The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

या चोऱ्यांच्या पुढे मनी हाईस्ट पण फिकं पडेल!

by द पोस्टमन टीम
20 March 2022
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


लुटमार झाल्याची एखादी-दुसरी बातमी दररोज आपल्या कानी पडत असते. जर तुम्ही बातम्यांचे शौकीन नसाल तर, निदान स्पॅनिश क्राइम थ्रिलर ‘मनी हेईस्ट’बाबत नक्कीच तुम्ही ऐकलं असेल. तुमच्यापैकी अनेकांनी ही सीरिज पाहिलीदेखील असेल. बँकेवर दरोडे टाकताना नेमक्या काय घडामोडी घडू शकतात याची झलक मनी हेईस्टमधून आपल्याला दिसली. मनी हेईस्टप्रमाणाचं आपल्याकडील ‘धूम’ चित्रपटाच्या सिक्वल्समधून, हुशारी वापरून चोरीच्या प्लॅन्सला कशाप्रकारे तडीस नेलं जातं, हेही आपण पाहिलेलं आहे.

मनी हेईस्ट सीरिज आणि धूम चित्रपट दोन्हीही फिक्शनल घटना आहेत. मात्र, अशा मोठ्या आणि महत्त्वकांक्षी चोऱ्या खरोखर होतात का? असा प्रश्न मला मनी हेईस्ट पाहिल्यानंतर पडला होता. या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला जगभरातील काही भन्नाट चोरीच्या घटना माहिती झाल्या. यापैकी बहुतेक घटना या बँक दरोड्याच्या आहेत.

या दरोड्यांतील रक्कम पाहून आपल्यासारख्याचे डोळेच पांढरे होतील इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे लंपास झालेले आहेत. आजच्या या लेखामध्ये आपण जगातील दहा सर्वात मोठ्या चोरीच्या घटनांची माहिती घेणार आहोत…

लेबनॉनची राजधानी बिरूतमध्ये ‘ब्रिटिश बँक ऑफ मिडल ईस्ट’ नावाची बँक आहे. २० जानेवारी १९७६ रोजी या बँकेवर मोठा दरोडा पडला. या दरोड्यादरम्यान, २५ मिलीयन डॉलर्सची चोरी झाली होती. 

१९७०च्या दशकात यासर अराफात यांच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनचं एकत्रीकरण झालं होतं. पॅलेस्टिनी लोकांसाठी मातृभूमीचा पाया घालणं हे त्यांचं उद्दीष्ट होतं. त्यासाठी युद्धाची भूमिका घेण्यात आली होती.

आता आपल्याला माहितीच आहे युद्धासाठी प्रचंड पैशाची आवश्यकता असते. नेमकं त्याचवेळी लेबनॉनमध्ये सिव्हील वॉर सुरू होतं. या अनागोंदीचा फायदा घेत पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनसंलग्न गटानं तेथील १२ बँकांमध्ये चोऱ्या केल्या होत्या.

त्यापैकी ‘ब्रिटिश बँक ऑफ मिडल ईस्ट’ ही सर्वात मोठी बँक होती. या बँकेत एकूण २५ मिलीयन कमतीची चोरी झाली होती. ज्याचं मुल्य आज १०० मिलीयन डॉलर्सपेक्षाही जास्त आहे. 

हे देखील वाचा

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

चोरांच्या या गटानं बँकेच्या शेजारी असणाऱ्या कॅथोलिक चर्चच्या भिंतीला भगदाड पाडलं आणि काही कॉर्सिकन लॉकस्मिथच्या मदतीनं तिजोरी उघडली. त्यानंतर चक्क दोन दिवस बँकेतील पैसा बाहेर वाहून नेला जात होता आणि बँक प्रशासनाला याचा गंधही नव्हता. या चोरीमुळं त्यावेळी मोठी खळबळ माजली होती.

‘ब्रिटिश बँक ऑफ मिडल ईस्ट’मधील दरोड्याच्या चार वर्षांपूर्वी अमेरिकेतदेखील अशीच जबरी चोरी झाली होती. कॅलिफोर्नियातील ‘युनायडेट कॅलिफोर्निया बँके’मध्ये २४ मार्च १९७२ रोजी मोठी चोरी झाली होती. या चोरीमध्ये एकूण ३० मिलीयन डॉलर्स लंपास झाले होते.

३० मिलीयन डॉलर्स ही रक्कम सध्याच्या काळात फार जास्त वाटत नाही. परंतु त्यावेळी ही रक्कम खूपच मोठी होती. जर महागाई विचारात घेतली तर सध्याचं मुल्य १०० मिलीयन डॉलर्सपेक्षा जास्त असू शकतं. विशेष म्हणजे त्यावेळी हा चोरीचा विश्वविक्रम होता.

