१९७१च्या भारत-पाक युद्धात अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीसाठी युद्धनौका पाठवली होती

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


१९७१. हे वर्ष भारतीय, पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांसाठी कायम लक्षात राहणारं वर्ष आहे. याच वर्षी पाकिस्तानच्या भौगोलिक रचनेचा एक भाग असलेल्या पुर्व पाकिस्तानचे विभाजन करुन त्याला बांगलादेश नाव देण्यात आले.

पाकिस्तानाचे विभाजन करून बांगलादेशची निर्मिती करण्याची ही प्रक्रिया तितकीशी सोपी नक्कीच नव्हती. या प्रादेशिक मुद्द्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते.

पुर्व पाकिस्तान हा बांगलाभाषिक लोकांचा समुह होता. तर पश्चिमी पाकिस्तानमध्ये या भाषेचा वापर केला जात नसे. बहुमतामध्ये असणाऱ्या पश्चिम पाकिस्तानचा प्रभाव तेथील राजकारणावर होता. त्यामुळे पुर्व पाकिस्तानला संसदेत  प्रतिनिधित्व नव्हतं म्हणुन या भागाचा विकास कमी होत होता. परिणामी पुर्व पाकिस्तानमधल्या लोकांचा पश्चिम पाकिस्तानी लोकांवर असलेला राग अजुनच वाढत गेला.

तसेच पाकिस्तानमध्ये त्यावेळी फारकतीचं (फाटाफूटी) राजकारण सुरु झालं होतं. याला दाबवण्यासाठी पुर्व पाकिस्तानने सैनिकी ताकदीचा वापरही केला. पण त्यामुळे तेथील जनतेमध्ये असलेल्या द्वेषाला अजुन खतपाणीच मिळालं. या द्वेषामुळे सुरु झालेल्या विद्रोहास दाबून टाकण्यासाठी पुर्व पाकिस्तानने अजुन सैनिकी कारवाया केल्या.

अशा परिस्थितीत भारताचा ताण वाढत होता. पुर्व पाकिस्तानमधून भारतात अवैधपणे येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत होती. बंगाली शरणार्थी भारतात वाढतच चालल्याने तत्कालिन पंतप्रधान असलेल्या मा. इंदिरा गांधी यांच्यावर दबाव वाढत होता. म्हणुन त्यांनी तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांना पुर्व पाकिस्तानमधील बिघडत्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. अशा वेळी भारत पाकिस्तानवर हल्ला करु शकतो असा अंदाज रिचर्ड निक्सन यांना आला होता.

अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात असलेल्या सेंटो आणि सिएटो या करारांमुळे अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात चांगले संबंध होते. आणि भारताने पाकिस्तानला हरवलं तर भारताच्या मदतीने रशिया आशिया खंडात आपल्या वर्चस्वाला आव्हान देईल अशी भिती अमेरिकेला होती.

२८ मार्च, १९७१ ला अमेरिकेच्या राज्य सचिवास एक पाकिस्तानी पत्र मिळाले. पुर्व पाकिस्तान मधील बिघडती परिस्थिति आता आवाक्याबाहेर जात आहे अशा आशयाचं हे पत्र होतं. या पत्रामुळे भारत-पाकिस्तानमध्ये होणाऱ्या युध्दाची खात्री झाल्यानंतर अमेरिकेने चीनला सोबतीला  घेण्याचे प्रयत्नही चालु केले.

भारताला या मुद्द्यावरुन घेरण्याचा अमेरिका प्रयत्न करत आहे या बाबीची पुसटशिही कल्पना त्यावेळी भारताला नव्हती म्हणुनच बंगाली शरणार्थीची परिस्थिती सुधरवण्यासाठी इंदिरा गांधी यांनी रिचर्ड निक्सन यांच्याकडे मदतीची मागणी केली. त्यावेळी निक्सन यांनी कुठल्याही प्रकारची मदत करण्यास नकार दिला आणि मग भारतापुढे युध्दाचा एकमेव पर्याय उरला होता.

