दहा वर्षानंतर का होईना पण अमित शहांनी आपल्या अटकेचा बदला घेतलाच

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


माजी गृहमंत्री पी चिदंबरम काही महिन्यांंपूर्वी एका गैरव्यवहाराच्या प्रकरणात जेलमध्ये जाऊन आले. ज्यावेळी त्यांना तुरुंगात घेऊन जात होते, त्यावेळी भाजपा समर्थक अमित शहांच्या अटकेशी त्याची तुलना करत होते. असं म्हणतात अमित शहांना तुरुंगात टाकण्यात आणि गुजरातमधून तडीपार करण्यात चिदंबरम मोठा हात होता.

चिदंबरम यांना झालेल्या अटकेनंतर भाजपा समर्थकांनी दावा केला होता की आज त्यांना त्यांच्या कर्माची फळे मिळाली आहे. यावेळी भाजपा समर्थकांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला होता, जो अमित शहा २०१२ मध्ये गुजरातमध्ये परतल्यावर शूट करण्यात आला होता.

भाजपा समर्थक असा दावा करतात कि अमित शहानी २०१२ मध्ये त्यांच्या व्हिडिओत जो शेर म्हटला होता तो चिदंमबरम यांच्याशी संबंधित होता. हा व्हिडीओ आणि त्यामागचे संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊ ..

९ -१० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, देशात युपीए २ चा शासन काळ सुरु होता. चिदंबरम त्यावेळी गृहमंत्री होते. २००८ साली झालेल्या मुंबई आतंकवादी हल्ल्यांनंतर शिवराज पाटील यांना बाजूला करून चिदंबरम यांच्या गळ्यात गृहमंत्रीपद पडले होते.

त्यावेळी सोहराबुद्दीन शेख एन्काउंटरचा खटल्यात सीबीआयने अमित शहा यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.

२५ जुलै २०१० ला अमित शहा यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. या अटकेच्या काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी भाजपा कार्यलयात एक पत्रकार परिषद घेतली होती, यात त्यांनी दावा केला होता कि त्यांना सोहराबुद्दीन खटल्यात गोवले जात आहे आणि त्यांच्यावर राजनीतीने प्रेरीत हल्ले चढवले जात आहे. ते हे देखील म्हणाले होते कि हे प्रकरण न्याय पालिकेत टिकाव शकणार नाही.

सीबीआयने ज्यावेळी शहांच्या विरोधात अटक वॉरंट काढले तेव्हा शहा चार दिवस बेपत्ता होते. २९ ऑक्टोबर २०१० ला त्यांना जामीन मिळाला. परंतु जामीन मिळाल्या नंतर देखील त्यांच्या गुजरात वापसीवर बंदी आणण्यात आली.

अमित शहा २ वर्षे गुजरात पासून लांब होते. २०१२ च्या गुजरात निवडणुकी पूर्वी त्यांना गुजरातला परतण्याची परवानगी मिळाली. ते गुजरातला परतले आणि त्यांनी एका प्रेस मिटिंगची घोषणा केली, या मीटिंगमध्ये त्यांनी एक शेर म्हटला होता:-

मेरा पानी उतरता देख
किनारे पर घर मत बना लेना
मैं समंदर हूं
लौटकर जरूर आऊंगा

त्या मीटिंगमधील हा शेर म्हणतानाचा व्हिडीओ भाजपा समर्थकांनी चिदंमबरम यांच्या अटकेवेळी व्हायरल केला होता. भाजपा समर्थकांचा असादावा होता की चिदंबरम यांनी अमित शहांच्या विरोधात रचलेल्या राजकीय षडयंत्राचे फळ त्यांना मिळत आहे.

चिदंबरम यांना जेंव्हा अटक करण्यात आली आणि सीबीआयने त्यांची कस्टडी घेत मनी लौन्ड्रींग प्रकरणात त्यांची कसून चौकशी केली होती. त्यांना अटक करण्याच्या वेळी देखील खुप मनोरंजक घटनाक्रम घडून आला होता. त्यावेळी काँग्रेस समर्थकांनी दावा केला होता की भाजपा हा पक्ष यासाठी जबाबदार असून अमित शहा सुडाचे राजकरण खेळत आहे.

त्या काँग्रेस समर्थकांना उत्तर देण्यासाठी भाजपा समर्थक अमित शहांचा जुना व्हिडीओ व्हायरल करत होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!