अमिल डायोनिसियो नावाच्या म्होरक्याच्या नेतृत्वाखाली ओहायो येथील सात जणांच्या टोळीनं कॅलिफोर्नियातील लागुना निगुएल येथील युनायटेड कॅलिफोर्निया बँकेच्या शाखेत घुसून बँकेची तिजोरी लुटली होती. मात्र, एफबीआयच्या कचाट्यातून त्यांना सुटणं त्यांना शक्य झालं नाही. काही दिवसातच सर्व चोर पकडले गेले. सात पैकी एक असलेल्या फिल क्रिस्टोफर यानं या दरोड्याबाबत ‘सुपर थीफ’ नावाचं पुस्तकही लिहिलेलं आहे.

१२ जुलै १९८७ रोजी इंग्लंडमधील नाइट्सब्रिज सिक्युरिटी वेअरहाऊसमध्ये आतापर्यंतची आठव्या क्रमांकाची मोठी चोरी झाली होती. या चोरीनं एक नवीन जागतिक विक्रम स्थापन केला होता. कारण, भूतो ना भविष्यती ९० मिलीयन डॉलर्स चोरीला गेले होते.

या चोरीचा मास्टरमाईंड असलेला व्हॅलेरियो विकी हा १९८६ मध्ये इटलीतून इंग्लंडमध्ये स्थलांतरित झाला होता. इटलीमध्ये त्यानं ५०हून अधिक सशस्त्र दरोडे टाकले होते. त्यामुळं तो अगोदरपासूनच पोलिसांच्या रडारवर होता. तरीदेखील त्यानं पुन्हा चोरी करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

इंग्लंडमध्ये एका साथीदारासह त्यानं एक तिजोरी भाड्यानं घेण्याच्या बहाण्यानं नाइट्सब्रिज सिक्युरिटी वेअरहाऊसच्या मुख्यालयात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तेथील व्यवस्थापक आणि गार्डवर हल्ला केला. व्हॅलेरियोनं इतर ग्राहकांना आतमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी वेअरहाऊस तात्पुरतं बंद केलं आणि स्वत:ची एंट्री तयार करून इतर साथीदारांना आतमध्ये येण्यास मार्ग करून दिला.

त्याच्या टोळीनं सुमारे ९० मिलीयन युएस डॉलर्सवर हात साफ केला होता. दरोडा पडल्यानंतर तासाभरानंतर पोलिसांना माहिती मिळाली त्यामुळं चोरट्यांना घटनास्थळावरून पळून जाण्यास पुरेसा वेळ मिळाला. मात्र, पोलिसांनी कसून तपास करत व्हॅलेरियोच्या साथीदारांना अटक करण्यात केली. व्हॅलेरिया दक्षिण अमेरिकेत पळून जाण्यात यशस्वी झाला होता. काही वर्षांनंतर तो इंग्लंडला परतला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याला २२ वर्षांच्या शिक्षा झाली. २००० मध्ये पोलिसांशी झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

२००८मध्ये पॅरिसमधील हॅरी विन्स्टनच्या मालकीच्या लक्झरी ज्वेलरी शॉपमध्ये चार बंदुकधारी घुसले. त्यापैकी तिघांनी महिलांचे कपडे घातले होते. बंदुकीच्या बळावर त्यांनी अवघ्या काही मिनिटांतच सगळे डिस्प्ले बॉक्स आणि तिजोरीही साफ केली होती. या दरोड्यामध्ये १०८ मिलीयन डॉलर्सचा मुद्देमाल चोरीला गेला होता.

या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी हॅरी विन्स्टनच्या कंपनीचा स्टॉक ९ टक्क्यांनी घसरले होते. २२ ते ६७ वयोगटातील एकूण २५ जणांना या दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.

१६ फेब्रुवारी २००३ रोजी बेल्जियममधील अँटवर्प सेंट्रल डायमंड सेंटरमध्ये तोपर्यंतची सर्वात मोठी चोरी झाली होती. जगातील ८० टक्के कट डायमंड अँटवर्पमधून इतरत्र जातात. त्यामुळं या शहराला दरोड्यांचा समृद्ध इतिहास आहे! परंतु, सेंट्रल डायमंड सेंटरमधील चोरी ही, रक्कम आणि चोरांनी वापरलेली पद्धत या दोन्ही गोष्टींमुळं वेगळी ठरली होती.

या चोरीमध्ये चोरट्यांनी तब्बल १२३ तिजोऱ्या लुटून नेल्या होत्या. लिओनार्डो नोटारबार्टोलो या ३० वर्षीय मास्टरमाईंडनं या दरोड्याची प्लॅनिंग करण्यासाठी अनेक वर्षे घालवली होती. त्याच्या प्लॅनमध्ये त्याच्यासह केवळ चार लोक सामील होते.

