बर्ट्रा म्हणतो, “माझा मृत्यूजवळ आलाय असं मला वाटत होतं आणि मी परत कधीही माझ्या कुटुंबाला पाहू शकणार नाही अशी भीती मला वाटत होती”, मॅथिस गिंटर म्हणतो “मला आता फुटबॉल मधून निवृत्ती घ्यावी लागेल असं मला काही क्षणासाठी वाटलं”. या नंतर बर्ट्रा आणि गिंटर यांनी डॉर्टमण्डच्या टीमला कायमचा राम-राम ठोकला.
एकाच्या आर्थिक फायद्याच्या अंदाजामुळे डॉर्टमण्ड संघाला एवढं मोठं नुकसान सहन करावं लागलं, काही जर्मन अधिकाऱ्यानी या ह*ल्ल्याला “आर्थिक लोभामुळे केला जाणारा द*हश*तवाद” म्हणून संबोधलं तर काही अधिकाऱ्यांनी याला “नफ्यासाठी केला गेलेला द*हश*तवाद” असंही संबोधलं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.