आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कोरोनामुळे आपण जवळजवळ हॉलिवूडच्या चित्रपटातलं जग जगतोय. Lockdown, Quarantine हे शब्द याआधी आपण फक्त चित्रपटातच ऐकले होते. पण आता हे आपल्यासमोरचं वास्तव आहे. या लॉकडाऊनमध्ये तुम्ही घरी बसून मनोरंजनासाठी काही ऑनलाइन शोधत असाल तर आमची ही यादी आधी बघा.
यात आम्ही कोरोनासारख्याच जीवघेण्या विषाणूंच्या संसर्गामुळे उदभवणाऱ्या गंभीर समस्यावर आधारित चित्रपटांची यादी देतोय.
Outbreak
१९९५ साली ‘Outbreak’ नावाचा चित्रपट खूप गाजला. यात होतं असं की आफ्रिकेत एका आजाराची उत्पत्ती होते आणि तिथून एक माकड अमेरिकेत तो आजार घेऊन येतं. या माकडांची नंतर काही चोरांकडून विविध जागी विक्री होते आणि आजार पसरू लागतो.
ही सगळी जीवघेणी परिस्थिती नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या शास्त्रज्ञांबद्दलची ही कथा आहे.
‘Carriers’
हा २००९ साली प्रदर्शित झालेला चित्रपट अलेक्स आणि डेव्हीड पास्तोर यांनी दिग्दर्शित केलाय. एका आजाराच्या वाढलेल्या प्रदूर्भावामुळे प्रलय सदृश्य परिस्थिती येते, त्यानंतरच्या काळात या चित्रपटाची कथा सुरू होते. या परिस्थितीत चार मित्र या महामारीपासून स्वतःला वाचवायला एका दुर्गम भागात निघून जातात, पण हे संकट त्यांना तिथेही शोधत येतंच. याबद्दलचा हा हॉरर प्रकारातला सिनेमा आहे.
Train to Busan
२०१६ साली Train to Busan हा दक्षिण कोरियाचा चित्रपट जगभर खूप प्रसिद्ध झाला. कारण हा फक्त टिपिकल झोंबि सिनेमा नसून ही एका लहान मुलीची आणि तिच्या वडिलांची कहाणी आहे. झोंबिज्-चा पादुर्भाव वाढत असताना हे दोघे बुसानला जाणाऱ्या रेल्वेत बसतात, पण रेल्वेतसुद्धा हा धोका वाढतच जातो. ते दोघे सुरक्षित बुसानला पोहोचतील का? याबाबद्दलची ही कहाणी.
It comes at night
जगभर पसरलेल्या महामारीत (Pandemic) जगातील बहुतांश लोकसंख्येचा विनाश होतो. पण “it comes at night” या चित्रपटात त्या महामारीच्या उगमच्या कारणाबद्दल न बोलता त्यानंतर मानवी स्वभावात होणाऱ्या टोकाच्या बदलांविषयी सांगितलंय. एक परिवार या सगळ्यातून सुरक्षित असतो, त्यांना दुसरा एक परिवार मदत मागायला येतो, तेव्हा काय होतं? असा साधारणतः या चित्रपटाचा प्लॉट आहे.
World War Z
World War Z हा सिनेमा ब्रॅड पिटमुळे सुप्रसिद्ध झाला. कुठल्याश्या आजारामुळे लोक झोंबी बनतात आणि इतर लोकांनाही चावून स्वतःसारखं अर्धंमेलं करतात. नायकाचा परिवार सुरक्षित ठेवण्याच्या अटीवर त्याला या आजाराचं निदान शोधायच्या मोहिमेवर पाठवतात. हा सिनेमा या प्रकारच्या गोष्टींना खूप मोठ्या पातळीवर घेऊन जातो, यातल्या दृश्यांचं ॲनिमेशन उत्तम झालंय.
93 Days
’93 Days’ हा नायजेरियातला चित्रपटात ‘इबोला’ च्या प्रदूर्भावाबद्दल आहे. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसलेल्या देशात आरोग्य सुविधा व्यवस्थित नसतांना तिथल्या लोकांनी या रोगाशी दिलेली लढाई या चित्रपटात अधोरेखित केली आहे. सगळी परिस्थिती खूपच वास्तववादी दाखवण्यात निर्मात्यांना यश आलंय.
Here Alone
Here Alone या चित्रपटात Aan नावाची तरुणी एका जंगलात एका छोट्या जागी राहत असते. संपूर्ण जगातील बहुतांश लोक आजाराने ग्रस्त होऊन मृत्यू पावतात आणि काही झोंबि म्हणून खाण्याच्या शोधात फिरत असतात. Aan जवळचं सठवलेलं सामान संपतं आणि त्यामुळं तिला तिथून बाहेर पडावं लागतं. तिथून पुढे हा चित्रपट वेग घेतो.
अशा चित्रपटांना Post-apocalyptic प्रकारात वर्गीकृत केलं जातं. हा जॉनर दिवसेंदिवस प्रसिद्ध होतोय. याच प्रकारात Mad Max Furry Road चित्रपट पण मोडतो जो फक्त लोकांमध्येच प्रसिद्ध नाही झाला तर ऑस्कर सहित अनेक पुरस्कार पण मिळवले.
या चित्रपटांमुळे प्रलयकारी संकट या मानवी कल्पनेचं आणि वैज्ञानिक तथ्यांचं स्पष्ट रूपच आता आपण बघू शकतो. ते बघायला पृथ्वीवर कोण शिल्लक असेल माहीत नाही पण, हे चित्रपट काही काळ आपल्याला त्या विश्वात घेऊन जातात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.