या चौघांनी मिळून तीन वर्षे अगोदर हिऱ्यांच्या तिजोऱ्या असलेल्या इमारतीत ऑफिससाठी जागा भाड्याने घेतली. लिओनार्डोने इतरांचा विश्वास संपादन करण्यासाठी स्वत: इटालियन हिरे व्यापारी असल्याचा बनाव केला. जेव्हा प्रत्यक्ष चोरी करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी त्यांचे ट्रॅक झाकण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बनावट टेप घातल्या.

विशेष म्हणजे हिऱ्यांच्या तिजोऱ्या इन्फ्रारेड हीट डिटेक्टर, डॉप्लर रडार, मॅग्नेटिक फिल्ड, सिस्मिक सेन्सर आणि १०० मिलीयन पॉसिबल कॉम्बिनेशन लॉकिंग सिस्टमसह १० स्तरांच्या सुरक्षा जाळ्यात ठेवण्यात आलेल्या होत्या. तरी देखील लिओनार्डो नोटारबार्टोलोच्या चांडाळ चौकडीनं ही सुरक्षा व्यवस्था भेदली.

ADVERTISEMENT

या दरोड्याला ‘थेफ्ट ऑफ द सेंच्युरी’ म्हटलं गेलं होतं. आरोपींनी ही चोरी नेमकी कशी केली हे पोलीस स्पष्ट करू शकलेले नाहीत. निओनार्डो नोटारबार्टोलाच्या एका साथीदाराने चूक केल्यामुळं त्यांना कालांतरानं पकडण्यात आलं. मात्र, त्यांनी चोरलेले हिरे आजपर्यंत सापडलेले नाहीत.

शिफोल विमानतळावरील चोरी ही इतिहासातील सर्वात मोठी हिरे चोरी मानली जाते. या चोरीमध्ये अंदाजे १२० दशलक्ष डॉलर्सची किमतीच्या हिऱ्यांची चोरी झाली होती. यातील बरेचसे हिरे पैलू पाडलेले नव्हते, याचा अर्थ त्यांची किंमत आणखी वाढली असती.

या दरोड्याच्या दोन आठवड्यांपूर्वी, चार लोकांनी KLM या डच एअरलाईनकंपनीच्या मालवाहू ट्रक आणि कर्मचाऱ्यांचे गणवेश चोरी केले. २५ फेब्रुवारी २००५ रोजी चोर थेट KLM ट्रकवर गेले. या ट्रमध्ये पैलू न पाडलेले हिरे असलेली मोठी तिजोरी अँटवर्पला जात होती.

हा ट्रकचं चोरांनी पळवून नेला. नेमका कोणता ट्रक पळवला पाहिजे, हे चोरांना माहीत असल्यानं एअरलाईनचे काही अधिकारी या चोरीमध्ये सहभागी असल्याचा संशय पोलिसांना होता. शिवाय विमानतळ टर्मिनलमध्ये सहा महिन्यांत दुसऱ्यांदा अशी घटना घडली होती..

१२ जुलै २००७ रोजी इराकच्या बगदादमधील एका बँकेवर मोठा दरोडा पडल्याचं निदर्शनास आलं होतं. दार एस सलाम बँकेचे कर्मचारी सकाळी कामावर आले असता त्यांना, दरवाजे आणि तिजोरी उघडी दिसली. याचाच अर्थ बँकेत चोरी झाली होती.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे बँकेतील तीन सिक्युरीटी गार्ड्सनी ही चोरी केली होती. या चोरीमध्ये २८२ दशलक्ष डॉलर्सची तिजोरी पळवून नेली होती. ही रक्कम एखाद्या लहान देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त होती. बगदादच्या आजूबाजूच्या सिक्युरिटी पॉईंट्सवर पकडलं जाऊ नये म्हणून चोरांनी काही मिलिशियाची (सैन्य) मदत देखील होती असा संशय आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे या प्रकरणात कोणालाही अटक झाली नाही.

अमेरिकेतील बोस्टनमधील गार्डनर म्युझियमध्ये झालेली ३०० मिलीयन डॉलर्सची चोरी १९९०पर्यंतची सर्वात मोठी चोरी होती. पोलीस अधिकार्‍यांच्या वेशात आलेल्या दोन चोरांनी गार्डनर संग्रहालयातील दोन नवीन गार्ड्सला चुना लावून आतमध्ये प्रवेश केला.

चोरांनी रक्षकांना बेड्या घालून संग्रहालयाच्या तळघरात बंद केलं. आश्‍चर्याची बाब म्हणजे कुठल्याही हत्याराचा वापर न करता या दोन चोरट्यांनी ८१ मिनिटांत निवांतपणे १२ कलाकृती निवडल्या ज्यांची किंमत ३०० दशलक्ष डॉलर्स इतकी होती. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीतील टेपदेखील काढून घेतल्या आणि पलायनं केलं.

