अफगाण स्नोवर लोकांनी घातलेला बहिष्कार खुद्द गांधीजींनी उठवायला लावला होता

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


फर्मास्युटीकल व फूड इंडस्ट्रीज नंतर जगात सगळ्यात जास्त मागणी असते ती सौंदर्य प्रसाधनांना. दिवसागणिक सौंदर्य प्रसाधनांची मागणी वाढते आहे. परिणामी बाजारात बरेच वेगवेगळ्या कंपन्यांनी आपले ब्रँड्स आणले.साहजिकच स्पर्धा वाढली. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपन्या वाट्टेल त्या थराला जातात.

घातक रसायनं वापरून आपल्या उत्पादनांमध्ये वापरून त्यात किती नैसर्गिक तत्व आहेत अशा खोट्या जाहिरातीपासून तर आम्ही तुमचा रंग, जी निसर्गाची देण आहे व काहीही केल्या त्याला बदलणे अशक्य आहे, तो रंग १००% उजळ करून दाखवू अशी कित्येक खोटी आश्वासने देण्यापर्यंत सगळ्या ट्रिक्स वापरल्या जातात.

ग्लोबलयझेशनच्या प्रभावामुळे व अशा खोट्या आश्वासनांमुळे नेस्तनाबूत झालेल्या एके काळी भारताचा नं १ सौंदर्य ब्रँडची हकीकत आज आपण पाहणार आहोत.

 १९१९-१९७०च्या काळात भारतीयांच्या पसंतीस उतरलेलं असंच एक उत्पादन म्हणजे अफगाण स्नो.

राजस्थान येथील तरुण उद्योजक इब्राहिम सुलतानली पाटनवाला यांचा अत्तर व सौंदर्य प्रसाधने बनवण्याचा बिझनेस होता. १९९१ साली जेव्हा अफगाणिस्तानचा राजा भारत दौऱ्यावर आला तेव्हा त्याने मुंबईतील उद्योजकांच्या एका मेळाव्याला भेट दिली.

तिथे इब्राहिम यांनी राजाला त्यांच्या उत्पादनांचे एक हॅम्पर भेट दिले तेव्हा त्यात एक नाव नसलेली पांढऱ्या क्रीमची बरणीसुद्धा होती. राजाने ही गोष्ट हेरली व त्याला “अफगाण स्नो” हे नाव सुचवले.

इब्राहिमला ते नाव अतिशय आवडले व खुद्द अफगाणिस्तानचा राजा नाव सुचवतो आहे म्हटल्यावर कोण नाही म्हणेल?

असं मिळालं अफगाण स्नोला त्याचं नाव.

अफगाण स्नो हे एक ऑल पर्पज क्रीम होते, ज्याचा वापर मेकप बेस, मॉइश्चरायझर आणि सन स्क्रीन म्हणूनही करता येत होता. ऑल इन वन क्रीम असल्याने ते मोठ्या प्रमाणावर विकले जाऊ लागले.

इब्राहिम पाटनवाला त्यांच्या क्रीमशिवाय त्यांनी आयोजित करत असलेले बॉल्स व दैदिप्यमान पार्टीजसाठी पण प्रसिद्ध होते. राज कपूर, नर्गिस यांसारखे सिनेकलावंत, बरेच मोठे उद्योजक या पार्ट्यांना आपली हजेरी लावत. या पार्टीज अगदी बघण्यासारख्या असायच्या.

अफगाण स्नो अनेक कार्यक्रम आणि सौंदर्य स्पर्धासुद्धा आयोजित करत. १९५२ साली मुंबईत झालेल्या मिस इंडिया स्पर्धेचे प्रायोजक पण अफगाण स्नोच होते.

त्या काळात अफगाण स्नोची मार्केटिंगची पद्धतही अतिशय सरळ मार्गी होती ज्यात हे क्रीम कोणतेही त्वचा उजळवणारे क्रीम नसून, फक्त आणि फक्त धूळ, माती, ऊन व बाहेरील प्रदूषणापासून तुमच्या कोमल व नाजूक त्वचेची निगा राखण्याचे एक प्रसाधन आहे हेच सांगितले जाई.

