आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
१९३०-४० च्या दशकात संपूर्ण युरोप यु*द्धाच्या ढगांनी काळवंडून गेला होता. हि*टल*र आणि मित्रराष्ट्रांच्या संघर्षात अमेरिका वगळता कोणत्याही देशात शांतता नव्हती. सर्व युरोपीय राष्ट्रांची आर्थिक घडी विस्कटली होती आणि आपापल्या परीने यु*द्धाच्या सावटामध्येच प्रत्येक राष्ट्र आपली अर्थव्यवस्था सावरत होता. यु*द्धाच्या काळात एका पक्षाने दुसऱ्या पक्षावर आक्र*मण करून लुटपाट करणे हे साहजिकच आहे.
यु*द्धाच्या दरम्यान ना*झींनी १९३९ साली झेकोस्लोव्हाकियावर आक्र*मण करून तिथे सत्ता प्रस्थापित केली. या आक्र*मणानंतर बँक ऑफ इंग्लंडने ना*झींनी चोरलेले सोने विकण्यास मदत केली होती.
ना*झींनी लुटलेले सोने जर्मनीच्या रिच बँकेच्या वतीने बँक ऑफ इंग्लंडने विकले होते हे १९५० मधील एका दस्तऐवजानुसार सिद्ध होते. बँक ऑफ इंग्लडच्या संग्रहालयाच्या डिजिटलकरणातून सार्वजनिक करण्यात आलेल्या तपशिलांमधून ही बाब समोर आली आहे.
१९३९ साली ब्रिटन सरकारने लंडनमध्ये असलेल्या सर्व झेक मालमत्ता सीझ केल्या असल्याचं स्पष्ट केलं होतं, पण त्यावेळी लुटलेलं सोनं मात्र अजूनही बाजारात आहे. १९३८ साली जर्मनी, इटली, ब्रिटन आणि फ्रान्सने म्युनिक करारावर स्वाक्षरी केली. या कराराद्वारे झेकोस्लोवाकियाने आपले सीमाक्षेत्र आणि सरंक्षण साधने ना*झी जर्मनीला सोपवली पाहिजे होती. या कराराचं पालन न झाल्याने ना*झी जर्मनीने ऑक्टोबर १९३८ साली झेकोस्लोव्हाकियाच्या सीमाक्षेत्रावर आणि त्यानंतर १९३९ साली संपूर्ण झेकोस्लोवाकियावर ताबा मिळवला.
बँकेच्या म्हणण्यानुसार, झेकोस्लोव्हाकियामधील यु*द्धाच्या वेळी आणि यु*द्धानंतरही काही काळासाठी या सोन्याला विशेष महत्त्व देण्यात आले होते. बँक ऑफ इंग्लंड आणि ब्रिटिश सरकार यांच्या व्यतिरिक्त त्यावेळी बॅंकने घेतलेल्या भूमिकेचे कोणीही समर्थन केले नाही याउलट बॅंकने केलेल्या कामांबद्दल मोठ्या प्रमाणात गैरसमज झाला.
पण कागदपत्रांनुसार काही वेगळाच इतिहास समोर येतो. मार्च १९३९ साली बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सने बँक ऑफ इंग्लडला ५६ लाख युरोज किमतीच्या सोन्याचे स्थलांतर ‘झेक नॅशनल बँक’च्या खात्यातून जर्मनीच्या रिच बँकच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले होते. रिच बँकच्या खात्यातही आधीपासून काही प्रमाणात सोने होते. पण तसं न होता ४० लाख युरोज किमतीचे सोने बेल्जीयम आणि हॉलंडच्या खात्यात जमा झाले. उर्वरित सोनं लंडनमध्ये विकलं गेल्याचं समोर आलं आहे. जून १९३९ साली बँक ऑफ इंग्लंडने त्या सोन्याचा काही भाग ना*झी जर्मनीसाठीही विकला. या गोष्टी उपलब्ध अधिकृत कागदपत्रांमधून सिद्ध झाल्या आहेत.
बँक ऑफ इंग्लंडच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेला बँकचा इतिहास १९५० साली लिहून पूर्ण झाला. त्यानुसारही ब्रिटिश सरकारच्या संमतीची वाट न पाहता आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमट्सच्या दबावाखाली येऊन बँक ऑफ इंग्लंडने ना*झींच्या वतीने हे सोने विकले.
या लिखित इतिहासानुसार, “मार्च १९३९ नंतर १ जून १९३९ रोजी सोन्याचा व्यवहार झाला. ४ लाख ४० हजार युरोज इतक्या किमतीचे सोने विकले गेले आणि ४ लाख २० हजार किमतीचे सोने न्यू यॉर्कला बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सच्या १९ क्रमांकाच्या खात्यातून पाठवण्यात आले. हे तेच सोने होते जे जर्मनीच्या रिच बँकने लंडनला पाठवले होते, पण यावेळी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बँक ऑफ इंग्लंडने हे प्रकरण चान्सलरला कळवले.”
चान्सलरने याबद्दल दरबारातील कायदे अधिकाऱ्यांचं मत जाणून घेतले. बीआयएसच्या चौकशीत विलंब कशामुळे होत आहे?, असं विचारत आणि दुसऱ्या दिवशी सोनं पाठवल्याने गैरसोय होईल असे सांगून बँक ऑफ इंग्लंडने कायदे अधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार कार्य केले.
तत्कालीन गव्हर्नर मोंटागू नॉर्मन यांच्याशी बोलत असताना तत्कालीन बँक ऑफ इंग्लडचे कुलपती जॉन सायमन कोणतीही गोष्ट स्पष्टपणे बोलत नव्हते. २६ मे रोजी चान्सलरने बँकच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला पत्राद्वारे “बँकेमध्ये झेकचं सोन अजूनही आहे काय?” अशी विचारणा केली, संसदेत उत्तर देण्यासाठी ही माहिती आवश्यक होती..
३० मे रोजी बँकच्या अधिकाऱ्याने लिहिलेल्या पत्रात या प्रश्नाचे उत्तर तर नव्हते, पण बँक ऑफ इंग्लंड, बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सचं सोनं वेळोवेळी आपल्याकडे ठेवते, पण ते सोनं त्यांचं आहे अथवा त्यांच्या ग्राहकांचं आहे याची माहिती नसल्याचं त्यांनी नमूद केलं. यामुळेच बँक ऑफ झेकोस्लोवाकियाचं सोनं त्यांच्याकडे आहे अथवा नाही हे कोणीही स्पष्टपणे सांगू शकले नाहीत.
बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सच्या प्रतिष्ठेवर या प्रकरणाचा मोठा परिणाम दिसून आला. बँक ऑफ इंग्लडच्या भूमिकेकडे जगाने जाणीवपूर्वकरित्या किंवा नकळतपणे का होईना पण दुर्लक्ष केले होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.