चोरीला गेलेल्या पेंटिंग्समध्ये रेम्ब्रँड आणि वर्मीर यांच्या तीन चित्रांचा समावेश होता. अतिशय शांतपणे करण्यात आलेल्या या चोरीबाबत कुणाला सुगावादेखील नाही लागला. या प्रकरणाचं अजूनही निराकरण झालेलं नाही आणि चोरीला गेलेल्या कलाकृतीबद्दल माहिती देण्यासाठी अजूनही ५ दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस ठेवलेलं आहे.

२ मे १९९० रोजी लंडनमध्ये ट्रेझरी बिलांची चोरी झाली होती. या बिलांची किंमत अंदाजे ३८४ मिलीयन डॉलर्स इतकी होती. शेपर्ड्ससाठी काम करणाऱ्या जॉन गोडार्ड या ५८ वर्षीय पोस्टमनला लंडनमधील एका निर्जन गल्लीत लुटण्यात आलं होतं. या ब्रीफकेसमध्ये सुमारे ३८४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची बिलं होतं.

गोडार्ड बँका आणि बांधकाम कंपन्यांकडून ट्रेझरी बिले वितरित करायचे. कायद्यानुसार जो कोणी ही बिलं बँकेत घेऊन जातो तो त्याचा मालक मानला जातो. या गुन्ह्याच्या संदर्भात किथ चीझमन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्याला साडेसहा वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. पॅट्रिक थॉमस या दरोड्याचा मास्टर माईंड असल्याचं पोलिसांचं मत होतं. परंतु, तो पोलिसांना मृतावस्थेत सापडला होता.

वरील सर्व चोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅनिंग करण्यात आलं होतं. अतिशय शांत डोक्यांनं प्लॅनिंग करून चोरांनी आपल्या कामाला एक्झिक्युट केलं होतं. मात्र, जगातील सर्वात मोठी चोरी सर्वात सहजपणे करण्यात आलेली आहे. ती कुठली ते आता पाहुयात!

१८ मार्च २००३रोजी इराकमधील बँक ऑफ बगदादवर पडलेला दरोडा इतिहासातील सर्वात मोठी चोरी मानली जाते. इराकवर सद्दाम हुसेनची सत्ता होती, त्यामुळे सेंट्रल बँक ऑफ इराक ही त्याची खाजगी बँक असल्यासारखीच होती.

जेव्हा कॉलिएशनं सैन्यानं इराकवर बॉम्बफेक करण्यास सुरुवात केली होती त्याच्या आदल्या दिवशी, सद्दामने आपला मुलगा कुसे याला बँकेतील रोख रक्कम काढण्यासाठी पाठवलं होतं. कुसेनं आपल्या वडिलांच्या खात्यातील 1 अब्ज रुपये काढले. मात्र, राजवाड्याकडे परत येताना अमेरिकन सैन्याच्या हल्ल्यात कुसे मारला गेला. त्याच्या ताब्यातील रक्कम कुठे गेली? कोणी नेली याचा आजपर्यंत तपास लागलेला नाही. या घटनेला जगातील सर्वात मोठी चोरी मानलं जातं.

वरील सर्व घटना या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये घडलेल्या मोठ्या चोऱ्या आहेत. काही चोऱ्यांतील गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले तर काहींचा अद्यापही तपास लागलेला नाही. हे चोर सध्या काय करत असतील, याबाबत अनेकांच्या मनात कुतुहल कायम आहे. चोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धाडस आणि बुद्धीची आवश्यकता असते. या दोन्ही गोष्टी चोरीऐवजी एखाद्या चांगल्या कामामध्ये दाखवल्या तर समाजउपयोगी कामं होण्यास मदत होईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

पहिला ‘आयफोन’ ॲपलने नाही तर सिस्कोने बनवला होता!

Next Post

हा एकमेव खेळाडू आहे जो भारत आणि इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळलाय!

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

मनोरंजन

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

31 January 2023
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

7 September 2022
मनोरंजन

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

4 June 2022
मनोरंजन

या बयेनी नवऱ्याला तुरुंगातून पळवण्यासाठी चक्क पायलटचं लायसन्स मिळवलं होतं

22 April 2022
मनोरंजन

‘त्या’ दिवशी उडती तबकडी बघून लंडनवासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता, पण…

20 April 2022
मनोरंजन

‘हॅप्पी बर्थडे’ गाण्याची मालकी सांगून वॉर्नर म्युझिकने रग्गड पैसे छापले होते, पण…

14 April 2022
Next Post

हा एकमेव खेळाडू आहे जो भारत आणि इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळलाय!

या सौंदर्यवतीने आपल्या सौंदर्याच्या जोरावर कित्येक ज्यूंना यमसदनी पोहोचवलं होतं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)