हे क्रीम स्वदेशी असूनही, फक्त पॅकेजिंगसाठी वापरलेल्या बाटल्या विदेशी असल्याने स्वदेशी चळवळीत लोकांनी या क्रीमवर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा इब्राहिम पाटनवाला यांनी त्वरित गांधीजींची भेट घेऊन त्यांना मदत करण्याची विनंती केली.

त्यावेळी गांधीजींनी लोकांना हे उत्पादन संपूर्णपणे स्वदेशी असून त्याचा वापर करण्यावर बहिष्कार टाकू नका अशी विनंती केली आणि लोकांनी अफगाण स्नो पुन्हा एकदा वापरणे सुरू केले.

पण म्हणतात ना काळानुसार बदलणे आवश्यक असते. आपले प्रतिस्पर्धी कोणत्या युक्ती वापरतात आहे, त्यांच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत हे दुर्लक्षित करून चालत नाही. ६०-७० च्या काळात होणाऱ्या ग्लोबायझेशनमुळे भारताची बाजारपेठ बऱ्याच आंतरराष्ट्रीय मल्टी नॅशनल कंपन्यांसाठी खुली करण्यात आली.

या कंपन्या इंटरनॅशनल ब्रँड्स स्पर्धा करणे अफगाण स्नोला बरेच कठीण जाऊ लागले.

अशातच हिंदुस्तान लिव्हरने फेयर अँड लव्हली नावाचे सौंदर्य प्रसाधन बाजारपेठेत आणले. त्यांनी या क्रीमने रंग उजळू शकतो अशी स्ट्रॅटेजी केल्यामुळे अफगाण स्नो इतक्या वर्षांपासून जोडून ठेवलेल्या ग्राहक समुदायाला गमावून बसले.

E.S. Patanwala pvt. Ltdचे संचालक अश्रफ दलाल यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही आमच्या प्रॉडक्टचा खप वाढवण्यासाठी कधीच लोकांच्या भावनांशी खेळ केला नाही. पण या मल्टीनॅशनल कंपन्यांनी भारताच्या मुळ काळया स्किन टोनला नकारात्मक पद्धतीने लोकांसमोर मांडणे सुरू केले व त्यांच्या मनात त्यांच्या रंगामुळे न्यूनगंड निर्माण केला.

आपले प्रॉडक्ट कसे त्यांना गोरे बनवेल हे सांगू लागले. अफगाण स्नो नेहमीच प्रत्येक स्किन टोनचा आदर करत आपले मार्केटिंग करायचे. लोकांच्या मनात रंगावरून भेद निर्माण करण्याच्या या त्यांच्या ट्रिकसमोर आमची सरळमार्गी स्ट्रॅटेजी फेल गेली.”

१९७० पर्यंत अत्यंत लोकप्रिय असलेला त्यांच्या तुलनेत आमचा छोटा ब्रँड अचानक त्यांचा नावडता ब्रँड होऊन गेला व त्यांनी आपली निवड बदलली.

भारतीय लोकांच्या मनातील काळ्या रंगाला एखाद्या जीवघेण्या रोगाप्रमाणे लोकांच्या मनात भरवण्यात हिंदुस्तान लिवर, इमामी, गार्नियर इत्यादी या ब्रँड्सचा मोठा हात आहे.

यालाच रोखण्यासाठी एक वेगळा कायदा आणावा लागला ज्या अंतर्गत कोणत्याही सौंदर्य प्रसाधनांच्या ऍडमध्ये रंग भेद आढळल्यास ५० लाखांपर्यंत भुर्दंड व कमीत कमी ५ वर्षांचा कारावास ही शिक्षा ठेवण्यात आली.

तर असे हे लोकप्रिय असलेले व स्वतः गांधीजींनी इंडोर्स केलेले अफगाण स्नो हे स्वदेशी सौंदर्य उत्पादन आपल्या साफ मार्केटिंग व क्वालिटीमुळे भारताचे नं. १ सौंदर्य प्रसाधन बनले होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!