दिवसेंदिवस भयानक होत चाललेल्या परिस्थितीमुळे भारताने आपल्या पुर्वसीमेवर बंगालच्या खाडीत एक युध्दनौका तैनात केली. भारताने हमला करण्याच्या आधीच पाकिस्तानने ३ डिसेंबरच्या रात्री भारतावर हमला केला. प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यानेही युध्दाचे रणशिंग फुंकले.

अमेरिकेला याची खबर कळताच पाकिस्तानला मदत म्हणुन अमेरिकेने आपली युध्दनौका यु.एस. एस. एंटरप्रायझेस बंगालच्या खाडीकडे रवाना केली. आपल्या युध्दनौकेने अमेरिका भारतास शरणागती पत्करण्यास भाग पडेल असा अंदाज त्यावेळी अमेरिकेने लावला.

१० डिसेंबरला रिचर्ड निक्सन यांचा एक संदेश भारतीय गुप्तचर खात्याने पकडला, ज्यामध्ये ७५००० टन आण्विक शक्ती असलेला यु. एस. एस. एंटरप्रायझेस नावाची युद्धनौका आपल्या ठरलेल्या जागेवर पोहचल्याची माहिती होती. याला उत्तर देण्यासाठी भारताने आपली विक्रांत ही युध्दनौका समोर आणली. भारतीय शहरं आणि अमेरिकेच्या यु.एस.एस. एंटरप्रायझेस मध्ये आता फक्त विक्रांत ऊभी होती.

त्याच वेळी सोवियत गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटिश युध्दनौका ईगल भारतीय उपखंडाकडे दाखल होत होती. अशा वेळी डगमगुन न जाता समर्थपणे विरुध्द देशांचा सामना करण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांनी घेतला. भारत-रशियामध्ये असलेल्या करारानुसार इंदिरा गांधी यांनी रशियाकडे मदत मागितली.

१३ डिसेंबरला रशियन नौसेनाधिपती ब्लदीमीर करुपलयाकोव्ह यांच्या नेतृत्वाखाली सोवियत संघाने आण्विक हत्यारांनी भरलेली एक युध्दनौका आणि पानबुडी पाठवली.

आपलं अस्तित्त्व दर्शविण्यासाठी पानबुडीला भारतीय महासागराच्या जवळ ठेवण्यात आले जेणेकरुन भारत एकटा नसल्याची जाणीव विरोधकांना व्हावी. रशियाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे ब्रिटिश युध्दनौका आल्या वाटेनेच परत गेली. त्याच बरोबर अमेरिकेनेही आपली युध्दनौका परत बोलवून घेतली.

अशावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एका कागदपत्रास मान्यता मिळवून दिली. आणि पुर्व पाकिस्तान हा एक वेगळा देश बनवण्याच्या आपल्या योजनेस वेग आणला. पुर्ण ताकदीने हमला करुन भारतीय सैनिक लाहोरमार्गे पाकिस्तानात घुसले.

कमकुवत असलेल्या बचाव फळीमुळे १४ डिसेंबरला पाकिस्तानचे सैन्यसचिव ए.ए.के. नियाजी यांनी ढाका येथे असलेल्या अमेरिकी मुख्यालयास शरणागती पत्करण्याची इच्छा बोलुन दाखवली. ही गोष्ट वॉशिंग्टनला पोहचली आणि तिथुन दिल्लीला पोहचली. त्यानंतर भारतीय सैनिकांना थांबवण्यात आले आणि पाकिस्तानने आपली हार मान्य केली.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानंतर पुर्व पाकिस्तान हा वेगळा देश म्हणुन घोषित करण्यात आला, आणि त्याला बांगलादेश असं नाव देण्यात आले.

उदंड इच्छाशक्ती आणि योग्य धोरण असेल तर कितीही मोठ्या शत्रुचा पराभव केला जाऊ शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण. फक्त पाकिस्तान नाही तर अमेरिका आणि ब्रिटन यांसारख्या बलाढ्य राष्ट्रांनाही पाणी पाजता येतं हे या प्रसंगावरुन स्पष्ट होतं. दक्षिण आशियामधील बलाढ्य राष्ट्रांमध्ये भारताचं नाव दाखल करण्यात या प्रसंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे ही खरंच.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!